पंचशील रिअॅल्टीचे पाठबळ असलेली ही फ्रँचायझी होंडा बीबी रेसिंग म्हणून स्पर्धा करणार, यामुळे इंडियन सुपरक्रॉसमध्ये मोटरसायकल्स व स्कूटर्स उत्पादक कंपनीचा मुख्यत्वे सहभाग असेल
पुणे | ३० सप्टेंबर २०२६: होंडा मोटरसायकल अँड स्कूटर इंडिया (एचएमएसआय) (Honda Motorcycle & Scooter India (HMSI)) ने इंडियन सुपरक्रॉस रेसिंग लीग (आयएसआरएल) (Indian Supercross Racing League (ISRL)) च्या सीझन ३ साठी पंचशील रिअॅल्टीचे पाठबळ असलेल्या बीबी रेसिंगसोबत टायटल पार्टनरशिप केली आहे. ही टीम आता होंडा बीबी रेसिंग म्हणून स्पर्धेत उतरेल आणि विजेतेपदाच्या नवीन महत्त्वाकांक्षेसह ट्रॅकवर होंडा रेसिंगची खास रेड आयडेण्टिटी घेऊन येईल. पहिल्या दोन्ही सीझन्समध्ये बीबी रेसिंगने आयएसआरएल प्लॅटफॉर्म सातत्याने प्रबळ टीम म्हणून आपली ओळख निर्माण केली आहे, ज्यामध्ये फ्रान्सचा दिग्गज रायडर जॉर्डी टिक्सिएर याने लीगच्या इतिहासातील काही अत्यंत संस्मरणीय कामगिरी नोंदवली आहे. बीबी रेसिंगचे प्रतिनिधित्व करताना टिक्सिएरने उत्कृष्ट खेळ दाखवत ऑल-स्टार्स श्रेणीतील विजयासह अनेक वैयक्तिक जेतेपदे पटकावली, तसेच दोन्ही सीझन्समध्ये अत्यंत चुरशीच्या आणि दर्जेदार कामगिरीला सादर केले.
या सहयोगांतर्गत, एचएमएसआय बीबी रेसिंगची टायटल स्पॉन्सर बनेल. आयएसआरएलच्या पहिल्या हंगामात टीमने होंडाच्या मशिन्सवर स्पर्धा करण्याचा निर्णय घेतल्याने सुरू झालेल्या या सहयोगाला आता औपचारिक स्वरूप प्राप्त झाले आहे. होंडा बीबी रेसिंग टीम आगामी स्पर्धांमध्ये होंडा सीआरएफ४५०आर आणि होंडा सीआरएफ२५०आर मोटोक्रॉस मोटरसायकल्ससह रेसमध्ये कायम राहील.
पुण्यामध्ये पंचशील रिअॅल्टीचे चेअरमन आणि बीबी रेसिंगचे मालक श्री. अतुल चोरडिया आणि होंडा मोटरसायकल अँड स्कूटर इंडियाचे सेल्स अँड मार्केटिंगचे डायरेक्टर श्री. मुत्सुओ उसुई यांनी होंडा मोटरसायकल अँड स्कूटर इंडिया व इंडियन सुपरक्रॉस रेसिंग लीगच्या प्रतिनिधींच्या उपस्थितीत या करारावर औपचारिक स्वाक्षऱ्या केल्या.
हा सहयोग एचएमएसआयने या वर्षाच्या सुरुवातीला ऑफ-रोड मोटरस्पोर्ट्सच्या दिशेने केलेल्या धोरणात्मक बदलांच्या घोषणेनंतर आकारास आला आहे. होंडा बीबी रेसिंगला दिलेल्या या पाठबळाच्या माध्यमातून एचएमएसआय इंडियन सुपरक्रॉससोबत आपला सहयोग अधिक पक्का करेल. तसेच होंडाचा जागतिक ऑफ-रोड रेसिंगचा वारसा देशातील रायडर्स आणि मोटरस्पोर्टप्रेमींपर्यंत अधिक जवळ पोहोचवेल.
हा सहयोग होंडाचा जागतिक मोटरस्पोर्ट्स वारसा आणि त्यांचे इंजिनिअरिंग तत्त्वज्ञान, भारतात एक व्यावसायिक सुपरक्रॉस फ्रँचायझी उभारण्याच्या बीबी रेसिंगच्या दीर्घकालीन कटिबद्धतेशी एकत्र करतो. आयएसआरएलसाठी हा सहयोग संरचित परिसंस्थेच्या दिशेने टाकलेले आणखी एक पाऊल आहे, जो मोटरसायकल उत्पादक, व्यावसायिक फ्रँचायझी, आंतरराष्ट्रीय व भारतातील अॅथलीट्स, व्यावसायिक भागीदार आणि रेसिंग चाहत्यांच्या नव्या पिढीला एकाच प्लॅटफॉर्मवर एकत्र आणतो.
होंडा मोटरसायकल अँड स्कूटर इंडियाचे सेल्स अँड मार्केटिंगचे डायरेक्टर श्री. मुत्सुओ उसुई म्हणाले, “भारतातील रायडर्स आता नवीन रायडिंग अनुभवांचा शोध घेत आहेत, ज्यामध्ये अॅडव्हेंचर आणि ऑफ-रोड मोटरसायकलिंगबद्दल आवड वेगाने वाढत आहे. बीबी रेसिंगसोबत आमची टायटल पार्टनरशिप या बदलत्या रायडिंग संस्कृतीला आणि भारतातील व्यावसायिक सुपरक्रॉसच्या वाढीला दिलेला आमचा पाठिंबा निदर्शनास आणते. आयएसआरएलच्या पहिल्या हंगामापासून होंडाच्या मशिन्ससह ट्रॅकवर उतरत असल्याने बीबी रेसिंग आमच्यासाठी अगदी स्वाभाविक भागीदार ठरली आहे. होंडा बीबी रेसिंगच्या माध्यमातून आम्ही होंडाचा जागतिक ऑफ-रोड रेसिंग वारसा भारतातील रायडर्स आणि मोटरस्पोर्टप्रेमींपर्यंत नेण्यासाठी उत्सुक आहोत.”
पंचशील रिअॅल्टीचे चेअरमन आणि बीबी रेसिंगचे मालक श्री. अतुल चोरडिया म्हणाले, “बीबी रेसिंगची वाटचाल नेहमी व्यावसायिक सुपरक्रॉसबद्दल पॅशनने आणि भारतात प्रबळ टीम उभारण्याच्या कटिबद्धतेने प्रेरित राहिली आहे. आयएसआरएलमध्ये आल्यापासून होंडा आमच्या प्रवासाची अत्यंत महत्त्वाची भाग राहिली आहे, आणि आता होंडा बीबी रेसिंगच्या रूपात या दोघांना एकत्र आणणे हे पुढचे अगदी स्वाभाविक पाऊल आहे. हा सहयोग टीमसाठी महत्त्वाचा टप्पा ठरला आहे, तसेच आम्ही सर्वोच्च पातळीवर स्पर्धा करताना भारतातील सुपरक्रॉस आणि ऑफ-रोड मोटरस्पोर्ट्सच्या विकासात योगदान देण्यासाठी सज्ज आहोत.”
इंडियन सुपरक्रॉस रेसिंग लीगचे सह-संस्थापक श्री. ईशान लोखंडे म्हणाले, “भारतात प्रबळ सुपरक्रॉस परिसंस्था उभारण्यासाठी आवश्यक असणाऱ्या प्रमुख घटकांना एकत्र आणण्याच्या उद्देशाने आयएसआरएलची स्थापना करण्यात आली आणि ओरिजिनल मॅन्युफॅक्चरर्सचा सहभाग त्या दृष्टिकोनाचा अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. एचएमएसआयची बीबी रेसिंगसोबत टायटल पार्टनरशिप लीगसाठी महत्त्वपूर्ण पाऊल आहे, तसेच इंडियन सुपरक्रॉसमध्ये ओईएम्सची वाढती भूमिका यातून दिसून येते. आमचा विश्वास आहे की, अशा सहयोगांमुळे उद्योग जगताचा सहभाग वाढेल आणि भारताला या खेळासाठी जागतिक पातळीवर विश्वासार्ह केंद्र म्हणून प्रस्थापित करण्यास मदत होईल.”
सीआरएफ४५०आर आणि सीआरएफ२५०आरमशिन्ससह होंडा बीबी रेसिंग सीझन ३ च्या ट्रॅकवर उतरण्यासाठी सज्ज होत असताना हा सहयोग टीमसाठी नवीन अध्याय सुरू करतो, तसेच भारतातील मोटरसायकल उत्पादक आणि व्यावसायिक सुपरक्रॉस यांच्यातील संबंध अधिक
दृढ करतो.


