मुंबई, 24 सप्टेंबर 2026: कोटक महिंद्रा लाइफ इन्शुरन्स कंपनी लिमिटेड (“कोटक लाइफ”) आणि पॉलिसीबाजारने कोटक प्रोटेक्ट ॲडव्हांटेज लाँच करण्याची घोषणा केली आहे. हा एक लवचिक आणि सर्वसमावेशक टर्म इन्शुरन्स प्लॅन आहे जो लोकांना त्यांच्या कुटुंबाचे आर्थिक भविष्य सुरक्षित करण्यास मदत करतो. यामध्ये मोठे लाइफ कव्हर आणि ग्राहकांसाठी उपयुक्त अशी अनेक फीचर्स दिली आहेत जी आयुष्याच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर उपयोगाला येतील.
कोटक लाइफचे उपव्यवस्थापकीय संचालक अमित पाल्टा म्हणाले, “लाइफ इन्शुरन्सचे भविष्य विशिष्ट ग्राहक गटांसाठी सुसंगत सोल्यूशन्स देण्यावर अवलंबून आहे. कोटक लाइफमध्ये आम्ही ग्राहकांच्या गरजा, आवडी आणि आर्थिक प्राधान्ये समजून घेण्यासाठी आमच्या पार्टनर्ससोबत काम करतो आणि त्यातून मिळालेल्या माहितीचा उपयोग अर्थपूर्ण उत्पादन नवनिर्मितीसाठी करतो. कोटक प्रोटेक्ट ॲडव्हांटेज हे आजच्या तरुण आणि डिजिटली साक्षर ग्राहकांच्या गरजा लक्षात घेऊन तयार करण्यात आले आहे.”
पॉलिसीबाजारचे चीफ बिझनेस ऑफिसर विवेक जैन म्हणाले, “टर्म इन्शुरन्सने व्यक्तीच्या वास्तव आयुष्यातील गरजांशी सुसंगत राहणे गरजेचे आहे. व्यक्ती जशी आयुष्याच्या विविध टप्प्यातून जाते, तशी तिची आर्थिक जबाबदारी आणि संरक्षणाची गरजही बदलणे आवश्यक असते. कोटक लाइफसोबत कोटक प्रोटेक्ट ॲडव्हांटेज पॉलिसीबाजार प्लॅटफॉर्मवर आणताना आम्हाला आनंद होत आहे, जे ग्राहकाच्या प्रवासातील विविध टप्प्यांवर उपयुक्त वैशिष्ट्ये प्रदान करते. हा प्लॅन मेडिकल टेस्टशिवाय कव्हर वाढवण्याची सोय, प्रीमियम ब्रेक घेण्याची सुविधा, क्लेमची माहिती देताच ₹2 लाखांचे इन्स्टंट पेआउट आणि आरोग्य व वेलबीइंगचे फायदे मिळवण्याची संधी देतो. यामुळे हा प्लॅन ग्राहकांच्या बदलत्या गरजांसाठी खूपच उपयुक्त ठरतो.”
आजची तरुण पिढी पूर्वीच्या पिढ्यांपेक्षा वेगळ्या पद्धतीने आर्थिक नियोजन करत आहे. डिजिटल प्लॅटफॉर्मवर अति-वैयक्तिकृत अनुभवांची सवय असल्याने, त्यांना त्यांच्या आर्थिक निर्णयांवर अधिक नियंत्रण तसेच लवचिकता आणि सोय हवी असते. यामुळेच जीवन विमा कंपन्यांना विशिष्ट ग्राहक गटांच्या गरजा आणि अपेक्षांनुसार नवीन उत्पादने विकसित करण्याची संधी मिळाली आहे.
या बदलत्या अपेक्षा ओळखून कोटक लाइफ आणि पॉलिसीबाजारने एकत्र येत कोटक प्रोटेक्ट ॲडव्हांटेज विकसित करण्यासाठी सहकार्य केले आहे. कोटक लाइफचे संरक्षण क्षेत्रातील नैपुण्य आणि पॉलिसीबाजारची डिजिटल साक्षर तरुण ग्राहकांविषयीची समज यांचा वापर करून त्यांच्या आर्थिक प्राधान्यक्रमानुसार हा प्लॅन बनवण्यात आला आहे.
यामध्ये ग्राहकांना दोन प्लॅन ऑप्शन्स आणि दोन पेआउट ऑप्शन्स मिळतील, जेणेकरून ते वैयक्तिक आणि कौटुंबिक गरजेनुसार कव्हर निवडू शकतील. यात प्रीमियम ब्रेक बेनिफिट, माईलस्टोन अपग्रेड ऑप्शन, ॲक्सिलरेटेड टर्मिनल इलनेस बेनिफिट आणि प्रीमियम रिटर्नसह स्पेशल एक्झिट बेनिफिट यांसारखी अनेक वैशिष्ट्ये ग्राहकांना अधिक लवचिकता आणि मूल्य मिळवून देतील.
जोखीम घटक, नियम आणि अटींबद्दल अधिक माहितीसाठी, कृपया खरेदी पूर्ण करण्यापूर्वी विक्री माहितीपुस्तिका (सेल्स ब्रोशर) काळजीपूर्वक वाचा.
कोटक महिंद्रा लाइफ इन्शुरन्स कंपनी लिमिटेड बद्दल माहिती
कोटक महिंद्रा लाइफ इन्शुरन्स कंपनी लिमिटेड ही कोटक महिंद्रा बँक लिमिटेडची 100% मालकीची उपकंपनी आहे. कोटक लाइफ ग्राहकांविषयी उच्च सहानुभूती ठेवून जीवन विमा उत्पादने प्रदान करते. तिची उत्पादने संरक्षण आणि दीर्घकालीन बचतीचा एकत्रित लाभ देतात. 31 मार्च 2026 पर्यंत 163 शहरांमध्ये ^372 शाखांसह कोटक लाइफ ही भारतातील सर्वात वेगाने वाढणाऱ्या विमा कंपन्यांपैकी एक आहे आणि तिने ~5 कोटींहून अधिक लोकांचे संरक्षण केले आहे$.
अधिक तपशिलांसाठी, कृपया www.kotaklife.com ला भेट द्या
पॉलिसीबाजारबद्दल:
भारतातील सर्वात मोठ्या डिजिटल विमा प्लॅटफॉर्मपैकी एक म्हणून, पॉलिसीबाजार प्रत्येक भारतीयासाठी आणि जागतिक ग्राहकांसाठी विमा सुलभ, पारदर्शक आणि वैयक्तिकृत करण्यासाठी वचनबद्ध आहे. 2008 पासून, पॉलिसीबाजारने 62.9 दशलक्ष (डिसेंबर 2025 पर्यंत) पॉलिसी जारी केल्या आहेत आणि मृत्यू, आजारपण आणि अपंगत्वापासून कुटुंबांचे रक्षण करण्यास मदत केली आहे. पॉलिसीबाजार 50+ विमा भागीदारांसोबत आरोग्य, जीवन, वाहन आणि कॉर्पोरेट विमा क्षेत्रात काम करते. कंपनी ग्राहकांना 24/7 डिजिटल सहाय्य आणि ऑन-ग्राउंड विमा सल्लागारांसह मदत करते, ज्यामुळे सर्व स्तरांव
र अखंड अनुभव सुनिश्चित होतो.


