Saturday, September 26, 2026
Google search engine
HomeUncategorizedविद्यार्थ्यांनी रेखाटला ‘स्वप्नातला भारत’; भारतीय जैन संघटनेच्या शाळेत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि...

विद्यार्थ्यांनी रेखाटला ‘स्वप्नातला भारत’; भारतीय जैन संघटनेच्या शाळेत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि कामगारनेते यशवंतभाऊ भोसले यांच्या वाढदिवसानिमित्त चित्रकला उपक्रम

 

 

पिंपरी (प्रतिनिधी) दिनांक 26 सप्टेंबर 2026:- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त देशभर राबविण्यात आलेल्या ‘स्वप्नातला भारत’ या उपक्रमांतर्गत भारतीय जैन संघटनेच्या शाळेत विद्यार्थ्यांसाठी विशेष चित्रकला कार्यक्रमाचे आयोजन भारतीय जनता पार्टी संत तुकाराम नगरच्या वतीने करण्यात आले होते.कामगारनेते यशवंतभाऊ भोसले यांच्या वाढदिवसाचे (दि.26) औचित्य साधून हा उपक्रम घेण्यात आला.या कार्यक्रमात शेकडो विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेत आपल्या कल्पनेतील भारत चित्रांच्या माध्यमातून साकारला. विद्यार्थ्यांनी रेखाटलेल्या चित्रांमधून विकसित, सक्षम आणि प्रगत भारताचे स्वप्न मांडण्यात आले.यावेळी विद्यार्थ्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि कामगारनेते यशवंतभाऊ भोसले यांच्या वाढदिवसानिमित्त लाडू-चिवडा व अल्पोपहाराचे वाटप करण्यात आले.

 

कार्यक्रमाला शाळेचे प्राचार्य देशमुख सर, उपप्राचार्य जाधव सर, यादव सर, भारतीय जनता पक्षाचे कोअर कमिटी सदस्य सदाशिवराव खाडे, माजी नगरसेवक तथा भाजप महिला मोर्चाच्या पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष सुजाताताई पालांडे यांच्यासह मंगेश धाडगे, महेंद्र बाविस्कर, अभय फाळके, राहुल खाडे, अमोल घोरपडे, दीपक पाटील, दिनेश पाटील, जयदेव अक्कलकोटे, तात्याराव गायकवाड, राहुल शितोळे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

 

यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना कामगारनेते यशवंतभाऊ भोसले म्हणाले की, “उद्याचा भारत म्हणजे तुम्ही विद्यार्थी आहात. भारताचे नाव जागतिक स्तरावर उंचावण्यासाठी तुम्हीही मोठे ध्येय ठेवले पाहिजे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताला जागतिक स्तरावर नवी ओळख मिळवून दिली आहे. त्याचप्रमाणे तुम्हीही भविष्यात मोठे होऊन देशाची मान जगात उंच करा.”

विशेषतः दहावीच्या विद्यार्थ्यांना त्यांनी आगामी परीक्षेसाठी शुभेच्छा दिल्या. तसेच सदाशिवराव खाडे, सुजाताताई पलांडे आणि प्राचार्य देशमुख सर यांनी यशवंतभाऊ भोसले यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देत विद्यार्थ्यांच्या या उपक्रमाचे कौतुक केले.

 

‘स्वप्नातला भारत’ या संकल्पनेतून विद्यार्थ्यांच्या कल्पनाशक्तीला व्यासपीठ देतानाच देशाच्या उज्ज्वल भविष्यासाठी नव्या पिढीमध्ये सकारात्मक विचार रुजविण्याचा संदेश या उपक्रमातून देण्यात आला.

 

 

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments