Friday, October 2, 2026
Google search engine
HomeUncategorized३० वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर सहाय्यक निबंधक अनंत दराडे सेवानिवृत्त*

३० वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर सहाय्यक निबंधक अनंत दराडे सेवानिवृत्त*

 

 

पुणे : सहकार साखर आयुक्त कार्यालयातील सहाय्यक निबंधक अनंत दराडे हे ३० वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर सेवानिवृत्त झाले. त्यांच्या सेवापूर्ती निमित्त आयोजित कार्यक्रमात साखर आयुक्त डॉ. संजय कुमार कोलते यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला.

 

यावेळी संचालक (अर्थ) यशवंत गिरी, सहसंचालक (प्रशासन) प्रकाश अष्टेकर, सहसंचालक (उपपदार्थ) साधना देशमुख तसेच उपप्राचार्य आयटीआय कल्पना दराडे यांच्यासह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

 

दीर्घकाळ सहकार साखर आयुक्त कार्यालयात सेवा बजावताना श्री. दराडे यांनी विविध जबाबदाऱ्या पार पाडल्या. त्यांच्या सेवाकाळातील योगदानाबद्दल उपस्थितांनी त्यांचे कौतुक करून सेवानिवृत्तीनंतरच्या भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments