Saturday, September 26, 2026
Google search engine
HomeUncategorizedविक्रमी गर्दीतही वीजपुरवठा अखंडित; महावितरणच्या ‘टीमवर्क’ला सलाम! पूर्वनियोजन, सतर्कता आणि लाईन...

विक्रमी गर्दीतही वीजपुरवठा अखंडित; महावितरणच्या ‘टीमवर्क’ला सलाम! पूर्वनियोजन, सतर्कता आणि लाईन स्टाफच्या अथक परिश्रमामुळे गणेश विसर्जन मिरवणूक निर्विघ्न

पुणे, प्रतिनिधी : पुणे शहरातील लक्ष्मी रोड येथील ऐतिहासिक गणपती विसर्जन मिरवणुकीसह खडकी, शिवाजीनगर, गावठाण, वडारवाडी, रामोशीवाडी, गोखलेनगर, सुस रोड तसेच इतर परिसरात यंदा मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी झाली. मात्र, या विक्रमी गर्दीतही महावितरणने अत्यंत सतर्कतेने काम करत अखंडित आणि सुरक्षित वीजपुरवठा राखण्यात यश मिळविले.

 

विसर्जन मिरवणुकीपूर्वीच महावितरणकडून पूर्वनियोजन, प्रतिबंधात्मक देखभाल, तांत्रिक तपासणी आणि आपत्कालीन यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली होती. मिरवणूक सुरू झाल्यानंतरही अधिकारी आणि लाईन स्टाफने प्रत्यक्ष ठिकाणी सतर्क राहून परिस्थितीवर लक्ष ठेवले. त्यामुळे कोणताही मोठा वीजविषयक अडथळा निर्माण न होता गणेशभक्तांना सुरक्षित वातावरणात मिरवणुकीचा आनंद घेता आला.

 

या संपूर्ण नियोजनासाठी मुख्य अभियंता श्री. पडळकर साहेब, अधीक्षक अभियंता श्री. गायकवाड साहेब आणि कार्यकारी अभियंता श्री. थिटे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली अधिकारी व कर्मचाऱ्यांनी जबाबदारी पार पाडली.

 

तसेच अतिरिक्त कार्यकारी अभियंता भिवसानी मॅडम आणि मोदी गणपती शाखेच्या शाखा अभियंता सेगलारू मॅडम यांच्या नेतृत्वाखाली संबंधित लाईन स्टाफ आणि कर्मचाऱ्यांनी मिरवणुकीदरम्यान महत्त्वाची भूमिका बजावली.

 

दरम्यान, डायरेक्टर कमर्शियल श्री. अग्रवाल साहेब यांनी महावितरणच्या कंट्रोल रूमला भेट देऊन प्रत्यक्ष परिस्थितीची पाहणी केली. त्यांनी उपस्थित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे कौतुक करत त्यांचे मनोबल वाढविले. त्यांच्या या भेटीमुळे संपूर्ण टीमला आणखी प्रोत्साहन मिळाले.

 

महावितरणच्या अधिकारी, अभियंते, लाईन स्टाफ आणि सर्व कर्मचाऱ्यांच्या एकजुटीच्या प्रयत्नांमुळे आणि अथक परिश्रमांमुळे एवढ्या मोठ्या गर्दीतही वीजपुरवठा सुरळीत ठेवणे शक्य झाले. गणरायाच्या विसर्जन मिरवणुकीत वीजसेवा सुरळीत ठेवून महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी गणरायाची सेवा आणि समाजसेवा करण्याचे कर्तव्य बजावले.

 

या उल्लेखनीय कामगिरीबद्दल शिवाजीनगर–गणेशखिंड उपविभागाच्या वतीने अतिरिक्त कार्यकारी अभियंता अमित अशोक भरते यांनी सर्व अधिकारी, अभियंते, लाईन स्टाफ आणि कर्मचारी बंधू-भगिनींचे मनःपूर्वक अभिनंदन व आभार व्य

क्त केले.

 

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments