नवी दिल्लीत राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक; देशभरातील परिवारांना एकत्र आणण्यासाठी व्यापक संघटन विस्ताराची कार्ययोजना
नवी दिल्ली, दि. २० सप्टेंबर २०२६ : स्वातंत्र्यलढ्यात आपल्या सर्वस्वाचा त्याग करणाऱ्या स्वातंत्र्यसैनिकांच्या कुटुंबीयांच्या हक्क, सन्मान व सामाजिक प्रतिष्ठेसाठी देशव्यापी लढा उभारण्याचा निर्धार स्वातंत्र्यसैनिक उत्तराधिकारी परिवार समितीच्या राष्ट्रीय कार्यकारिणी बैठकीत करण्यात आला. स्वातंत्र्यसैनिक उत्तराधिकारी परिवारांना ‘राष्ट्रीय वारसा’ म्हणून मान्यता देऊन त्यांच्या सन्मान व अधिकारांसाठी देशभर समान धोरण असावे, अशी महत्त्वपूर्ण मागणी या बैठकीत करण्यात आली.
प्रेस क्लब ऑफ इंडिया, रायसीना रोड, नवी दिल्ली येथे झालेल्या या अर्धवार्षिक राष्ट्रीय कार्यकारिणी बैठकीस देशातील 21 राज्यांमधून 42 राष्ट्रीय व प्रादेशिक प्रतिनिधी उपस्थित होते. बैठकीच्या अध्यक्षस्थानी समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष देशबंधूजी होते. राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष द्विजेंद्र मोहन शर्मा, राष्ट्रीय महासचिव जितेंद्र रघुवंशी, कार्यकारी महासचिव चंद्रप्रकाश बाजपेई (माजी आमदार), राष्ट्रीय संघटन सचिव कपूर सिंह दलाल यांच्यासह विविध राज्यांतील पदाधिकारी उपस्थित होते.
पाच कोटी उत्तराधिकाऱ्यांना एका व्यासपीठावर आणण्याचा संकल्प
राष्ट्रीय महासचिव जितेंद्र रघुवंशी यांनी संघटनेच्या आगामी कार्याचा आढावा घेताना देशातील प्रत्येक राज्यातील स्वातंत्र्यसैनिक परिवारापर्यंत पोहोचण्याची गरज व्यक्त केली. देशभरातील सुमारे पाच कोटी उत्तराधिकाऱ्यांना एका व्यासपीठावर आणण्यासाठी व्यापक जनसंपर्क आणि संघटन विस्ताराचे अभियान राबविण्याचा निर्धार करण्यात आला.
सध्या संघटना 23 राज्यांमध्ये सक्रिय असून स्वातंत्र्यसैनिक परिवारांच्या सन्मान, अधिकार व हितासाठी तसेच सामाजिक व जनहिताच्या विविध उपक्रमांसाठी कार्यरत असल्याची माहिती बैठकीत देण्यात आली.
राज्यनिहाय सुविधांचा आढावा; समान अधिकारांसाठी पाठपुरावा
राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष द्विजेंद्र मोहन शर्मा यांनी विविध राज्यांमध्ये स्वातंत्र्यसैनिक परिवारांना मिळणाऱ्या सुविधा, सन्मान व शासकीय तरतुदींचा आढावा घेतला. पंजाब, उत्तराखंड, आसाम आणि छत्तीसगडमधील विविध अधिसूचना व तरतुदींवर विशेष चर्चा झाली.
देशातील सर्व राज्यांमध्ये स्वातंत्र्यसैनिक उत्तराधिकारी परिवारांना समान सन्मान, सुविधा आणि अधिकार मिळावेत, यासाठी शासनस्तरावर संघटितपणे पाठपुरावा करण्याची कार्ययोजना निश्चित करण्यात आली.
युवा व मातृशक्तीला संघटनेत मोठी जबाबदारी
स्वातंत्र्यसैनिक परिवारांच्या पहिल्या पिढीचे वाढते वय लक्षात घेता संघटनेच्या पुढील वाटचालीत मातृशक्ती आणि युवा शक्तीला केंद्रस्थानी आणण्याचा निर्णय घेण्यात आला. मातृशक्ती मंच व युवा मंच अधिक सक्षम करून नव्या पिढीला संघटनेच्या कार्याशी जोडण्यावर भर देण्यात आला.
राष्ट्रीय उपाध्यक्ष सुनील गोपालदास गुजराती यांनी शाळा व महाविद्यालयांमध्ये स्वातंत्र्यलढ्याच्या इतिहासाबाबत जनजागृती निर्माण करण्याची गरज व्यक्त केली. शाळांमध्ये जनजागृती कार्यक्रम सुरू असून महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनाही या अभियानाशी जोडण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
*निलेशभई कोठारी व सुनील गुजराती यांचा गौरव.*
*संघटनेच्या कार्यात उल्लेखनीय योगदान दिल्याबद्दल व आज देशाला गांधीवादी विचार कसे गरजेचे आहेत आणि स्वातंत्र सैनिकांनी घरावर तुळशीपत्र ठेवून देशासाठी जो त्याग केला आहे त्याची संपूर्ण इतिहास सांगण्याचे काम गावोगावी जाऊन जनजागृती केली आहे. तसेच पुणे जिल्हा व महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यांमध्ये संघटना मजबूत व मोठी करण्याचे उल्लेखनीय कार्य श्री निलेशभई कोठारी यांनी केले आहे त्याबद्दल त्यांना महाराष्ट्र राज्य प्रदेशाध्यक्षपदी निवड करण्यात आलेली आहे.*
निलेशभई कोठारी यांनी मनोगत व्यक्त करताना इतर राज्याप्रमाणे महाराष्ट्र राज्यामध्ये स्वतंत्र सैनिक उत्तराधिकारी यांना कोणतीही सवलत अथवा सन्मान मिळत नाही अशी खंत त्यांनी व्यक्त केली तसेच इतर राज्याप्रमाणे महाराष्ट्र राज्यामध्ये
स्वातंत्र्य सेनानी उत्तराधिकारी यांच्या परिवारास व पुढील सर्व पिढीस
यांना सुद्धा सर्व सुविधा सवलत मिळाव्यात त्या खालील प्रमाणे
स्वातंत्र्यसैनिक उत्तराधिकारी परिवारातील सर्व वेक्तीना राष्ट्रीय वारसा घोषित करावे.
स्वातंत्र्यसैनिक उत्तराधिकारी परिवारांना
मानधन सुविधा चालू करावी तसेच एसटी व रेल्वे मध्ये मोफत सुविधा चालू करावी तसेच स्वतंत्र सैनिक उत्तराधिकारी परिवारांना ५ एकर शेत जमीन व राहण्यासाठी ५ गुंठे जागा किंवा फ्लॅट मोफत उपलब्ध करून द्यावेत तसेच स्वतंत्र सैनिक उत्तराधिकारी परिवाराच्या सर्व कुटुंबीयांना यांच्या राहत्या घरास कार्पोरेशन घरपट्टी पाणीपट्टी इत्यादी टॅक्स माफ व्हावेत स्वातंत्र सैनिक उत्तराधिकारी परिवारांच्या सर्व कुटुंबीयांना ओळखपत्र कार्ड देण्यात यावेत. स्वातंत्र्य सैनिक उत्तराधिकारी यांना चांगल्या प्रकारे शेती किंवा छोटे मोठे उद्योग व्यवसाय व्यापार करण्यासाठी महाराष्ट्र राज्य सरकारने स्वातंत्र्य सैनिक आर्थिक विकास महामंडळ स्थापन करावे. स्वातंत्र्य सेनानी उत्तराधिकारी यांच्या परिवारास व सर्व पिढीस औषध उपचारासाठी खाजगी दवाखान्यात औषधासहित मोफत उपचार सुविधा मिळावी. शैक्षणिक फी माफ करावी व वस्तीग्रह मध्ये राहण्यासाठी जागा राखीव ठेवण्यात याव्यात. केंद्र व राज्य सरकारमध्ये व सरकारी नोकरीमध्ये दहा टक्के जागा आरक्षित राखीव ठेवण्यात याव्यात.
इत्यादीचे मागणे केली. *तसेच स्वातंत्र्य सैनिक संघटना राष्ट्रीय कार्यकारणी सोबत महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब व उपमुख्यमंत्री सुनेत्राजी पवार आणि उपमुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे साहेबयांची वेळ घेऊन स्वातंत्र्य सेनानी उत्तर अधिकारी यांच्या मागणीसाठी बैठव लावण्यात येणार आहे.यांची जबाबदारी निलेशभई कोठारी याच्यावर देण्यात आलेली आहे.*
बैठकीत
सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले आहे. राष्ट्रीय उपाध्यक्ष सुनील गोपालदास गुजराती यांना बैठकीत नियुक्तीपत्र प्रदान करून गौरविण्यात आले. विविध राज्यांतील नवनियुक्त पदाधिकाऱ्यांनाही नियुक्तीपत्रे देण्यात आली. आसाम युनिटच्या वतीने पारंपरिक ‘पटका’ परिधान करून पदाधिकाऱ्यांचा विशेष सन्मान करण्यात आला.
राष्ट्रीय अध्यक्ष देशबंधूजी यांनी स्वातंत्र्यसैनिकांचा त्याग, राष्ट्रप्रेम, संघर्ष आणि सामाजिक बांधिलकीचा वारसा पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचविण्याचे आवाहन केले.
बैठकीस मृगांक शेखर आनंद, चंद्रप्रकाश वाजपेई, सुबेदार विजेंद्र सिंह, ए. वेद रत्नम, ओमप्रकाश मांझी, कमलचंद्र लहकर, मोनोतोष दास, माल रेड्डी राजशेखर, कपूर सिंह दलाल, अनुराग सिंह गौतम, आदित्य कुमार गहलोत, राजेश प्रताप सिंह, परमजीत सिंह टीवाना, सुषमा शर्मा, नीलेशभई कोठारी,कबीर तांबोळी,डॉ. अमरनाथ, दिव्याकांत झा, डॉ. उषा किरण बाजपेई, दीपा दास,आदित्य प्रताप सिंह रघुवंशी यांच्यासह विविध राज्यांतील पदाधिकारी व कार्यकारिणी सदस्य उपस्थित होते.
बैठकीचा समारोप राष्ट्रगीताने झाला. येत्या २६ ऑक्टोबर रोजी अमरकंटक येथे होणाऱ्या स्वातंत्र्यसैनिक संमेलनास देशभरातील परिवारांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले.


