श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट चा गणेशोत्सव ; भारतासह परदेशातूनही ट्रस्टच्या फेसबुक, इन्स्ट्राग्राम, यू ट्यूब, वेबसाईट सह इतर सोशल मीडियावर गणेशभक्तांची भेट
पुणे : भारतासह नेपाळ, अमेरिका, थायलंड, युएई आणि जगभरातील ३ कोटींपेक्षा अधिक गणेशभक्तांनी ट्रस्टच्या फेसबुक, इन्स्ट्राग्राम, यू ट्यूब, वेबसाईट सह इतर सोशल मीडियावर श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचे दर्शन यंदाच्या गणेशोत्सवात घेतले आहे. अनेकांना गणरायाच्या दर्शनासाठी पुण्यात प्रत्यक्ष येता येणे शक्य नसते, त्यामुळे आॅनलाईन माध्यमातून उत्सवाचा आनंद जगभरातील भाविकांना देण्याचा प्रयत्न ट्रस्टतर्फे करण्यात येत आहे.
महाराष्ट्रात पुण्यासह मुंबई, ठाणे, दिल्ली, नागपूर, कलकत्ता, नाशिक, अहमदाबाद, सुरत या शहरांतून गणेशभक्त वेबसाईट, फेसबुक, यू ट्यूब, इन्स्टाग्राम, ट्विटरसह श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टच्या सोशल मीडियावर बाप्पाचे दर्शन घेत आहेत. तर, कॅनडा, युके, ऑस्ट्रेलिया, इंडोनेशिया आणि पाकिस्तानमधून देखील ट्रस्टच्या सोशल मीडियावर गणेशभक्तांनी दगडूशेठ गणपतीचे दर्शन घेतले आहे.
श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळ च्यावतीने ट्रस्टच्या १३४ व्या वर्षीचा गणेशोत्सव सुरु आहे. सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीपासूनच ट्रस्टतर्फे विविध कार्यक्रम सुरु झाले. तेव्हापासून ट्रस्टच्या आॅनलाईन सेवांच्या माध्यमातून लाखो भाविक दर्शन घेत आहेत. वेबसाईट, यु ट्यूब आणि फेसबुकवरुन दररोज सकाळी व रात्री होणारी लाईव्ह आरती व दर्शन देखील गणेशभक्त घेत आहेत. भाविकांना ट्रस्टतर्फे विविध आॅनलाईन सुविधा उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत.
गणेशोत्सव सुरु झाल्यानंतर सुमारे ३७ लाख भाविक फेसबुकवरुन, इन्स्टाग्रामवर २ कोटी ८७ लाखांहून अधिक आणि यूटयूब व अॅप वरुन देखील गणेशभक्तांनी भेट दिली आहे. यामुळे यंदाच्या गणेशोत्सव काळात आजपर्यंत तब्बल ३ कोटींहून अधिक गणेशभक्तांनी आॅनलाईन दर्शनाचा लाभ घेतला आहे. डिजीटल माध्यमातून ट्रस्टच्या सामाजिक उपक्रमांना देखील भक्त जोडले गेले आहेत.
उत्सवकाळात भारतासह परदेशातील गणेशभक्तांना घरच्या घरी श्रीं चे आॅनलाईन दर्शन घेण्याची व्यवस्था देखील ट्रस्टने केली असून ट्रस्टच्या वेबसाईट, अॅप, फेसबुक, यू ट्यूब, ट्ट्विटर या माध्यमांद्वारे www.dagdushethganpati.com, http://bit.ly/Dagdusheth-Live, iOS : http://bit.ly/Dagdusheth_iphone_App Android: http://bit.ly/ Dagdusheth _ Android_App या लिंकवर उत्सवकाळात २४ तास दर्शनाची सोय करण्यात आली आहे. तरी भाविकांनी आॅनलाईन सुविधांचा देखील लाभ घ्यावा, असे आवाहन ट्रस्टतर्फे करण्यात आले आहे.


