Tuesday, September 29, 2026
Google search engine
HomeUncategorizedतेलंगणात भारतातील पहिल्या सर्वसमावेशक ऑइल पाम संकुलाचे गोदरेज ॲग्रोव्हेटकडून उद्घाटन

तेलंगणात भारतातील पहिल्या सर्वसमावेशक ऑइल पाम संकुलाचे गोदरेज ॲग्रोव्हेटकडून उद्घाटन

300 कोटी रुपयांची एकत्रित गुंतवणूक; कंपनीच्या विस्तार योजनांना बळ देण्यासाठी सीड-टू-रिफाइनरी (बियाण्यापासून ते शुद्धीकरण प्रकल्प) संकुल

 

20 जुलै 2026: भारतातील फार्म-टू-प्रोटिन क्षेत्रातील सर्वात मोठ्या प्लॅटफॉर्म्सपैकी एक असलेल्या गोदरेज ॲग्रोव्हेट लिमिटेडने (Godrej Agrovet) तेलंगणातील खम्मम येथे भारतातील पहिल्या इंटिग्रेटेड ऑइल पाम कॉम्प्लेक्सचे आज उद्घाटन केले. या संकुलात ऑइल पाम मूल्य साखळीतील सर्व टप्पे – जसे की बियाणे आणि जेनेटिक्स, रोपवाटिका, संशोधन व विकास (R&D) केंद्र, मिल आणि होऊ घातलेली अत्याधुनिक रिफायनरी – एकाच छताखाली आणण्यात आले आहेत. हे संपूर्ण संकुल कार्यान्वित झाल्यावर कंपनीची एकूण गुंतवणूक 300 कोटी रुपये इतकी असेल.

 

तेलंगणा सरकारचे उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन आणि ऊर्जा मंत्री श्री. भट्टी विक्रमार्क मल्लू गारू यांच्या हस्ते या संकुलाचे उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी तेलंगणा सरकारचे महसूल व गृहनिर्माण आणि माहिती व जनसंपर्क मंत्री श्री. पोंगुलती श्रीनिवास रेड्डी गारू; कृषी, पणन, सहकार आणि हातमाग व वस्त्रोद्योग मंत्री श्री. तुम्मला नागेश्वर राव गारू; माहिती तंत्रज्ञान (ITE&C), उद्योग व वाणिज्य आणि संसदीय कामकाज मंत्री श्री. डी. श्रीधर बाबू गारू आणि खम्ममचे खासदार श्री. रामासहायम रघुराम रेड्डी गारू हे उपस्थित होते.

 

तसेच, या कार्यक्रमाला गोदरेज इंडस्ट्रीज ग्रुपचे अध्यक्ष नादिर गोदरेज; गोदरेज ॲग्रोव्हेटचे नियुक्त अध्यक्ष बुर्जिस गोदरेज; गोदरेज ॲग्रोव्हेटचे व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी सुनील कटारिया; गोदरेज ॲग्रोव्हेटच्या ऑइल पाम व्यवसायाचे मुख्य कार्यकारी अधिकारी सौगता नियोगी आणि गोदरेज इंडस्ट्रीज ग्रुपचे कॉर्पोरेट व्यवहार विभागाचे गट अध्यक्ष राकेश स्वामी हे देखील उपस्थित होते.

 

या प्रसंगी तेलंगणा सरकारचे माननीय उपमुख्यमंत्री आणि वित्त व नियोजन तसेच ऊर्जा मंत्री श्री. भट्टी विक्रमार्क मल्लू म्हणाले, “तेलंगणाच्या ऑइल पाम मिशनसाठी आणि राज्याला खाद्यतेलाचे प्रमुख उत्पादक बनवण्याच्या आमच्या ध्येयासाठी हे संकुल हा एक महत्त्वपूर्ण टप्पा आहे. तेलंगणाचे ऑइल पाम मिशन देशाची खाद्यतेल सुरक्षा बळकट करण्यासोबतच लाखो शेतकरी कुटुंबांचे जीवनमान उंचावते आहे; आणि ऑइल पाम क्षेत्रातील गोदरेज ॲग्रोव्हेटची सखोल जाण पाहता, हे ध्येय साध्य करण्यासाठी ते आमचे योग्य भागीदार आहेत. खम्मम येथे बियाण्यापासून ते रिफायनरीपर्यंतची क्षमता उपलब्ध करून देणारे हे संकुल त्या कौशल्याचे प्रतिबिंब आहे. मला खात्री आहे की, यामुळे आमच्या मोहिमेला गती मिळेल आणि ऑइल पाम उत्पादक शेतकऱ्यांच्या जीवनात आमूलाग्र बदल होतील.”

 

“तेलंगणा सरकारची दूरदृष्टी आणि खंबीर पाठिंब्याशिवाय हे सर्व शक्य झाले नसते. ज्या भागीदारीमुळे आम्ही या महत्त्वाच्या टप्प्यावर पोहोचलो आहोत, ती भागीदारी आमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे,” असे गोदरेज ॲग्रोव्हेटचे नियुक्त अध्यक्ष बुर्जिस गोदरेज म्हणाले.

 

ते पुढे म्हणाले, “हा प्रकल्प म्हणजे केवळ पायाभूत सुविधांमधील गुंतवणूक नाही, तर खाद्यतेलाच्या क्षेत्रात आत्मनिर्भर अर्थव्यवस्था निर्माण करण्याच्या व्यापक राष्ट्रीय उद्दिष्टासाठी दिलेले आमचे योगदान आहे. अशा प्रकारचा हा भारतातील पहिलाच प्रकल्प असल्याने, शाश्वत ऑइल पाम शेतीसाठी एकात्मिक दृष्टिकोन स्वीकारल्यास काय साध्य होऊ शकते, याचा हा एक आदर्श वस्तुपाठ आहे. भविष्यासाठी आमची वचनबद्धता कायम आहे: अशी क्षमता निर्माण करणे, जी आज आपल्या शेतकऱ्यांच्या उपयोगी पडेल आणि आगामी पिढ्यांसाठी देशाची अन्नसुरक्षा अधिक बळकट करेल.”

 

या संकुलाचा एक भाग म्हणून, गोदरेज ॲग्रोव्हेटने जागतिक स्तरावरील आघाडीच्या कंपन्यांसोबत भागीदारी करत एक सीड गार्डन विकसित केले आहे. याद्वारे ऑइल पामच्या जनुकशास्त्रातील त्यांचे कौशल्य भारतात आणले जात आहे. ही भागीदारी आणि संकुलातील संशोधन व विकास केंद्र, तेलंगणाच्या स्थानिक हवामान परिस्थितीशी जुळवून घेणारी आणि त्यासाठी अनुकूल अशी संकरित लागवड सामग्री विकसित करण्याच्या कंपनीच्या प्रयत्नांना बळ देतील.

 

या संकुलातील प्रक्रिया प्रकल्प (मिल) – जो राज्यातील एखाद्या खासगी कंपनीचा अशा प्रकारचा पहिलाच प्रकल्प आहे – ताशी 30 टन क्षमतेसह कार्यान्वित झाला आहे. या प्रकल्पाची रचना अशा प्रकारे करण्यात आली आहे की, त्याची क्षमता भविष्यात ताशी 60 टनांपर्यंत वाढवता येईल; यामुळे, 2030 पर्यंत राज्यातील लागवडीखालील क्षेत्र सध्याच्या 10,000 हेक्टरवरून 30,000 हेक्टरपर्यंत वाढवण्याच्या उद्दिष्टाशी सुसंगत अशी प्रक्रिया क्षमता वाढवणे कंपनीला शक्य होईल.

 

या संकुलात समाधान केंद्र देखील आहे, जो कंपनीचा प्रमुख उपक्रम असून पाम तेल शेतकऱ्यांसाठी एक-खिडकी उपक्रम म्हणून काम करतो आणि त्यांना सल्लागार सहाय्य, शेतीसाठी लागणारे साहित्य तसेच इतर सेवा पुरवतो.

 

प्रत्येक उच्च-क्षमता असलेल्या व्यवसायाकडे ज्या दृष्टिकोनातून पाहतो, त्याच दृष्टिकोनातून आम्ही या संकुलाकडेही पाहिले आहे – म्हणजेच, पायाभूत गोष्टी पक्क्या होण्यापूर्वीच विस्तार करण्याऐवजी, योग्य क्षमतांमध्ये सुरुवातीलाच गुंतवणूक करणे. संपूर्ण पाम तेल मूल्य साखळी एकाच छताखाली आल्याने, आम्हाला गुणवत्ता आणि सातत्य यावर अधिक नियंत्रण मिळते. तसेच, शेतकरी कुटुंबांचे सक्षमीकरण करत देशाच्या खाद्यतेल सुरक्षेच्या प्रवासात नेतृत्व करण्याच्या तेलंगणाच्या क्षमतेवरील आमचा विश्वास यातून दिसून येतो. या पायावर उभारणी करण्यासाठी आणि आमच्या शेतकऱ्यांना तसेच हितधारकांना सातत्यपूर्ण, दीर्घकालीन मूल्य प्रदान करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत,” असे गोदरेज ॲग्रोव्हेटचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी, सुनील कटारिया म्हणाले.

 

हे उद्घाटन कंपनीच्या पाम तेलाच्या प्रवासातील एक महत्त्वपूर्ण टप्पा आहे. भारताला जागतिक शाश्वत पाम तेलाच्या नकाशावर आणण्यासाठी सरकार आणि शेतकरी भागीदारांसोबत मिळून काम करण्या

स कंपनी कटिबद्ध आहे.

 

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments