१५ वे सावरकर संमेलन
भूतानच्या थिंपू या राजधानीत येत्या २ ऑक्टोंबर रोजी होत आहे.
या संमेलनात सावरकरांच्या अनेक पैलूंवर लेख असलेल्या स्मरणिकेचे, देवेंद्र भुजबळ यांच्या “झेप” पुस्तकाचे, शैलजा देशपांडे यांचं “अनादि मी”, या पुस्तकांचे प्रकाशन देखील होणार आहे.
” झेप ”
” झेप” या पुस्तकात विविध क्षेत्रात लक्षणीय झेप
घेतलेल्या सर्वश्री डॉ विजय भटकर,डॉ रघुनाथ शेवगावकर,विकास खारगे,
तुकाराम मुंडे,नयना गुंडे,
सदानंद शेटे, डॉ विजय शिरीषकर, सुधाकर तोरणे ,
दिलीप स्वामी,भावेश भाटिया, अण्णासाहेब टेकाळे, राधिका भांडारकर,
आर आर लेमाडे,मारुती कदम,राम काजरोळकर,
कृष्णा दिवटे,उमाकांत रासने, शरद चौधरी , नंदकुमार पाटील,अमोल मोहोळकर,सुखदा प्रधान सिंग,प्रमोद झिंजाडे, सुभाष खाकाळ,प्रा डॉ मनिषा चाळसे,दिलीप पाथरे, अनिल राजपिसे,शोभा जोपुळे, विराग मधुमालती, अश्विनी भोईर, पुनिता भडसावळे,डॉ श्यामल सरडकर,जे पी देसाई , यज्ञेश सावे,अक्षय जाधव, मनीष गवई आणि अलका भुजबळ यांच्या प्रेरणादायी यश कथा आहेत.
या यश कथा सर्वश्री प्रा डॉ नरेशचंद्र काठोळे, सुनील चिटणीस,नंदकुमार रोपळेकर, महेबूब कासार, नितांत राऊत, रश्मी हेडे आणि देवेंद्र भुजबळ यांनी लिहिलेल्या असून न्यूज स्टोरी टुडे प्रकाशक आहे.


