Wednesday, August 19, 2026
Google search engine
HomeUncategorizedएस समर गेम्स 2024 मध्ये सात क्रिडा प्रकारांचा समावेश क्रीडा महोत्सव...

एस समर गेम्स 2024 मध्ये सात क्रिडा प्रकारांचा समावेश क्रीडा महोत्सव 8ते 14एप्रिल दरम्यान रंगणार

पुणे, 5 एप्रिल 2024: खिलाडूपणा, बंधुभाव आणि खेळाडू असल्याचा अभिमान या सगळ्याचे मिश्रण असलेला पुणेकरांचा आवडता एस समर गेम्स 2024 हा क्रिडा महोत्सव 8ते 14 एप्रिल दरम्यान मुंढवा येथील चंचला कोद्रे स्पोर्टस कॉम्प्लेक्स या ठिकाणी रंगणार आहे. या एस समर गेम्स 2024चे आयोजन ईगल आय सोल्युशन्स आणि टू एल्व्हस क्राफ्टेड सोल्युशन्स यांच्या वतीने करण्यात आले आहे.

 

या आगळ्या वेगळ्या क्रिडा महोत्सवात बॉक्स क्रिकेट, फुटसाल, बॅडमिंटन, टेबल टेनिस, टेनिस, स्क्वॉश आणि पेडल टेनिस या सात क्रिडा प्रकारांचा समावेश असून विजेतेपदासाठी जिल्ह्यातील सर्व भागांतील अव्वल खेळाडू आपले कौशल्य पणाला लावणार आहे.

 

एस समर गेम्स ही केवळ क्रिडा स्पर्धा नसून अनेकांसाठी स्वप्नपुर्ती आणि असंख्य मित्र मिळवण्याचे ठिकाण आहे. सुमारे 1000हून अधिक स्पर्धकांचा सहभाग असल्यामुळे प्रत्येक खेळात चुरशीच्या लढती पाहायला मिळणार आहे.

 

अत्यंत चुरशीच्या अशा या स्पर्धेच्या नव्या आवृत्तीचे आयोजन करताना आम्हाला आनंद होत आहे. केवळ खडतर स्पर्धा करण्याचे ठिकाण नसून हि स्पर्धा बंधुभाव आणि खेळाडूवृत्ती यांचे प्रतीक ठरेल. यंदाची स्पर्धा सर्वात भव्य आणि दर्जेदार ठरावी असाच आमचा प्रयत्न आहे.

 

एस समर गेम्ससाठी नावनोंदणी सुरू झाली असून 7 एप्रिल 2024 ही नावनोंदणीसाठी अंतिम तारीख आहे. विविध खेळांमध्ये आपली गुणवत्ता सिद्ध करण्यासाठी उत्सुक असलेल्या खेळाडूंनी आपला सहभाग लवकर निश्चित करावा. स्पर्धकांनी https://www.eagleeyesolutions.org या सांकेतिक स्थळावर आपली नावनोंदणी करण्याचे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments