भारतीय स्वयंपाकपद्धतीचा विचार करून विकसित केलेली आधुनिक लोखंडी मिश्रधातूची कुक्वेअर रेंज ; पारंपरिक स्वयंपाकातील कार्यक्षमता आणि आधुनिक डिझाइनचा संगम
पुणे, सप्टेंबर २०२६ : जगभरातील हाऊसवेअर क्षेत्रातील प्रसिद्ध ब्रँड ट्रामॉन्टिनाने भारतीय स्वयंपाकघरातील गरजा लक्षात घेऊन ‘हेरिटेज आयर्न’ ही आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित कुकवेअर श्रेणी सादर केली आहे. भारतीय स्वयंपाकपद्धतीमध्ये लोखंडी कुक्वेअर पारंपरिक महत्त्व आहे. टिकाऊपणा, उष्णता टिकवून ठेवण्याची क्षमता आणि विविध प्रकारच्या पदार्थांसाठी उपयुक्तता यामुळे भारतीय स्वयंपाकघरांमध्ये आजही महत्त्वाचे स्थान आहे.
तवा, कढई, अप्पेचट्टी यांसारखी लोखंडी भांडी आजही अनेक भारतीय स्वयंपाक घरांमध्ये वापरली जातात. मात्र, बदलत्या जीवनशैलीनुसार ग्राहकांना पारंपरिक गुणांसोबतच हाताळण्यास सुलभ, अधिक टिकाऊ आणि आधुनिक स्वरूपातील कुकवेअरची अपेक्षा आहे. पारंपरिक लोखंडी भांड्यांची स्वयंपाकातील कार्यक्षमता कायम ठेवत त्यामध्ये अधिक टिकाऊपणा, वापरातील सुलभता आणि आधुनिक डिझाइनचा समावेश या श्रेणीत करण्यात आला आहे.
पारंपरिक भारतीय पदार्थांसाठी उपयुक्त कुक्वेअर वोकसारख्या आधुनिक प्रकारांचाही या श्रेणीत समावेश आहे. प्रत्येक भांडे कार्यक्षमता, टिकाऊपणा आणि दैनंदिन वापरातील सुलभता यांचा समतोल साधण्यासाठी तयार करण्यात आले आहे.
पारंपरिक लोखंडी भांड्यांमध्ये आढळणारी उष्णता टिकवून ठेवण्याची क्षमता या कुकवेअरमध्ये असून, त्यासोबत अधिक प्रतिसादक्षम स्वयंपाकाचा अनुभव देण्यासाठी त्याची रचना करण्यात आली आहे. कुकिंग सरफेसवर प्री-सीझनिंग आणि सँडब्लास्टिंग प्रक्रिया केली जाते. तसेच नायट्रायडिंग तंत्रज्ञानामुळे पृष्ठभागाची कठीणता वाढण्यास मदत होते आणि गंज पासून अधिक प्रतिकार मिळतो. नियमित वापर आणि स्वयंपाकाच्या तेलामुळे होणाऱ्या सीझनिंगमुळे कालांतराने या पृष्ठभागावर नैसर्गिक नॉन-स्टिक गुणधर्म विकसित होऊ शकतात. यामध्ये सिंथेटिक नॉन-स्टिक कोटिंगचा वापर केलेला नाही.
पारंपरिक स्वयंपाकपद्धतींना आधुनिक स्वयंपाकघराशी जोडण्यासाठी कुकवेअरमध्ये ब्रश्ड ३०४ स्टेनलेस स्टील हँडल्स आणि रिव्हेट्स, टफन्ड ग्लास झाकणे तसेच आधुनिक आकाररचना यांचा वापर करण्यात आला आहे. विविध स्वयंपाकाच्या गरजांसाठी वेगवेगळ्या गेजमध्ये भांडी तयार करण्यात आली असून, उष्णता कार्यक्षमता, टिकाऊपणा आणि वजन यांचा दैनंदिन वापरासाठी योग्य समतोल साधण्यात आला आहे.
या श्रेणीच्या निर्मितीमध्ये टिकाऊपणाला विशेष महत्त्व देण्यात आले आहे. अनेक वर्षे वापरता यावीत, या पारंपरिक संकल्पनेला पुढे नेत ‘हेरिटेज आयर्न’ला ट्रामॉन्टिनाची लाइफटाइम वॉरंटी देण्यात आली आहे.त्यामुळे ही भांडी अनेक वर्षे दैनंदिन स्वयंपाकघराचा अविभाज्य भाग बनण्यासाठी डिझाइन करण्यात आली असल्याचे अधोरेखित होते.
₹२,७९५ पासून सुरू होणारी ट्रामोंटिनाची हेरिटेज आयर्न ही कुकवेअर श्रेणी ट्रामोंटिनाच्या वेबसाइटवर, प्रमुख ई-कॉमर्स आणि क्विक-कॉमर्स प्लॅटफॉर्मवर तसेच पुण्यातील निवडक किरकोळ विक्री केंद्रांमध्ये उपलब्ध आहे. यामध्ये रिलायन्स स्मार्ट बाजार आणि अलमोंटे यांसारख्या मॉडर्न ट्रेड स्टोअर्सचा, तसेच बाणेरमधील नीलम अँड सन्स, सहकारनगरमधील लक्ष्मी स्टील भांडार, मंडईतील तुळशी रिटेल आणि रविवार पेठेतील विक्रम मेटल्स यांसारख्या जनरल स्टोअर्सचा समा
वेश आहे.


