Wednesday, September 23, 2026
Google search engine
HomeUncategorizedकोणार्क सूर्य मंदिर रथातून निघणार मंडई गणपतीची विसर्जन मिरवणूक अखिल मंडई मंडळाच्या...

कोणार्क सूर्य मंदिर रथातून निघणार मंडई गणपतीची विसर्जन मिरवणूक अखिल मंडई मंडळाच्या गणेशोत्सवाचे १३३ वे वर्ष

पुणे : अखिल मंडई मंडळाच्या गणेशोत्सवाची सांगता मिरवणूक शुक्रवार, दिनांक २५ सप्टेंबर रोजी सायंकाळी निघणार आहे. यंदा मंडई गणपतीची विसर्जन मिरवणूक कोणार्क सूर्य मंदिर रथातून निघणार आहे. सुमारे ३२ फूट उंचीच्या या रथावर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात येणार आहे, अशी माहिती मंडळाचे अध्यक्ष अण्णा थोरात यांनी दिली.

 

अखिल मंडई मंडळाच्या गणेशोत्सवाचे यंदा १३३ वे वर्ष आहे. यंदाच्या विसर्जन मिरवणुकीसाठी कोणार्क सूर्य मंदिराच्या वास्तुशैलीवर आधारित रथ साकारण्यात आला आहे. सुमारे ३२ फूट उंच असलेल्या या रथावर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात येणार असून, रथ हे मिरवणुकीचे प्रमुख आकर्षण असणार आहे.

 

ऐश्वर्याचे प्रतीक हत्ती, शौर्याचे प्रतीक सिंह प्रतिकृती रथावर असणार आहे. गणपतीच्या मागे तेजाचे प्रतीक सूर्य साकारण्यात आला आहे.

 

विसर्जन मिरवणुकीत पारंपरिक वाद्यवृंद आणि वाद्य पथकांचा सहभाग असणार आहे. मिरवणूकीच्या अग्रभागी जयंत नगरकर बंधू यांचे नगारावादन त्यामागे न्यू गंधर्व बँड तसेच शिवगर्जना पथकाचे वादन मिरवणूकीत होणार आहे. कलादिग्दर्शक विशाल ताजणेकर यांनी रथ साकारला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments