Wednesday, August 19, 2026
Google search engine
HomeUncategorizedअनुज्ञप्ती वाहन चाचणी आयडीटीआर कासारवाडी येथे होणार*

अनुज्ञप्ती वाहन चाचणी आयडीटीआर कासारवाडी येथे होणार*

 

 

पुणे दि.६: पिंपरी चिंचवड प्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयात अनुज्ञप्ती वाहन चाचणी करीता येणाऱ्या उमेदवारांच्या सर्व संवर्गाच्या अनुज्ञप्ती चाचण्या ८ एप्रिलपासून वाहन चालन प्रशिक्षण व संशोधन संस्था (आयडीटीआर), कलासागर हॉटेल जवळ, स्टेट बँक ऑफ इंडीयाच्या पुढे, जुना पुणे-मुंबई महामार्ग कासारवाडी, पुणे येथे घेण्यात येणार आहेत. वाहन चाचणी केंद्रावर गर्दी होऊ नये म्हणून वाहन चाचणीचे कामकाज सकाळी ७ वाजल्यापासून सुरू करण्यात येईल, असे प्रादेशिक परिवहन अधिकारी अतुल आदे यांनी कळविले आहे.

000

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments