Wednesday, August 19, 2026
Google search engine
HomeUncategorizedमतदान जागृती उपक्रमात ज्येष्ठ नागरिकांचा सहभाग*

मतदान जागृती उपक्रमात ज्येष्ठ नागरिकांचा सहभाग*

पुणे, दि. ५ : सार्वत्रिक लोकसभा निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी स्वीपमार्फत राबविण्यात येणाऱ्या मोहिमेमध्ये विद्यार्थी, युवा, महिलांच्या सहभागासोबतच वडगाव शेरी विधानसभा मतदार संघातील ज्येष्ठ नागरिकही सहभागी झाले आहेत.

 

वडगाव शेरी मतदार संघातील स्वीप पथकाने टँक रोड, विश्रांतवाडी येथे ज्येष्ठ नागरिक कट्ट्यावरील ज्येष्ठ नागरिकांना मतदान प्रक्रिया समजावून देत मतदानाची शपथ दिली. ज्येष्ठ नाागरिकांना सुलभ मतदानासाठी उपलब्ध करून देण्यात येणाऱ्या सुविधांची माहिती यावेळी देण्यात आली. लोकशाहीच्या उत्सवात सर्वांनी सहभागी होण्याचे आवाहन ज्येष्ठ नागरिकांनी यावेळी केले.

 

स्वीप पथकाकडून मस्केवस्ती, आळंदी रोड, विश्रांतवाडी पोस्ट ऑफीस, धर्मवीर संभाजी को. अर्बन बँक विश्रांतवाडी, येरवडा येथील जिल्हा होमगार्ड प्रशासकीय कार्यालय, आरोग्य भवन, येथे मतदान जागृती करण्यात आली.

 

पर्वती विधानसभा मतदार संघांतर्गत स्वारगेट बस डेपो मेकॅनिकल स्टाफ यांना स्वीप पथकाकडून मतदान प्रक्रियेविषयी माहिती देऊन शपथ देण्यात आली. शिवाजीनगर विधानसभा मतदार संघात लोकशाही अधिक बळकट व्हावी यासाठी विविध स्पर्धा, विद्यार्थी रॅलीद्वारे जनजागृती करण्यात येत असून त्याअंतर्गत सौ. विमलाबाई गरवारे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, वीर नेताजी पालकर येथील विद्यार्थ्यांनी चित्रकला स्पर्धा व रॅलीद्वारे घोषणा देत नागरिकांना मतदानाचे आवाहन केले. स्वीप पथकाने विविध ठिकाणी क्युआर कोडचा वापर करून मतदार यादीतील नाव व मतदान केंद्र शोधण्याविषयी माहिती दिली.

 

*वडगाव शेरी येथे आढावा बैठक*

वडगाव शेरी विधानसभा मतदार संघातील सहायक निवडणूक निर्णय अधिकारी सचिन बारवकर यांनी सर्व समन्वयक अधिकाऱ्यांच्या निवडणूक विषयक कामकाजाचा आढावा घेतला. श्री. बारवकर यांनी कामात येणाऱ्या अडचणी जाणून घेतल्या. अधिकाऱ्यांनी सतर्क राहून आपापली जबाबदारी काळजीपूर्वक पार पाडण्याच्या सूचना यावेळी दिल्या. बैठकीला अतिरिक्त सहायक निवडणूक अधिकारी तृप्ती कोलते, गौरी शंकरदास उपस्थित होत्या.

0000

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments