Wednesday, September 30, 2026
Google search engine
HomeUncategorizedसूर्या हॉस्पिटल्सकडून प्रौढ आणि बालकांसाठी कार्डियाक केअर केंद्र सूर्या हृदय स्पर्श लाँच

सूर्या हॉस्पिटल्सकडून प्रौढ आणि बालकांसाठी कार्डियाक केअर केंद्र सूर्या हृदय स्पर्श लाँच

जागतिक हृदय दिनाच्या निमित्ताने लाँच करण्यात आलेले हे केंद्र स्पेशलिस्ट टीम्स आणि क्रिटिकल केअर सुविधांच्या सहाय्याने प्रौढ, लहान मुले व महिलांसाठी एकाच छताखाली कार्डियाक केअर सेवा उपलब्ध करून देईल ~

मुंबई, २९ सप्टेंबर २०२६: सूर्या हॉस्पिटल्सने आज प्रौढ आणि बालकांसाठी कार्डियाक केअर केंद्र ‘सूर्या हृदय स्पर्श’च्या लाँचची घोषणा केली. महिला व बालकांच्या आरोग्य सेवेतील चार दशकांच्या प्रदीर्घ अनुभवावर आधारित या ग्रुपचा कार्डियाक केअर क्षेत्रातील हा महत्त्वाचा विस्तार आहे.

सूर्या हृदय स्पर्श जीवनातील प्रत्येक टप्प्यावरील रुग्णांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी डिझाइन करण्यात आले आहे, ज्यामध्ये जन्मतःच हृदयाशी संबंधित आजार असणाऱ्या नवजात बालकांपासून प्रतिबंधात्मक, इंटरव्हेंशनल किंवा सर्जिकल उपचारांची गरज असणाऱ्या प्रौढांपर्यंत सर्वांचा समावेश आहे. तसेच, हे केंद्र जनजागृती, प्राथमिक निदान आणि उपचारांसह महिलांच्या हृदयाच्या आरोग्यावरही विशेष भर देईल.

सूर्या हॉस्पिटल्सचे संस्थापक, चेअरमन आणि मॅनेजिंग डायरेक्टर डॉ. भूपेंद्र एस. अवस्थी म्हणाले, “गेल्या चार दशकांपासून हजारो कुटुंबांनी महिला व बालकांच्या आरोग्यासाठी सूर्या हॉस्पिटल्सवर अतूट विश्वास दाखवला आहे. सूर्या हृदय स्पर्श त्या विश्वासाचा विस्तार कार्डियाक केअर सेवेत करण्याचे महत्त्वाचे पाऊल आहे. आमचा रुग्णांना आणि त्यांच्या कुटुंबियांना आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वेळेवर सर्वोत्तम उपचार मिळावेत, यासाठी विशेष तज्ज्ञता आणि क्रिटिकल केअर सपोर्ट एकाच ठिकाणी एकत्र आणण्याचा मनसुबा आहे.”

सूर्या हृदय स्पर्श अंतर्गत पुढील सेवा दिल्या जातील:

निदान, इंटरव्हेंशनल कार्डिओलॉजी आणि गुंतागुंतीच्या हृदयविकारांवरील सर्जिकल उपचारांसह सर्वसमावेशक अॅडल्ट कार्डिओलॉजी आणि कार्डियाक सर्जरी सेवा.

नवजात बालक आणि मुलांमधील जन्मतः असलेल्या, तसेच नंतर उद्भवणाऱ्या हृदयविकारांचे निदान व उपचारांसाठी विशेष पीडियाट्रिक कार्डिओलॉजी आणि पीडियाट्रिक कार्डियाक सर्जरी प्रोग्राम.

प्रतिबंधात्मक आणि क्लिनिकल उपचारांमध्ये मोठ्या प्रमाणावर दुर्लक्षित राहिलेल्या महिलांच्या हृदयाच्या आरोग्यावर विशेष भर.

प्रौढ आणि बालरुग्ण या दोघांसाठीही विशेष कार्डियाक आयसीयू सुविधेसह अत्याधुनिक क्रिटिकल केअर आणि आयसीयू/पीआयसीयू सुविधा.

कार्डिओलॉजिस्ट्स, कार्डियाक सर्जन, पीडियाट्रिक कार्डियाक स्पेशलिस्ट्स आणि क्रिटिकल केअर तज्ज्ञांची बहुविद्याशाखीय टीम.

सूर्या हृदय स्पर्शचे अॅडवायजर व मेन्टोर डॉ. हरेश मेहता म्हणाले, “सूर्या हृदय स्पर्शमधून अचूक आणि रुग्णकेंद्रित निकषांनुसार प्रगत कार्डियाक सेवा प्रदान करण्याप्रती आमचा दृष्टिकोन दिसून येतो. सल्लागार आणि मार्गदर्शक म्हणून माझे सर्व वयोगटातील रुग्णांसाठी अद्ययावत इंटरव्हेंशनल तंत्रज्ञान आणि गुंतागुंतीच्या कार्डियाक प्रक्रिया सहज उपलब्ध करून देण्यावर लक्ष केंद्रित आहे; ज्यामुळे क्लिनिकल उत्कृष्टतेला संवेदनशीलता आणि विनासायास रुग्णसेवेची साथ मिळेल.”

सूर्या हृदय स्पर्शचे अॅडवायजर आणि कन्सल्टंट इंटरव्हेंशनल कार्डिओलॉजिस्ट डॉ. निशित चोक्षी म्हणाले, “आज इंटरव्हेंशनल कार्डिओलॉजी केवळ कोरोनरी आर्टरी आजारांच्या उपचारांपुरती मर्यादित राहिलेली नाही. कॅथेटर-आधारित आणि मिनिमली इन्वेसिव्ह थेरपींमधील प्रगतीमुळे आम्हाला योग्य रुग्णांमध्ये समकालीन शस्त्रक्रिया टाळून विविध रक्तवाहिन्यांशी संबंधित आणि नॉन-कार्डियाक आजारांवर उपचार करणे शक्य होत आहे. सूर्या हृदय स्पर्शमध्ये आमचा या विकसित तंत्रज्ञानाचा प्रत्यक्ष क्लिनिकल पद्धतींमध्ये वापर करण्यावर भर आहे. आमचा रुग्णांची सुरक्षितता आणि क्लिनिकल परिणामांवर पूर्ण लक्ष केंद्रित करून उपचारादरम्यान होणारा त्रास, हॉस्पिटलमधील मुक्काम आणि बरे होण्याचा कालावधी कमी करणारे प्रभावी उपचार पर्याय योग्य रुग्णांना उपलब्ध करून देण्याचा मनसुबा आहे.”

सूर्या हृदय स्पर्शचे सीनियर कार्डिओलॉजिस्ट डॉ. कयान सिओदिया म्हणाले, “सूर्या हृदय स्पर्शची खरी ताकद बहुविद्याशाखीय टीम आणि प्रबळ क्रिटिकल केअर व आपत्कालीन सेवांमध्ये आहे. विशेष कार्डियाक आयसीयू आणि २४ तास उपलब्ध असणाऱ्या आपत्कालीन सेवेसह आम्ही विशेषतः वेळेचे अत्यंत महत्त्व असणाऱ्या कार्डियाक आणीबाणीच्या प्रसंगी रुग्ण दाखल झाल्यापासून निदान, इंटरव्हेंशन आणि रिकव्हरीपर्यंत विनासायास व समन्वित सेवा देण्यास सज्ज आहोत.”

सूर्या हृदय स्पर्श ऑक्टोबर २०२६ च्या अखेरीस प्रत्यक्ष सेवेत दाखल होईल. क्रिटिकल केअर, डायग्नोस्टिक्स आणि संलग्न विशेषोपचार क्षेत्रातील सूर्या हॉस्पिटल्सच्या विद्यमान बहुविद्याशाखीय पायाभूत सुविधांचा पाठिंबा असलेले हे केंद्र सर्वसमावेशक कार्डियाक केअर गंतव्य म्हणून विकसित करण्या

त आले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments