हिमांक गौर दिग्दर्शित हॉटस्टार स्पेशल्स मालिका ताजा खबर २ चे चित्रिकरण सुरू झाले असून ती डिस्ने+ हॉटस्टारवर लवकरच झळकणार ~
मुंबई, ५ एप्रिल २०२४: जिंदगी बडी अजीब है, कभी कभी मौत से शुरू होती है. एक भयाण रहस्यभेद, ताणलेली नाती आणि अपघाताने जादूई शक्ती प्राप्त झालेल्या एका माणसाची आणि त्या शक्तीने त्याच्या आयुष्यात उमटलेल्या तरंगांची गोष्ट. दीर्घ प्रतीक्षेचा काळ आता संपला आहे, कारण डिस्ने+ हॉटस्टारची थरारक-नाट्यमय मालिका हॉटस्टार स्पेशल्स ‘ताजा खबर’मधील वास्याने (भुवन बाम) आपल्या नशीबाची कहाणी नव्याने लिहायला घेतली आहे.
BB ki विनेश प्रॉडक्शनच्या बॅनरखाली रोहित राज आणि भुवन बाम निर्मित, हिमांक गौर दिग्दर्शित आणि हुसैन व अब्बास दलाल या लेखक जोडगोळीने लिहिलेल्या मालिकेत सोशल मीडियावर धुमाकूळ घालणारा अभिनेता भुवन बामसह श्रिया पिळगांवकर, महेश मांजरेकर, देवेन भोजानी, शिल्पा शुक्ला, प्रथमेश परब, नित्या माथूर आणि इतरांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत.
डिस्ने+ हॉटस्टार अँड एचएसएम एंटरटेनमेंट नेटवर्क, डिस्ने स्टारच्या कन्टेन्ट विभागाचे हेड गौरव बॅनर्जी म्हणाले, “ताजा खबर सीझन १ ला मिळालेले असाधारण यश हे प्रेक्षकांसाठी दर्जेदार मनोरंजन घेऊन येण्याप्रती डिस्ने+ हॉटस्टारने सतत जपलेल्या बांधिलकीचे प्रतीक आहे. भुवन बामची आघाडीची भूमिका असलेल्या या मालिकेने जगभरातील चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचवली होती. ताजा खबर २ च्या दुसऱ्या सीझनची घोषणा करत, प्रेक्षकांना वास्याच्या जगाची अंतर्बाह्य ओळख घडविणाऱ्या प्रवासाचे आमंत्रण देताना आम्ही भारावून गेलो आहोत.”
लोकप्रिय कन्टेन्ट क्रिएटर आणि अभिनेता भुवन बाम म्हणाला, “ताजा खबर सीझन १ला सगळ्यांचेच खूप प्रेम आणि कौतुक मिळाले आणि चाहत्यांकडून मिळालेल्या पाठबळासाठी मी त्यांचे जितके आभार मानावेत तितके थोडेच आहेत. वास्या हा माझ्या जीवाच्या खूप जवळचा आहे आणि आणि अनेक पातळ्यांवर माझे सूर त्याच्याशी जुळतात. त्याच्या प्रवासाने मला आपल्याच मनाचा अधिकाधिक गहिरा तळ शोधायला आणि हे पात्र आणखी चांगल्या प्रकारे समजून घ्यायला उद्युक्त केले. ताजा खबर २ साठी पुन्हा एकदा वास्याच्या भूमिकेत शिरणे हा माझ्यासाठी एक समृद्ध करणारा अनुभव आहे आणि या व्यक्तिरेखेच्या अंतरंगातल्या आणखी गुंतागूंती शोधण्यास मी उत्सुक आहे. एक संकल्पना म्हणून हा कार्यक्रम प्रेक्षकांना आपलासा वाटला आणि या मालिकेतून माझे या क्षेत्रात पदार्पण झाले याचा मला आनंद आहे. सीझन 2 प्रेक्षकांना एका थरारक सफरीवर घेऊन जाईल आणि त्यांच्या मनातील कुतुहल जागवून आणखी जाणून घेण्याची आस निर्माण करेल. या सीझनसाठी मी प्रचंड उत्सुक आहे आणि या संधीसाठी मी डिस्ने+ हॉटस्टारचा आभारी आहे.”
ताजा खबर सीझन २ विषयी बोलताना दिग्दर्शक हिमांक गौर म्हणाले, “आम्ही पहिला सीझन बनवला तेव्हा आम्हाला जादूई शक्तींचे जग आणि त्याचा वास्तवातील जगावर कसा विपरित परिणाम होतो हे प्रेक्षकांसमोर मांडायचे होते. भुवन बाम हे नाव आता घराघरात पोहोचले आहे आणि वास्या म्हणूनही त्याने प्रेक्षकांच्या मनामध्ये आपली जागा बनवली आहे. सीझन २ प्रेक्षकांच्या भेटीला आणताना आम्हाला खूप आनंद होत आहे. नव्या सीझनमधून मनाची पकड घेणारी गोष्ट तुम्हाला सांगण्यास आम्ही अत्यंत उत्सुक आहोत.”
~ हॉटस्टार स्पेश्यल्स’ ताजा खबर २ मध्ये भुवन बामला नव्या साहसांचा सामना करताना पाहण्यासाठी पाहत रहा डिस्ने+हॉटस्टार


