पोर्शेची उत्कृष्ट कामगिरी आणि दैनंदिन वापरातील सुलभता यांचा मेळ साधत नवी कायेन इलेक्ट्रिक भारतात दोन पर्यायांमध्ये उपलब्ध होणार
भारत: पोर्शे इंडियाने आपल्या लोकप्रिय मॉडेल श्रेणीतील ‘कायेन इलेक्ट्रिक’ हे वाहन भारतीय बाजारपेठेत लाँच करण्याची घोषणा केली आहे. या लाँचमुळे पोर्शेच्या वाहनांच्या श्रेणीतील नव्या पर्वाचा प्रारंभ झाला आहे. या नव्या वाहनाच्या आगमनाने कंपनीच्या भारतीय बाजारपेठेतील ऑल-इलेक्ट्रिक वाहनांच्या पोर्टफोलिओचा मोठा विस्तार झाला आहे.
‘कायेन मॉडेल’ श्रेणीत कायेन इलेक्ट्रिकच्या आगमनाने पूर्णपणे इलेक्ट्रिक मोबिलिटीचा पर्याय उपलब्ध झाला आहे. पोर्शेच्या मूळ मॉडेलमधील परंपरांगत अष्टपैलुत्व आणि दैनंदिन उपयुक्तता नव्या कायेन इलेक्ट्रिकमध्येही जतन करण्यात आली आहे. तसेच, पोर्शे कंपनी पुढील दहा वर्षापर्यंत कायेनच्या पेट्रोल व्हेरिएंटची विक्री कायम ठेवेल, असेही कंपनीच्यावतीने सांगण्यात आले आहे.
पोर्शेच्या वाहनांची नवी पिढी ही ग्राहकांची कंपनीबाबतची उत्कृष्ट ड्रायव्हिंगच्या कामगिरीची अपेक्षा आणि इलेक्ट्रिक पॉवरट्रेनचे फायदे यांचा सुरेख मेळ साधते. यामुळे ग्राहकांना कायेन वाहनातील ड्रायव्हिंगचा नवा आनंददायी अनुभव मिळणार आहे.
पोर्शे इंडियाचे प्रमुख आशुतोष दिक्षित म्हणाले, “ इलेक्ट्रिफिकेशनसह कायेन नव्या युगात प्रवेश करत आहे. यात पोर्शेची मूळ ओळख आणि वैशिष्ट्ये तशीच कायम ठेवण्यात आली आहेत. यात कोणतीही तडजोड करण्यात आलेली नाही. उत्कृष्ट कामगिरी आणि इलेक्ट्रिक मोबिलिटी यांचा सुरेख संगम साधण्यात आला आहे.
ही कार ग्राहकांना कायेनबाबत दैनंदिन वापराबाबतची अपेक्षा पूर्ण करते. यात आमच्या स्पोर्ट्स कारची सर्वोत्तम कामगिरी अनुभवता येईल. कायेनमध्ये अत्याधुनिक अभियांत्रिकी आणि अतुलनीय ड्रायव्हिंग अनुभवही सारखाच असेल. भारतात आमच्या ग्राहकांसाठी विविध पर्यायांचा विस्तार होत असताना, ही नवीन कार पोर्शेच्या देशातील प्रवासातील नवे पर्व ठरेल. ”
नव्या कायेन इलेक्ट्रिकच्या आगमनाने पोर्शे इंडियाची उत्पादन श्रेणी सशक्त झाली असून, ग्राहकांना ब्रँण्डच्या मॉडेल पोर्टफोलिओसोबत नवा ऑल-इलेक्ट्रिक पर्याय उपलब्ध झाला आहे. ग्राहकांना कायेन कार खरेदीसाठी ‘कायेन इलेक्ट्रिक’ आणि ‘कायेन टर्बो इलेक्ट्रिक’ हे दोन पर्याय लाँचच्या दिवसापासून उपलब्ध आहेत. यापैकी ‘कायेन टर्बो इलेक्ट्रिक’ ही उच्च कार्यक्षमतेसाठी उपलब्ध करण्यात आली आहे. या नव्या दोन पर्यायांमुळे ग्राहकांना त्यांच्या गरजांनुसार, पसंतीनुसार योग्य मॉडेल निवडीची सुविधा प्राप्त झाली आहे.
या नव्या इलेक्ट्रिक वाहनाचा अनावरण सोहळा मुंबईत आयोजित करण्यात आला आहे. या अनावरण सोहळ्याप्रसंगी प्रसारमाध्यमे आणि ग्राहकांना नव्या वाहनाची वैशिष्ट्ये पाहता येतील. अनावरणाच्या दिवसापासूनच वाहनाचे वितरण सुरु केले जाईल. यामुळे आता देशभरातील पोर्शे ग्राहकांसाठी कायेन मालिकेतील नवे अत्याधुनिक पर्व सुरु झाले आहे.
नवीन ‘कायेन इलेक्ट्रिक’ दोन पर्यायांमध्ये उपलब्ध आहे. ग्राहकांना ‘कायेन इलेक्ट्रिक’ १ कोटी ७७ लाख २७ हजार रुपयांमध्ये खरेदी करता येईल तर ‘कायेन टर्बो इलेक्ट्रिक’साठी २ कोटी २७ लाख ५१ हजार रुपये मोजावे लागतील. ३० सप्टेंबर रोजी मुंबईत हा अनावरण सोहळा पार पडेल. ग्राहकांना याच दिवशी कारचे वितरण केले जाईल, असे कंपनीच्यावतीने स्पष्ट करण्यात आले.


