गुढी पाडव्याची उत्सुकता वाढली असताना सकारात्मक वातावरण आणि नवीन ग्राहकांच्या ओघाने सोन्याची मागणी कायम राहील असा विश्वास पीएनजी ज्वेलर्स चे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक डॉ.सौरभ गाडगीळ यांनी व्यक्त केला.अल्प काळात थोडे चढ-उतार पाहायला मिळाले तरी बाजाराचा मुलभूत पाया आणि ग्राहकांचा आत्मविश्वास यामुळे विक्री अशीच सुरू राहील. दागिन्यांच्या बाबतीत ग्राहक लग्न समारंभासाठीचे पारंपरिक दागिने ते समकालीन हिर्याचे दागिने, हलक्या वजनाची फ्युजन शैली आणि रंगीत रत्नजडित दागिन्यांपर्यंत विविध प्रकारच्या दागिन्यांना पसंती देत आहेत. या हंगामात दैनंदिन वापराकरिता आणि विशिष्ट प्रसंगांकरिता लागणारे दागिने या दोन्ही प्रकारांना जोरदार मागणी अपेक्षित आहे. एकंदर हा काळ ग्राहक आणि दागिने उद्योगासाठी चांगला असेल.
सोन्याची मागणी कायम राहील -सौरभ गाडगीळ
RELATED ARTICLES


