Friday, September 25, 2026
Google search engine
HomeUncategorizedक्रॉम्प्टन सादर करत आहे घरांना उजळवण्यासाठी 'गॅलेक्सी फेस्टिव्ह लाईट्स'ची नवीन श्रेणीi

क्रॉम्प्टन सादर करत आहे घरांना उजळवण्यासाठी 'गॅलेक्सी फेस्टिव्ह लाईट्स'ची नवीन श्रेणीi

 

 

वैविध्याने नटलेली विशिष्ट डिझाईन्स, चैतन्यमय प्रकाश आणि विविध प्रकारांसह ही नवीन श्रेणी सणांच्या सजावटीसाठी उत्तम पर्याय

 

सादर करते.

 

मुंबई, 23 सप्टेंबर 2026: सणासुदीच्या काळातील रोषणाई ही सण साजरे अविभाज्य घटक बनली आहे जी सणाच्या सजावटीत रंग, ऊब

आणि स्वत:च्या वैशिष्ट्य़ांची भर जोडते. ग्राहकांच्या सणाचा आनंद वाढवण्यात त्याचे महत्त्व ओळखून क्रॉम्प्टन ग्रीव्हज कंझ्युमर

इलेक्ट्रिकल्स लिमिटेड ने आपली नवीन गॅलेक्सी फेस्टिव्ह लाईट्स रेंज (Galaxy Festive Lights Range) बाजारात आणली आहे.

हल्ली, ग्राहक सणासुदीच्या रोषणाईला उत्सव आणि घराच्या सजावटीचा एक अविभाज्य भाग मानतात आणि ते केवळ साध्या

रोषणाईच्या पेक्षा सौंदर्यदृष्ट्या आकर्षक, ऊर्जा-कार्यक्षम, सहज लावता येणार्‍या आणि सणासुदीचे वातावरण अधिक खुलवणाऱ्या

उपायांच्या शोधात असतात. सणासुदीची सजावट वैयक्तिक शैली व्यक्त करण्याचा, घरांना वेगळेपण देण्याचा आणि अविस्मरणीय

अनुभव निर्माण करण्याचा एक मार्ग बनत आहे आणि हे लक्षात ठेवून, गॅलेक्सी फेस्टिव्ह लाइट्स रेंज आकर्षक आणि स्टायलिश

डिझाइन, उज्ज्वल प्रकाश, विश्वसनीय कार्यक्षमता आणि वापरण्यास सुलभ असलेले उच्च-गुणवत्तेचे सणासुदीचे विविध पर्यायांचा

मिलाप घडवते, जे वेगवेगळ्या सजावटीच्या शैली आणि सणासुदीच्या समारंभांसाठी पर्याय देतात.

क्रॉम्प्टनची गॅलेक्सी फेस्टिव्ह लाइट्स रेंज विविध सणांच्या सजावटीसाठी वैशिष्ट्यपूर्ण डिझाइन आणि प्रकाश परिणाम असलेल्या

उत्पादनांची एक वैविध्यपूर्ण निवड एकत्र करते:

• लीफ (पान): पानांपासून प्रेरित आकारात डिझाइन केलेले, 'लीफ' सणाच्या सजावटीला एक नैसर्गिक सजावटीचा स्पर्श देते. त्याचा

उबदार 3000K प्रकाश तोरण, फुले आणि दिवे यांसारख्या पारंपरिक सजावटीस पूरक ठरतो व ते प्रवेशद्वार, खिडक्या आणि

घरातील कोपऱ्यांसाठी अतिशय योग्य ठरते. 180 एलईडी दिवे, 5 वॉट पॉवर, 4-मीटर लांबी आणि 8 लाइटिंग प्रकारांतून ते एक

उबदार आणि वैविध्यपूर्ण सजावटीची चमक देते

• स्नोबॉल (बर्फाचा गोळा): गोलाकार डिझाइन आणि RGB प्रकाशयोजनेतून, 'स्नोबॉल' सणाच्या सजावटीमध्ये एक खेळकर आणि

रंगीबेरंगी पैलू आणतो. त्याची 10-मीटर लांबी गच्ची, कठडा, खिडक्या आणि इतर मोठ्या जागांसाठी योग्य आहे तर त्याचे 50

एलईडी दिवे आणि अनेक लाइटिंग प्रकार विविध प्रकाश परिणाम तयार करण्यासाठी वाव देतात.

• डायमंड (हिरा): वैशिष्ट्यपूर्ण हिऱ्यापासून प्रेरित डिझाइन असलेले, 'डायमंड' सणाच्या सजावटीला एक आधुनिक, स्वत:ची ओळख

असलेला स्पर्श देते. त्याची RGB प्रकाशयोजना आणि 10-मीटर लांबी, गच्ची, प्रवेशद्वार आणि इतर प्रमुख ठिकाणी आकर्षक

बॉर्डर आणि प्रदर्शन तयार करण्यासाठी उपयुक्त ठरते, तर त्याचे 50 एलईडी दिवे आणि अनेक लाइटिंग प्रकारांमुळे विविध प्रकारचे

प्रकाश परिणाम साधता येतात.

• पिक्सेल: त्याच्या वैविध्यपूर्ण स्वरूपामुळे, सणासुद्तील सजावटीत रंग आणि स्वत:ची ओळख देण्यासाठी पिक्सेलचा वापर

खिडक्या, शेल्फ, गच्ची, फर्निचर आणि घरातील इतर ठिकाणी केला जाऊ शकतो. हे अनुक्रमे 48 आणि 72 एलईडी दिव्यांसह 10

आणि 15 मीटर लांबीमध्ये उपलब्ध आहेत, आणि ते वॉर्म व्हाइट, ब्लू, ग्रीन, रेड, पिंक आणि कलर यांसारख्या रंगांच्या

पर्यायांमध्ये येते. यामुळे ग्राहक त्यांची प्रकाशयोजना सणासुदीच्या विविध सजावटीच्या थीम्सशी जुळवू शकतात.

• स्पार्कल: लवचिक तांब्याच्या तारेने डिझाइन केलेले स्पार्कल वापरून, सजावटीच्या प्रकारांनुसार आकार देऊन नाजूक रोषणाई

तयार करता येते. त्याची 10-मीटर लांबी, एक मीटर मध्ये 300 एलईडी दिवे आणि 8 फंक्शन मोड्समुळे ते सजावटीचे बारकावे,

झाडे आणि कोपरे उठून दिसण्यासाठी उपयुक्त ठरते. वॉर्म व्हाइट आणि मल्टीकलर रंगांमध्ये उपलब्ध असलेले हे उत्पादन, सौम्य

तसेच अधिक झगझगीत प्रकाश असे दोन्ही पर्याय देते.

 

Publi

c

संपूर्ण श्रेणीतील हे गॅलेक्सी फेस्टिव्ह लाइट्स वापरण्यास सुलभ, विश्वसनीय कार्यक्षमता आणि ऊर्जा-कार्यक्षम प्रकाशयोजना यासाठी

डिझाइन केलेले आहेत. यांत टिकाऊ प्लग आणि BIS-अनुरूप इनपुट वायर्स आहेत. या लाइट्समध्ये भारतीय सॉकेट्स आणि

जॉइंटर्ससह वापरता येणार्‍या पिन्स आहेत, तर उच्च-गुणवत्तेचे एलईडी दिवे तेजस्वी प्रकाश देतात आणि एका विश्वसनीय लाइटिंग

ब्रँडकडून अपेक्षित गुणवत्ता व विश्वसनीयता देऊ करतात.

या लॉन्चबद्दल बोलताना, क्रॉम्प्टन ग्रीव्हज कंझ्युमर इलेक्ट्रिकल्स लि. च्या लायटिंग विभागाचे व्यवसाय प्रमुख, श्री. शालीन

नायक म्हणाले, “सणासुदीची रोषणाई आता केवळ जागा प्रकाशमय करण्यासाठी मर्यादित राहिलेली नाही; ती आता सणासुदीचाच

एक महत्त्वाचा भाग बनली आहे. ग्राहक आता रोषणाईकडे आपल्या घरांना एक वेगळेपण देण्याचे आणि प्रसंगाला साजेसे

वातावरण निर्माण करण्याचे साधन म्हणून पाहत आहेत. गॅलेक्सी फेस्टिव्ह लाइट्स रेंजच्या माध्यमातून, आम्ही क्रॉम्प्टनचे

रोषणाईमधील कौशल्य या क्षेत्रात सादर करत आहोत. ही रेंज डिझाइन, कार्यक्षमता आणि विश्वासार्हता यांचा मिलाप साधते,

ज्यामुळे ग्राहकांना त्यांचे उत्सव अधिक प्रकाशमय, उजळलेले करताना आत्मविश्वास मिळतो.”

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments