पिंपरी चिंचवड (प्रतिनिधी) दिनांक 29/9/2026:- मातंग समाजाच्या व इतर संपूर्ण जातीच्या शैक्षणिक आणि आर्थिक प्रगतीच्या संदर्भामध्ये मुंबई आझाद मैदान या ठिकाणी सकल मातंग समाजाच्या वतीने निर्धार महामोर्चाच आयोजन करण्यात आलं होतं यावेळी विधान परिषदेचे आमदार अमितजी गोरके सर , सा लो डॉ अण्णा भाऊ साठे यांचे वंशज सचिन साठे ,सुकुमार कांबळे ,अखिल भारतीय हिंदू मातंग संघाचे ज्येष्ठ नेते मार्गदर्शक नामदेव रिटे साहेब यांच्या सह आदी प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीमध्ये निर्धार महामोर्चा संपन्न झाला. यावेळी पिंपरी चिंचवड शहरातून हजारो मातंग बांधव सहभागी झाले होते.
यावेळी शिवशाही शासन पक्ष व अखिल भारतीय हिंदू मातंग संघ संस्थापक प्रमुख लोकसेवक युवराज गिरी दाखले यांनी आपली भूमिका मांडत असताना राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब त्यांच्या मंत्रिमंडळाला सोबत घेऊन उपवर्गीकरण तातडीने लागू करण्या संदर्भामध्ये विनंती केली.
महायुतीचे सरकार आणण्यासाठी बहुजन समाजाला सोबत मातंग समाजाचे अग्रगण्य भूमिका होती असे स्पष्ट मत दाखले यांनी मांडले मातंग समाजाच्या व इतर तत्सम पोटजातीच्या शैक्षणिक आणि आर्थिक प्रगतीसाठी उपवर्गीकरण होणं गरजेचं आहे ,यावेळी राज्यभरातून अखिल भारतीय हिंदू मातंग व शिवशाही शासन पक्षाचे हजारो पदाधिकारी व कार्यकर्ते या महामोर्चामध्ये समाविष्ट झाले होते.
दरम्यान छावा मराठा सेना प्रदेशाध्यक्ष सचिन आण्णा लिमकर व योगेश शितोळे सरकार यांनी मराठा समाजाच्या वतीने तसेच मुस्लिम समाजाच्या वतीने शिवशाही अल्पसंख्याक आघाडी प्रदेश अध्यक्ष हर्षद भाई खान यांनी सक्रीय जाहीर पाठिंबा दिला.
यावेळी जेष्ठ नेते नामदेवराव रिटे शिवशाही शासनपक्ष व अखिल भारतीय हिंदू मातंग संघाच्या महिला आघाडी अध्यक्ष नेत्या उषाबाई कांबळे, अखिल भारतीय हिंदू मात़ंग संघ पिंपरी चिंचवड शहर अध्यक्षा रुपालीताई केंगारे प्रदेश संघटक सुरज खंडागळे, प्रदेश अध्यक्ष कृष्णा साबळे,नाना राखडे, अर्चना शिंदे, अविनाश कांबीकर, जेष्ठ नेते शंकर भाऊ तडाखे, जेजुरी देवस्थान विश्वस्त अनिल सौंदडे, विक्रम गवळी,शरद गवळी, विलास गायकवाड,पप्पू कसबे,
तसेच सतिष पात्रे,बाळू गवारे, मंगेश गायकवाड, सन्नी डाडर, सुशील शिंदे,भारत भोसले अनिता वैरागर,गिता आडागळे,समिरा राजगुरू सुनिता बेंगळे सतिश भवाळ,संजय ससाणे, साहित्यरत्न लोकशाहीर डॉ अण्णा भाऊ साठे प्रबोधन पर्व अध्यक्ष गणेश अवघडे, यांच्या सह हजारो समाज बांधव क्रांतीसम्राट बाबासाहेब गोफले आझाद मैदान मुंबई या ठिकाणी उ
पस्थित होते.


