Wednesday, September 30, 2026
Google search engine
HomeUncategorizedसमर्थ प्रतिष्ठानचा 'समर्थ गौरव' पुरस्कार जाहीर*  समर्थ प्रतिष्ठान ढोल-ताशा, ध्वज व...

समर्थ प्रतिष्ठानचा ‘समर्थ गौरव’ पुरस्कार जाहीर*  समर्थ प्रतिष्ठान ढोल-ताशा, ध्वज व ढाल-तलवार पथकाच्या २७ व्या वर्धापनदिनानिमित्त पुरस्कार सोहळा

 

 

पुणे : समर्थ प्रतिष्ठान ढोल-ताशा, ध्वज व ढाल-तलवार पथकाच्या २७ व्या वर्धापनदिनानिमित्त देण्यात येणारा १७ वा समर्थ गौरव पुरस्कार साईनाथ मित्र मंडळ ट्रस्टचे अध्यक्ष पियुष शहा यांना प्रदान करण्यात येणार आहे. शुक्रवार, दि. २ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ६ वाजता स. प. महाविद्यालयातील लेडी रमाबाई हॉल येथे हा कार्यक्रम होणार आहे, अशी माहिती प्रतिष्ठानचे अध्यक्ष संजय सातपुते यांनी दिली.

 

कार्यक्रमात एअरमार्शल भूषण गोखले व उद्योजक पुनीत बालन यांच्या शुभहस्ते पुरस्काराचे वितरण करण्यात येणार आहे. तर प्रमुख पाहुणे म्हणून खासदार डॉ. मेधा कुलकर्णी, पुण्याच्या महापौर मंजुषा नागपुरे, सामाजिक कार्यकर्त्या शोभा धारीवाल व जान्हवी धारीवाल उपस्थित राहणार आहेत. समर्थ गौरव पुरस्काराचे स्वरूप रुपये ११ हजार, पुणेरी पगडी, शाल व सन्मानचिन्ह असे आहे.

 

समर्थ प्रतिष्ठानच्या रौप्यमहोत्सवी वर्षापासून इंद्राणी बालन ग्रुप व समर्थ प्रतिष्ठान यांच्या वतीने २५ हुशार, गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचे वितरण करण्यात येत आहे. या उपक्रमांतर्गत यंदाही विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्यात येणार आहे.

 

तसेच, देवकर मावडी, पुरंदर येथे वृक्षांना पाणीपुरवठा होण्यासाठी पाण्याच्या टाकीसाठी रुपये १५ हजारांची मदत करण्यात येणार आहे. तर, पुणे विद्यार्थी गृहाच्या वसतिगृहासाठी रुपये ११ हजारांची मदत देण्यात येणार आहे. कार्यक्रमात ज्येष्ठ शिक्षणतज्ञ डॉ. अ. ल. देशमुख यांच्या जन्मदिनाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त त्यांचा विशेष सन्मान करण्यात येणार आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments