Tuesday, September 22, 2026
Google search engine
HomeUncategorizedगणेशोत्सवात 'बीएनसीए'च्या वतीने आठ महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे स्वच्छता अभियान * नदीकाठच्या ओंकारेश्वर...

गणेशोत्सवात ‘बीएनसीए’च्या वतीने आठ महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे स्वच्छता अभियान * नदीकाठच्या ओंकारेश्वर व विठ्ठलवाडी मंदिर परिसरातील निर्माल्य व कचरा साफ

 

 

पुणे, दि. २२ सप्टेंबर २०२६ : महर्षी कर्वे स्त्रीशिक्षण संस्थेच्या डॉ. भानूबेन नानावटी कॉलेज ऑफ आर्किटेक्चर फॉर वूमेनच्या (बीएनसीए) वतीने शहरातील आठ आर्किटेक्चर कॉलेजच्या मिळून ६५ विद्यार्थी-विद्यार्थिनी स्वयंसेवकांनी मिळून शहरातील मुठा नदीकाठावरील ऐतिहासिक ओंकारेश्वर व विठ्ठलवाडी मंदिर व परिसरातील अस्ताव्यस्त पडलेले निर्माल्य व कचरा साफ केला. नॅशनल असोसिएशन ऑफ स्टूडंट्स ऑफ आर्किटेक्चरच्या (नासा) ६९व्या स्थापना दिनानिमित्त गणेशोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी हा उपक्रम राबवण्यात आला. गणेशोत्सवात आणि त्यानंतरही आपले शहर एकजुटीने शहर स्वच्छ ठेवण्याचे आवाहन बीएनसीए व या उपक्रमातील सहभागी महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी पुणेकर नागरिकांना केले.

 

या उपक्रमात बीएनसीएसह बीकेपीएस कॉलेज ऑफ आर्किटेक्चर, डी. वाय. पाटील स्कूल ऑफ आर्किटेक्चर, श्रीमती काशिबाई नवले कॉलेज ऑफ आर्किटेक्चर, एमआयटी स्कूल ऑफ आर्किटेक्चर, एमआयटी एडीटी, व्हीयू स्कूल ऑफ आर्किटेक्चर ॲण्ड प्लॅनिंग पुणे आणि एस. बी. पाटील कॉलेज कॉलेज ऑफ आर्किटेक्चर ॲण्ड डिझाईन यांचा समावेश होता.

 

या स्वच्छता उपक्रमाला द आर्किटेक्ट्स, इंजिनियर्स ॲण्ड सर्व्हेअर्स असोसिएशन (एसा), इंटॅक पुणे, एमबी की पाठशाला, तसेच विविध सामाजिक संस्था, वारसा सोशल फौंडेशनच्या प्राची दुधाणे आणि लिओ क्लब पुणे जिल्हाध्यक्ष अथर्व काकडे यांचे सहकार्य लाभले.

 

या उपक्रमाचे समन्वय नासाच्या युनिट सेक्रेटरी व युनिट डिझायनी असणाऱ्या बीएनसीएच्या विद्यार्थिनी अनुक्रमे तान्या आहुजा आणि श्रावणी पाटील यांनी प्रा. महेश बांगड यांच्या मार्गदर्शनाखाली केले. बीएनसीएच्या प्रभारी प्राचार्य डॉ. शुभदा कमलापूरकर आणि उपप्राचार्य डॉ. शार्वेय धोंगडे यांनी या उपक्रमाचे आयोजक आणि स्वयंसेवक विद्यार्थ्यांचे कौतुक केले.

 

या स्वच्छता अभियानात दोन्ही मंदिरांच्या परिसराची स्वच्छता करताना निर्माल्याबरोबर, पाण्याच्या प्लास्टीक बाटल्या, प्लास्टीक कचरा, प्रसादाचे बॉक्सेस आणि कागद वेचून ते पुणे महापालिकेच्या कचरा व निर्माल्य गोळा करणाऱ्या विभागाकडे सुपूर्त केले. गणेशोत्सवानिमित्त शहरातील कचरा साठणाऱ्या दुर्लक्षित जागांची पाहणी करून त्याचा वापर वास्तूरचनाशास्त्राच्या दृष्टीने कसा उपयुक्त ठरेल याबाबतही नागरिकांमध्ये जागृती केली. नागरीक तसेच शहरातील पायाभूत सुविधा आणि पर्यावरण यांच्या परस्पर संबंधाबाबतही मार्गदर्शन केले, असे तान्या आहुजा आणि श्रावणी पाटील यांनी सां

गितले.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments