Thursday, October 1, 2026
Google search engine
HomeUncategorized*निवृत्तीवेतनधारकांसाठी ‘महा उपलब्धी’ अॅपबाबत ९ ऑक्टोबर रोजी मेळावा*

*निवृत्तीवेतनधारकांसाठी ‘महा उपलब्धी’ अॅपबाबत ९ ऑक्टोबर रोजी मेळावा*

 

 

पुणे, दि. १ : जिल्हा कोषागार कार्यालय, पुणे येथून निवृत्तीवेतन घेणाऱ्या राज्यशासकीय निवृत्तीवेतनधारक व कुटुंबनिवृत्तीवेतनधारकांसाठी ‘महा उपलब्धी’ (Maha Uplabdhi) अॅपबाबत प्रबोधन व मार्गदर्शन मेळाव्याचे आयोजन शुक्रवार, दि. ९ ऑक्टोबर २०२६ रोजी दुपारी ३.३० ते ५.३० या वेळेत करण्यात आले आहे.

हा मेळावा शरदचंद्रजी पवार सभागृह, पहिला मजला, नवीन जिल्हा परिषद, पुणे येथे आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्यात निवृत्तीवेतनधारकांच्या निवृत्तीवेतनाशी संबंधित विविध समस्यांचे निराकरण करण्यासोबतच महाराष्ट्र शासन, वित्त विभागाच्या दि. १९ जून २०२६ रोजीच्या शासन निर्णयानुसार विकसित करण्यात आलेल्या ‘महा उपलब्धी’ या अधिकृत मोबाइल अॅपबाबत माहिती व मार्गदर्शन करण्यात येणार आहे.

तरी जिल्हा कोषागार कार्यालय, पुणे मार्फत निवृत्तीवेतन घेणाऱ्या निवृत्तीवेतनधारकांनी या मेळाव्यास उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हा कोषागार कार्यालयाच्या वतीने करण्यात आले आहे.

0000

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments