Friday, October 9, 2026
Google search engine
HomeUncategorizedध्रुव ग्लोबल स्कूलचा आशियात डंका!  -५८ विद्यार्थ्यांच्या २४...

ध्रुव ग्लोबल स्कूलचा आशियात डंका!  -५८ विद्यार्थ्यांच्या २४ तासांच्या जलतरण मॅरेथॉनची विक्रमी नोंद

-२४ तासांच्या रिले जलतरण मॅरेथॉनची आशिया बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये नोंद

पुणे,दि. ९:‘सलग २४ तासांच्या रिले जलतरण मॅरेथॉनमध्ये ५८ विद्यार्थ्यांचा सहभाग नोंदवत ध्रुव ग्लोबल स्कूलने आशिया बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये विक्रमाची नोंद केली. ८ आणि ९ ऑक्टोबरदरम्यान पार पडलेल्या या उपक्रमातून विद्यार्थ्यांनी शारीरिक तंदुरुस्ती, सांघिक भावना, शिस्त आणि जिद्दीचा प्रेरणादायी संदेश दिला.’ असे प्रतिपादन आशिया बुक ऑफ रेकॉर्ड्सचे परीक्षक डॉ. चित्रा जैन यांनी केले.

ध्रुव ग्लोबल स्कूलच्या वतीने आयोजित २४ तासांच्या रिले जलतरण मॅरेथॉनची आशिया बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये नोंद झाली. यावेळी त्या बोलत होत्या.

यावेळी ध्रुव ग्लोबल स्कूलचे चेअरमन संजय मालपाणी, संचालक यशोवर्धन मालपाणी आणि अनिष्का मालपाणी यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम यशस्वी झाला. प्राचार्य संगीता राऊतजी यांनी या उपक्रमासाठी सहकार्य केले. क्रीडा समन्वयक गिरीश टोकसे आणि रोहित पाटील यांनी नियोजनाची जबाबदारी सांभाळली. तसेच जलतरण शिक्षक स्मिता काथवे, रुपाली अनप, विशाल नरवडे, उमा जोशी, अनिकेत सरदार आणि कपिलेश हारणे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. त्यांच्या नियोजन, प्रशिक्षण आणि सहकार्यामुळे विद्यार्थ्यांना २४ तासांच्या रिले जलतरण मॅरेथॉनमध्ये सहभागी होत आशिया बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये विक्रम नोंदविण्याची संधी मिळाली.

संगीता राऊतजी म्हणाल्या, ध्रुव ग्लोबल स्कूलमध्ये विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला प्राधान्य दिले जाते. अभ्यासासोबतच क्रीडा, कला, नृत्य, संगीत, ध्यान आणि योग यांचा विद्यार्थ्यांच्या दैनंदिन जीवनात समावेश आहे. २४ तासांच्या जलतरण रिले स्पर्धेत सहभागी झालेल्या ५८ विद्यार्थ्यांनी मेहनत, समर्पण आणि चिकाटीच्या जोरावर यश संपादन केले. या स्पर्धेतून विद्यार्थ्यांना केवळ विजयाचा आनंदच मिळाला नाही, तर आयुष्यातील आव्हानांवर मात करण्याचा आत्मविश्वासही मिळाला. कोणत्याही संकटाचा सामना करताना सातत्य, जिद्द आणि बांधिलकी महत्त्वाची असते, हा जीवनमंत्र विद्यार्थ्यांनी या अनुभवातून आत्मसात केला. शाळेचे संस्थापक डॉ. संजय मालपाणी यांच्या सर्वांगीण विकासाच्या संकल्पनेतून विद्यार्थ्यांच्या शारीरिक आणि बौद्धिक प्रगतीवर भर दिला जातो.

चौकट:

आरोग्य आणि अभ्यासाचा समतोल महत्त्वाचा

विद्यार्थ्यांचा दिवस खेळ, ध्यान आणि योगाने सुरू होतो. अभ्यासासोबत आरोग्याची काळजी घेणे आणि जीवनात समतोल राखणे महत्त्वाचे आहे. समर्पण, बांधिलकी आणि चिकाटीच्या जोरावर कोणत्याही आव्हानावर मात करता येते. हाच समतोल ध्रुवच्या यशाचा आधार आहे. असे संगीता राऊतजी सांगितले.

——–

कोट:

“या ऐतिहासिक क्षणामागे प्रत्येक विद्यार्थ्याची मेहनत, प्रशिक्षकांचे समर्पण आणि संपूर्ण क्रीडा पथकाचे योगदान आहे. विद्यार्थ्यांना घडविण्यासाठी शिक्षक, प्रशिक्षक आणि आयोजकांनी घेतलेले कष्ट कौतुकास्पद आहेत. सर्वांच्या एकजुटीमुळेच हा गौरवशाली क्षण साकार झाला असून, ही कामगिरी शाळेसाठी अभिमानास्पद आहे.”

-संगीता राऊतजी प्राचार्य ध्रुव ग्लोबल स्कूल

——–

कोट:

“सलग २४ तासांची जलतरण मॅरेथॉन पूर्ण करणे ही छोटी उपलब्धी नाही. त्यासाठी ताकद, सहनशक्ती आणि हार न मानण्याची वृत्ती आवश्यक असते. विद्यार्थ्यांनी मेहनत, समर्पण आणि आत्मविश्वासाच्या जोरावर हा विक्रम साध्य केला. या यशासाठी सर्व जलतरणपटू, प्रशिक्षक, शिक्षक आणि पालकांचे मनःपूर्वक अभिनंदन,”

-डॉ. चित्रा जैन परीक्षक आशिया बुक ऑफ रेकॉर्ड्स

——-

कोट:

जलतरण मॅरेथॉनमध्ये सहभागी होणे माझ्यासाठी आयुष्यातील सर्वांत मोठा अनुभव आहे. माझा स्लॉट दुपारी अडीच ते तीन असा होता. प्रेक्षकांकडून मिळणाऱ्या प्रोत्साहनामुळे मला खूप छान वाटले. शिट्टी वाजेपर्यंत पोहत राहण्याची जिद्द मनात होती. हा अनुभव माझ्यासाठी कायम अविस्मरणीय राहील.

-भूमी पाटील विद्यार्थिनी (वर्ग चौथा)

ध्रुव ग्लोबल स्कूलचा आशियात डंका!

-५८ विद्यार्थ्यांच्या २४ तासांच्या जलतरण मॅरेथॉनची विक्रमी नोंद

-२४ तासांच्या रिले जलतरण मॅरेथॉनची आशिया बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये नोंद

पुणे, शहर प्रतिनिधी. ‘सलग २४ तासांच्या रिले जलतरण मॅरेथॉनमध्ये ५८ विद्यार्थ्यांचा सहभाग नोंदवत ध्रुव ग्लोबल स्कूलने आशिया बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये विक्रमाची नोंद केली. ८ आणि ९ ऑक्टोबरदरम्यान पार पडलेल्या या उपक्रमातून विद्यार्थ्यांनी शारीरिक तंदुरुस्ती, सांघिक भावना, शिस्त आणि जिद्दीचा प्रेरणादायी संदेश दिला.’ असे प्रतिपादन आशिया बुक ऑफ रेकॉर्ड्सचे परीक्षक डॉ. चित्रा जैन यांनी केले.

नांदे येथील ध्रुव ग्लोबल स्कूलच्या वतीने आयोजित २४ तासांच्या रिले जलतरण मॅरेथॉनची आशिया बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये नोंद झाली. यावेळी त्या बोलत होत्या.

यावेळी ध्रुव ग्लोबल स्कूलचे चेअरमन संजय मालपाणी, संचालक यशोवर्धन मालपाणी आणि अनिष्का मालपाणी यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम यशस्वी झाला. प्राचार्य संगीता राऊतजी यांनी या उपक्रमासाठी सहकार्य केले. क्रीडा समन्वयक गिरीश टोकसे आणि रोहित पाटील यांनी नियोजनाची जबाबदारी सांभाळली. तसेच जलतरण शिक्षक स्मिता काथवे, रुपाली अनप, विशाल नरवडे, उमा जोशी, अनिकेत सरदार आणि कपिलेश हारणे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. त्यांच्या नियोजन, प्रशिक्षण आणि सहकार्यामुळे विद्यार्थ्यांना २४ तासांच्या रिले जलतरण मॅरेथॉनमध्ये सहभागी होत आशिया बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये विक्रम नोंदविण्याची संधी मिळाली.

संगीता राऊतजी म्हणाल्या, ध्रुव ग्लोबल स्कूलमध्ये विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला प्राधान्य दिले जाते. अभ्यासासोबतच क्रीडा, कला, नृत्य, संगीत, ध्यान आणि योग यांचा विद्यार्थ्यांच्या दैनंदिन जीवनात समावेश आहे. २४ तासांच्या जलतरण रिले स्पर्धेत सहभागी झालेल्या ५८ विद्यार्थ्यांनी मेहनत, समर्पण आणि चिकाटीच्या जोरावर यश संपादन केले. या स्पर्धेतून विद्यार्थ्यांना केवळ विजयाचा आनंदच मिळाला नाही, तर आयुष्यातील आव्हानांवर मात करण्याचा आत्मविश्वासही मिळाला. कोणत्याही संकटाचा सामना करताना सातत्य, जिद्द आणि बांधिलकी महत्त्वाची असते, हा जीवनमंत्र विद्यार्थ्यांनी या अनुभवातून आत्मसात केला. शाळेचे संस्थापक डॉ. संजय मालपाणी यांच्या सर्वांगीण विकासाच्या संकल्पनेतून विद्यार्थ्यांच्या शारीरिक आणि बौद्धिक प्रगतीवर भर दिला जातो.

चौकट:

आरोग्य आणि अभ्यासाचा समतोल महत्त्वाचा

विद्यार्थ्यांचा दिवस खेळ, ध्यान आणि योगाने सुरू होतो. अभ्यासासोबत आरोग्याची काळजी घेणे आणि जीवनात समतोल राखणे महत्त्वाचे आहे. समर्पण, बांधिलकी आणि चिकाटीच्या जोरावर कोणत्याही आव्हानावर मात करता येते. हाच समतोल ध्रुवच्या यशाचा आधार आहे. असे संगीता राऊतजी सांगितले.

——–

कोट:

“या ऐतिहासिक क्षणामागे प्रत्येक विद्यार्थ्याची मेहनत, प्रशिक्षकांचे समर्पण आणि संपूर्ण क्रीडा पथकाचे योगदान आहे. विद्यार्थ्यांना घडविण्यासाठी शिक्षक, प्रशिक्षक आणि आयोजकांनी घेतलेले कष्ट कौतुकास्पद आहेत. सर्वांच्या एकजुटीमुळेच हा गौरवशाली क्षण साकार झाला असून, ही कामगिरी शाळेसाठी अभिमानास्पद आहे.”

-संगीता राऊतजी प्राचार्य ध्रुव ग्लोबल स्कूल

——–

कोट:

“सलग २४ तासांची जलतरण मॅरेथॉन पूर्ण करणे ही छोटी उपलब्धी नाही. त्यासाठी ताकद, सहनशक्ती आणि हार न मानण्याची वृत्ती आवश्यक असते. विद्यार्थ्यांनी मेहनत, समर्पण आणि आत्मविश्वासाच्या जोरावर हा विक्रम साध्य केला. या यशासाठी सर्व जलतरणपटू, प्रशिक्षक, शिक्षक आणि पालकांचे मनःपूर्वक अभिनंदन,”

-डॉ. चित्रा जैन परीक्षक आशिया बुक ऑफ रेकॉर्ड्स

——-

कोट:

जलतरण मॅरेथॉनमध्ये सहभागी होणे माझ्यासाठी आयुष्यातील सर्वांत मोठा अनुभव आहे. माझा स्लॉट दुपारी अडीच ते तीन असा होता. प्रेक्षकांकडून मिळणाऱ्या प्रोत्साहनामुळे मला खूप छान वाटले. शिट्टी वाजेपर्यंत पोहत ग्लोबल स्कूलचे राहण्याची जिद्द मनात होती. हा अनुभव माझ्यासाठी कायम अविस्मरणीय राहील.

-भूमी पाटील विद्यार्थिनी (वर्ग चौथा)

ध्रुव ग्लोबल स्कूल, नांदे पुणे

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments