Thursday, September 24, 2026
Google search engine
HomeUncategorizedपुणे विभाग पदवीधर आणि पुणे विभाग शिक्षक मतदार संघ निवडणूक* ...

पुणे विभाग पदवीधर आणि पुणे विभाग शिक्षक मतदार संघ निवडणूक* *समन्वय अधिकाऱ्यांनी संघभावनेने काम करत विधानपरिषद निवडणूक यशस्वी करावी- विभागीय आयुक्त शीतल तेली- उगले*

 

 

पुणे, दि. २४: पुणे विभाग पदवीधर मतदार संघ आणि पुणे विभाग शिक्षक मतदार संघाच्या निवडणूक सर्व समन्वय अधिकाऱ्यांनी सोपविलेल्या जबाबदाऱ्या संघभावनेने कामकाज करत यशस्वीपणे पार पाडावी, असे निर्देश निवडणूक निर्णय अधिकारी तथा विभागीय आयुक्त शीतल तेली – उगले यांनी दिले.

 

पुणे विभाग पदवीधर मतदार संघ आणि पुणे विभाग शिक्षक मतदार संघ निवडणुकीसाठी नियुक्त समन्वय अधिकाऱ्यांची बैठक श्रीमती तेली- उगले यांच्या अध्यक्षतेखाली विभागीय आयुक्त कार्यालयात आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी अतिरिक्त आयुक्त तुषार ठोंबरे यांच्यासह नोडल अधिकारी आणि दूरदृष्यप्रणालीद्वारे निवडणुकीशी संबंधित पाचही जिल्ह्यातील अधिकारी उपस्थित होते.

 

विभागीय आयुक्त म्हणाल्या, या निवडणुका मतपत्रिकेद्वारे पसंतीक्रम नोंदवून घेण्यात येतात. हा फरक वगळता आचारसंहितेशी संबंधित आणि अन्य तरतुदी सार्वत्रिक निवडणुकांप्रमाणेच असून त्यानुसार कार्यवाही करण्यात यावी. सर्व अधिकाऱ्यांनी निवडणूक नियमांचा चांगल्या प्रकारे अभ्यास करून त्यानुसार कार्यवाही करावी.

 

विविध जबाबदाऱ्या पार पाडण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांनी आवश्यक नियोजन करावे. मतमोजणीची प्रक्रिया जास्त वेळ चालण्याची शक्यता लक्षात घेता मतमोजणीच्या वेळी आवश्यक त्या सुविधा योग्यप्रकारे मिळतील याचे नियोजन करावे, असे सूचना विभागीय आयुक्तांनी यावेळी केल्या.

 

यावेळी श्री. ठोंबरे यांनी निवडणुकीच्या अनुषंगाने नियुक्त समन्वय अधिकाऱ्यांच्या अधिनस्त विविध कक्षांच्या जबाबदाऱ्यांचे सादरीकरण केले.

 

मनुष्यबळ नियोजन, आचारसंहिता, तक्रारी, माध्यमे व खर्च नियंत्रण, मतदान पूर्वतयारी, वाहतूक आराखडा, अधिकारी-कर्मचारी, उमेदवार प्रतिनिधींचे प्रशिक्षण, वेबकास्टिंग, संगणकीकरण, माध्यम कक्ष, पेड न्यूज, पोलीस मनुष्यबळ नियोजन, कायदा व सुव्यवस्था, भरारी पथक, स्थीर सर्वेक्षण पथक आदी पथके, प्रचार साहित्यविषयक तरतुदींचे पालन, जाहिरातींचे पूर्वप्रमाणीकरण, प्रत्यक्ष मतदानाची तयारी व त्यासाठीच्या सुविधा, मतमोजणी आणि त्यासाठीच्या सुविधा आदींविषयी माहिती या बैठकीत देण्यात आली.

0000

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments