~ कामाचे प्रदीर्घ दिवस आणि दैनंदिन प्रवासापासून ते विकेंड ट्रॅव्हल आणि कंटेंट निर्मितीपर्यंत नवीन एक्स८ सिरीज व्यक्तींच्या आज स्मार्टफोन वापरण्याच्या पद्धतीनुसार डिझाइन करण्यात आली आहे ~
बेंगळुरू, ४ सप्टेंबर २०२६: पोको इंडियाने आज आपल्या पोको एक्स८ सिरीजमधील नवीन स्मार्टफोन्स – पोको एक्स८ आणि पोको एक्स८ पॉवर लाँच करण्याची घोषणा केली. आधुनिक स्मार्टफोन वापरकर्त्यांच्या गरजा लक्षात घेऊन डिझाइन केलेली ही नवीन सिरीज शक्तिशाली परफॉर्मन्स, मोठे डिस्प्ले, वैविध्यपूर्ण कॅमेरे, मोठ्या क्षमतेच्या सिलिकॉन-कार्बन बॅटऱ्या आणि प्रबळ टिकाऊपणा यांचे एकत्रीकरण करते, ज्यामुळे वापरकर्त्यांना काम, मनोरंजन आणि दैनंदिन जीवनात अधिक गोष्टी करण्याचे स्वातंत्र्य मिळते.
कामाच्या व्यस्त दिवशी विविध अॅप्स वापरणे असो, प्रवासात कंटेंट पाहणे असो, प्रवासादरम्यान क्षण कॅप्चर करणे असो, दिवसभर कनेक्टेड राहणे असो किंवा चार्जरपासून दूर अधिक वेळ घालवणे असो, पोको एक्स८ सिरीज हे सर्व हाताळण्यासाठी डिझाइन करण्यात आली आहे. दोन्ही स्मार्टफोन्समध्ये १.५के एएमओएलईडी डिस्प्ले, सिलिकॉन-कार्बन बॅटरी तंत्रज्ञान, फास्ट चार्जिंग, आयपी६६, आयपी६८, आयपी६९ आणि आयपी६९के रेटिंग्ज, कॉर्निंग® गोरिला® व्हिक्टस® २ आणि एसजीएस व टीयूव्हीकडून फाईव्ह-स्टार क्वालिटी सर्टिफिकेशन समाविष्ट आहे.
पॉवर, जी दीर्घकाळापर्यंत डिवाईस कार्यरत ठेवते
दिवसभराच्या क्रियाकलापांच्या केंद्रस्थानी असणारा स्मार्टफोन विविध कामांमध्ये सहजपणे वापरता आला पाहिजे. पोको एक्स८ मध्ये स्नॅपड्रॅगन® ६एस जेन ४ मोबाईल प्लॅटफॉर्म देण्यात आला आहे, जो ४एनएम प्रक्रियेवर आधारित असून २.४ गिगाहर्ट्झपर्यंत सीपीयू स्पीडसह येतो. यामध्ये ८ जीबीपर्यंत रॅम आणि २५६ जीबी स्टोरेजचा पर्याय मिळतो. हे संयोजन दैनंदिन उत्पादकतेसाठी डिझाइन केले आहे – कामाचे अॅप्स आणि कॉल्स दरम्यान स्विच करण्यापासून ते ब्राऊझिंग, नेव्हिगेशन आणि मनोरंजनापर्यंत सर्व काही यात सहज होते.
अधिक काम असणाऱ्या वापरकर्त्यांसाठी, पोको एक्स८ पॉवरद्वारे स्नॅपड्रॅगन® ६ जेन ५ मोबाईल प्लॅटफॉर्मचे भारतात पदार्पण होत आहे. हे २.६ गिगाहर्ट्झपर्यंत सीपीयू स्पीड, ८ जीबीपर्यंत रॅम, २५६ जीबी स्टोरेज, एलपीडीडीआर५एक्स रॅम आणि यूएफएस ४.१ स्टोरेजसह येते. हे अतिरिक्त परफॉर्मन्स आणि मेमरी, एकाच वेळी अनेक अॅप्लिकेशन्स, मोठ्या फाईल्स आणि कंटेंट-हेव्ही वापर नियमित करणाऱ्या व्यक्तींसाठी अत्यंत योग्य बनवते.
प्रवास, विश्रांती आणि त्यामधील सर्व गोष्टींसाठी
प्रवासादरम्यान वेब सिरीज पाहण्यापासून ते सोशल मीडिया फीड्स स्क्रोल करणे, फोटो पाहणे किंवा प्रेझेंटेशन पूर्ण करण्यापर्यंत ६.८३-इंच १.५के एएमओएलईडी डिस्प्ले दोन्ही स्मार्टफोन्सना दैनंदिन वापरासाठी एक मोठा कॅनव्हास प्रदान करतो.
२७७२ × १२८० रिझोल्यूशन, १२० हर्ट्झपर्यंत रिफ्रेश रेट, १२-बिट कलर डेप्थ आणि ३५०० निट्स पर्यंत पीक ब्राईटनेससह हा डिस्प्ले वेगवेगळ्या वातावरणात सहज दृश्यमानतेसाठी डिझाइन केला आहे, तर डीसीआय-पी३ वाईड कलर गॅमट आणि टीयूव्ही ट्रिपल आय प्रोटेक्शन एकूण अनुभव अधिक उत्साहवर्धक करतात.
पोको एक्स८ पॉवर एचडीआर१०+ आणि डॉल्बी व्हिजन® सह मनोरंजनाला अधिक पुढे घेऊन जाते, ज्यामुळे सुसंगत चित्रपट आणि शो अधिक वास्तववादी वाटतात. दोन्ही डिवाईसेसमध्ये डॉल्बी अॅटमॉस आणि हाय-रेस ऑडिओसह स्टिरिओ ड्युअल स्पीकर्स देखील आहेत, ज्यामध्ये एक्स८ वर ३०० टक्के आणि एक्स८ पॉवरवर ४०० टक्क्यांपर्यंत व्हॉल्यूम बूस्ट मिळतो.
प्रवासाचे दिवस आणि कॅप्चर करण्यायोग्य क्षणांसाठी
विकेंडला बाहेर जाणे, कौटुंबिक कार्यक्रम असो किंवा दैनंदिन क्षण असो, एखादे दृश्य कॅप्चर करण्यासाठी वेगवेगळ्या पद्धतींची गरज भासू शकते. पोको एक्स८ मध्ये ओआयएस, एफ/१.८ अॅपर्चर आणि ५पी लेन्ससह ५० मेगापिक्सल मुख्य कॅमेरा आणि २ मेगापिक्सल डेप्थ कॅमेरा आहे. पोर्ट्रेट मोड, एचडीआर, लाईव्ह मोमेंट्स, अल्ट्रा एचडी मोड, प्रो मोड आणि ड्युअल व्हिडिओ यांसारखी वैशिष्ट्ये वापरकर्त्यांना दैनंदिन फोटोग्राफी, पोर्ट्रेट्स आणि व्हिडिओमध्ये लवचिकता देतात. यामधील १६ मेगापिक्सल फ्रंट कॅमेरा पोर्ट्रेट, एचडीआर, लाईव्ह मोमेंट्स आणि एआय ब्यूटीफायला देखील सपोर्ट करतो.
प्रवास करताना किंवा कंटेंट तयार करताना अधिक लवचिकता इच्छिणाऱ्या वापरकर्त्यांसाठी पोको एक्स८ पॉवरमध्ये एफ/१.५ अॅपर्चर आणि ६पी लेन्ससह ५० मेगापिक्सल ओआयएस मुख्य कॅमेरा आणि ८ मेगापिक्सल अल्ट्रावाईड कॅमेरा दिला आहे. ऑटो सीन डिटेक्शन आणि २X इन-सेन्सर अल्ट्रा-क्लिअर झूममुळे विविध दृश्ये कॅप्चर करणे सोपे होते, तर रिअर आणि ३२ मेगापिक्सल फ्रंट अशा दोन्ही कॅमेऱ्यांवर ३०एफपीएसवर ४के व्हिडिओ रेकॉर्डिंगमुळे क्रिएटर्सना कॅप्चर आणि शेअर करण्यासाठी अधिक वाव मिळतो.
तुम्हाला चार्जिंगचा विचार करायचा नसेल त्या दिवसांसाठी
लांबचा प्रवास, नेव्हिगेशन, कॉल्स, स्ट्रिमिंग आणि कंटेंट क्रिएशन यामुळे बॅटरी संपण्याची चिंता लवकर निर्माण होऊ शकते. पोको एक्स८ मध्ये शाओमी सर्ज जी१ बॅटरी मॅनेजमेंट चिपद्वारे समर्थित ९००० एमएएच सिलिकॉन-कार्बन बॅटरी, ६७ वॅट शाओमी हायपरचार्ज आणि २२.५ वॅट वायर्ड रिव्हर्स चार्जिंगसह बॉक्समध्ये ६७ वॅट चार्जर दिला आहे.
पोको एक्स८ पॉवर अधिक टिकाऊपणा इच्छिणाऱ्यांसाठी डिझाइन करण्यात आला आहे, ज्यामध्ये १०,००० एमएएच सिलिकॉन-कार्बन बॅटरी, १०० वॅट शाओमी हायपरचार्ज आणि २७ वॅट वायर्ड रिव्हर्स चार्जिंग समाविष्ट आहे. प्रवासाच्या पूर्ण दिवसासाठी बाहेर पडणे असो, कंटेंट पाहण्यात तास घालवणे असो किंवा काम आणि संवादासाठी फोनचा मोठ्या प्रमाणावर वापर करणे असो, या डिवाईसमधील मोठी बॅटरी सतत पॉवर सॉकेट शोधण्याची गरज कमी करण्यासाठी डिझाइन केली आहे. या डिवाईससोबत बॉक्समध्ये १०० वॅट चार्जर देखील समाविष्ट आहे.
नेहमी घरातच न घडणाऱ्या आयुष्यासाठी
स्मार्टफोन कुठेही सोबत असतात – गर्दीचा प्रवास, बाहेरील परिसर, सहली आणि अनपेक्षित दैनंदिन परिस्थितींमध्ये. पोको एक्स८ सिरीज ही गोष्ट लक्षात ठेवून डिझाइन करण्यात आली आहे, ज्यामध्ये कॉर्निंग® गोरिला® व्हिक्टस® २, आयपी६६, आयपी६८, आयपी६९ व आयपी६९के रेटिंग्ज आणि एसजीएस व टीयूव्हीकडून फाईव्ह-स्टार क्वालिटी सर्टिफिकेशन समाविष्ट आहे.
अँड्रॉइड १६ वर आधारित शाओमी हायपरओएस ३ वर चालणारे पोको एक्स८ आणि पोको एक्स८ पॉवर सुधारित वैयक्तीकरण आणि परिसंस्था एकात्मतेसह वेगवान, सुलभ सॉफ्टवेअर अनुभव प्रदान करतात. दीर्घकालीन सॉफ्टवेअर सपोर्ट सुनिश्चित करत पोको ४ वर्षांचे अँड्रॉइड अपडेट्स आणि ६ वर्षांचे सिक्युरिटी पॅचेस देखील प्रदान करेल.
किंमत आणि उपलब्धता
पोको एक्स८ २९,९९९ रूपयांच्या एसआरपीवर उपलब्ध असेल, तर पोको एक्स८ पॉवर ३५,९९९ रूपयांच्या एसआरपीवर उपलब्ध असेल.
लाँच ऑफरचा भाग म्हणून, ग्राहक २,००० रूपयांचे कूपन डिस्काउंट, तसेच १,००० रूपयांची बँक ऑफर/एक्सचेंज बोनसचा लाभ घेऊ शकतात, ज्यामुळे प्रभावी किंमत पोको एक्स८ साठी २६,९९९ रूपये आणि पोको एक्स८ पॉवरसाठी ३२,९९९ रूपये होईल.
दोन्ही स्मार्टफोन्सची विक्री ११ सप्टेंबर २०२६ रोजी दुपारी १२ वाजता सुरु होईल, जे केवळ फ्लिपकार्टवर उपलब्ध असतील. ग्राहक पोको एक्स८ साठी प्रतिमहिना २,२५० रूपये आणि पोको एक्स८ पॉवरसाठी प्रतिमहिना २,७५० रूपयांपासून सुरू होणाऱ्या १२ महिन्यांच्या नो-कॉस्ट ईएमआयद्वारे देखील डिवाईसेस खरेदी करू शकतात.\\


