Thursday, September 24, 2026
Google search engine
HomeUncategorizedकुटुंबासाठी सर्वात महत्त्वाच्या असलेल्या गोष्टींचे संरक्षण करण्यासाठी इंडसइंड जनरल इन्शुरन्स या गणेशोत्सवात...

कुटुंबासाठी सर्वात महत्त्वाच्या असलेल्या गोष्टींचे संरक्षण करण्यासाठी इंडसइंड जनरल इन्शुरन्स या गणेशोत्सवात प्रोत्साहन देते आहे

 

22 सप्टेंबर 2026: भारतभरातील कुटुंबे भक्तिभाव, आपुलकी आणि आनंदाने गणेशोत्सव साजरा करत असताना, हा सण आपल्याला आपल्या जीवनातील सर्वात महत्त्वाच्या व्यक्ती, घर आणि स्वप्नांचे संरक्षण करण्याची महत्त्वाची आठवण करून देतो. श्री गणेश हे विघ्नहर्ता म्हणून पूजले जात असले, तरी योग्य पूर्वतयारीमुळे आपल्या जवळच्यांना आयुष्यातील अनिश्चिततांचा सामना अधिक आत्मविश्वासाने करण्यास मदत होते.

सणासुदीच्या काळात अनेकदा प्रवासाचे प्रमाण वाढते, मौल्यवान वस्तूंची खरेदी केली जाते आणि घरही माणसांनी गजबजलेले असते. सण साजरा करण्यासाठी कुटुंबे एकत्र येत असताना, वैयक्तिक आणि आर्थिक सुरक्षेच्या दृष्टीने योग्य पावले उचलल्यास कोणत्याही चिंतेशिवाय सणाचा आनंद घेता येऊ शकतो.

यावर भाष्य करताना इंडसइंड जनरल इन्शुरन्सचे डेप्युटी सीईओ अनिश बहल म्हणाले, “गणेशोत्सव आपल्याला श्रद्धा, कुटुंब आणि सुरक्षा यांचे महत्त्व पटवून देतो. मात्र, आपण आपल्या प्रियजनांसाठी बाप्पाचा आशीर्वाद मागत असतानाच, आपल्यासाठी सर्वात महत्त्वाच्या गोष्टींचे रक्षण करण्यासाठी वेळेवर व्यावहारिक पावले उचलणेही तितकेच गरजेचे आहे. मग ते आपले घर असो, कुटुंबाची आर्थिक सुरक्षितता असो किंवा भविष्यातील स्वप्ने; योग्य पूर्वतयारीमुळे मनाला शांती मिळते आणि कुटुंबे अधिक आत्मविश्वासाने हा उत्सव साजरा करू शकतात.”

याच भावनेशी सुसंगत अशी इंडसइंड जनरल इन्शुरन्सची होम इन्शुरन्स (गृह विमा) योजना आहे, जी आग, घरफोडी, चोरी आणि काही विशिष्ट नैसर्गिक आपत्तींपासून घर आणि घरातील साहित्याचे संरक्षण करण्यास मदत करते. सणासुदीच्या काळात प्रवास करणाऱ्यांसाठी, पर्सनल ॲक्सिडेंट 360 शील्ड ही योजना असून ती अपघाती मृत्यू आणि अपंगत्वापासून संरक्षण देते; तसेच पॉलिसीच्या अटी आणि शर्तींच्या अधीन राहून यात कुटुंबासाठी उपयुक्त असे लाभही मिळतात.

गणेशोत्सवाचा प्रवास अनंत चतुर्दशीकडे सुरू आहे, अशावेळी या उत्सवाचा खरा आनंद हा केवळ जल्लोषापुरता मर्यादित राहात नाही. उत्सव काही दिवसांचाच असला, तरी जी माणसे, आठवणी आणि स्वप्ने घराला खऱ्या अर्थाने ‘घरपण’ देतात, ती मात्र आयुष्यभर आपल्यासोबत राहतात.

बाप्पा आपले रक्षण नेहमीच करतो. यावेळी, आपणही सर्वात महत्त्वाच्या गोष्टींचे रक्षण करू या.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments