Tuesday, September 29, 2026
Google search engine
HomeUncategorizedनागरिकांनी कचरा करताना स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या कष्टांची जाणीव ठेवावी अपर पोलीस आयुक्त राजेश...

नागरिकांनी कचरा करताना स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या कष्टांची जाणीव ठेवावी अपर पोलीस आयुक्त राजेश बनसोडे अखिल मंडई मंडळाच्या वतीने स्वच्छता कर्मचाऱ्यांचा कृतज्ञता सन्मान सोहळा

पुणे : गणेशोत्सव आणि विसर्जन मिरवणुकीनंतर शहर स्वच्छ ठेवण्यासाठी काम करणाऱ्या स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या कष्टांची जाणीव प्रत्येकाने ठेवली पाहिजे. आपण किती कचरा करतो, याचे भान असणे आवश्यक असून स्वच्छतेची अपेक्षा ठेवताना स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या कष्टांचा विचार केला पाहिजे, असे मत अपर पोलीस आयुक्त राजेश बनसोडे यांनी व्यक्त केले.

 

अखिल मंडई मंडळाच्या वतीने गणेशोत्सव आणि विसर्जन मिरवणुकीनंतर शहराची स्वच्छता करणाऱ्या सफाई कर्मचाऱ्यांचा कृतज्ञता सन्मान सोहळा मंडई जवळील उत्सव मंडपात आयोजित करण्यात आला होता. यावेळी अद्वैत परिवाराचे संस्थापक संतोष डिंबळे, पालिकेचे आरोग्य निरीक्षक मिलिंद खानदोडे, लोकमान्य मल्टिपर्पज को. ऑप सोसायटीचे सहाय्यक क्षेत्रीय प्रबंधक हर्षद झोडगे, अखिल मंडई मंडळाचे अध्यक्ष अण्णा थोरात, खजिनदार संजय मते, सचिव विश्वास भोर, देविदास बहिरट, सामाजिक कार्यकर्ते आनंद सराफ, सूरज थोरात आदी उपस्थित होते. स्वच्छता कर्मचाऱ्यांचा भेटवस्तू, मानाचे उपरणे आणि मिठाई देऊन सन्मान करण्यात आला. कार्यक्रमात अद्वैत परिवार संस्थेच्या ११ दिव्यांग कर्तृत्ववान युवकांचा विशेष सन्मान करण्यात आला.

 

राजेश बनसोडे म्हणाले, अखिल मंडई मंडळातर्फे योग्य लोकांचा सन्मान होत आहे. प्रत्येकाला नागरिक म्हणून स्वच्छतेचे भान असतेच असे नाही. शहर स्वच्छ असावे, अशी अपेक्षा सर्वांची असते; मात्र स्वच्छतेचे कठीण काम स्वच्छता कर्मचारी न चुकता करतात. त्यांच्या कष्टांची जाणीव ठेवणे गरजेचे आहे.

 

अण्णा थोरात म्हणाले, कष्टकऱ्यांच्या सन्मानाची परंपरा मंडळाच्या वतीने आजतागायत सुरू आहे. विसर्जन मिरवणुकीत रथाच्या मागून स्वच्छता कर्मचारी काम करत असल्याने परिसर लगेच स्वच्छ होतो. या हातांचा सन्मान होणे गरजेचे आहे. त्यामुळे गेल्या ३० वर्षांपासून हा सन्मान सोहळा आयोजित करण्यात येत आहे.

 

संतोष डिंबळे, हर्षल झोडगे यांनी मनोगत व्यक्त केले. आनंद सराफ यांनी सूत्रसंचा

लन केले.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments