Saturday, October 3, 2026
Google search engine
HomeUncategorized*‘अवयवदान – जीवनदान’चा संदेश देत कुरकुंभ येथे अवयवदान जनजागृती कार्यक्रम उत्साहात*

*‘अवयवदान – जीवनदान’चा संदेश देत कुरकुंभ येथे अवयवदान जनजागृती कार्यक्रम उत्साहात*

 

 

 

पुणे, दि. ३ : वैद्यकीय प्रशासन अधिकारी, पुणे यांच्या अंतर्गत सेवा दवाखाना, कुरकुंभ येथे ‘सेवा संकल्प अभियान’ अंतर्गत अवयवदान जनजागृती कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. वैद्यकीय अधिकारी डॉ. सिराजुद्दीन जमादार यांनी “अवयवदान हे केवळ दान नसून, एखाद्या गरजू व्यक्तीला नवजीवन देण्याची अमूल्य संधी आहे,” समाजामध्ये अवयवदानाबाबत सकारात्मक दृष्टिकोन निर्माण करण्यासाठी प्रत्येकाने पुढाकार घ्यावा, असे आवाहन केले.

 

यावेळी औषध निर्माता अजिंक्य देसाई यांनी अवयवदानाचे महत्त्व, अवयवदानामुळे गरजू रुग्णांना मिळणारे जीवनदान आणि समाजामध्ये अवयवदानाबाबत व्यापक जनजागृती निर्माण करण्याची आवश्यकता याविषयी मार्गदर्शन केले. अवयवदानाबाबत समाजात असलेल्या विविध गैरसमजुती दूर करून अधिकाधिक नागरिकांनी या मानवतावादी उपक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी केले.

 

अवयवदानाच्या जनजागृतीसाठी अधिकारी व कर्मचाऱ्यांनी अवयवदानाचे महत्त्व, अवयवदानाची प्रक्रिया आणि त्यातून मिळणारे जीवनदान याविषयी विविध माहितीपूर्ण पोस्टर्स तयार करून प्रदर्शनीद्वारे माहिती देण्यात आली. या माध्यमातून उपस्थितांना अवयवदानाबाबत आवश्यक माहिती देण्यात आली.

 

अधिकारी, कर्मचारी आणि विमाधारकांचा कार्यक्रमाला सकारात्मक प्रतिसाद मिळाला. अवयवदानाविषयी जनजागृती करताना “अवयवदान – जीवनदान” हा मानवतावादी संदेश समाजापर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न या उपक्रमातून करण्यात आला.

 

हा उपक्रम वैद्यकीय प्रशासन अधिकारी डॉ. रंगदळ, डॉ. तनुजा गवार्ले, डॉ. शुभम मोहोळकर तसेच सेवा दवाखाना, कुरकुंभचे प्रभारी वैद्यकीय अधिकारी डॉ. सिराजुद्दीन जमादार यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आला.

 

०००

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments