Friday, October 9, 2026
Google search engine
HomeUncategorizedध्वनी आणि डिझाइनचा नवा अनुभव मिळवून देत सोनी इंडियाने नवीन अल्ट पॉवर...

ध्वनी आणि डिझाइनचा नवा अनुभव मिळवून देत सोनी इंडियाने नवीन अल्ट पॉवर साउंड (ULT POWER SOUND) पार्टी स्पीकर्सची मालिका केली सादर

दिल्ली, 9 ऑक्टोबर 2026: सोनी इंडियाने आज अल्ट पॉवर पोर्टफोलिओचा विस्तार करत अल्ट मॉडेल्सच्या पुढील सुधारित आवृत्तीतील अल्ट टॉवर 5, अल्ट टॉवर 7 आणि अल्ट टॉवर मॅक्स सादर करण्याची घोषणा केली. दमदार, सखोल बास आणि उत्साहपूर्ण पार्टीचा अनुभव देण्यासाठी डिझाइन करण्यात आलेल्या या नव्या अल्ट पॉवर मालिकेत सोनीचे वैशिष्ट्यपूर्ण ध्वनी तंत्रज्ञान आणि पूर्णपणे नव्या, आकर्षक टॉवर डिझाइनचा मिलाफ करण्यात आला आहे. या मालिकेत अल्ट टॉवर 5, अल्ट टॉवर 7 आणि अल्ट टॉवर मॅक्स यांचा समावेश असून, विविध जागा आणि पार्टीच्या वातावरणासाठी दमदार ध्वनी अनुभव देण्यासाठी त्यांची रचना करण्यात आली आहे.

 

बिल्ट-इन बॅटरी (टॉवर मॅक्स वगळता), सहज वाहून नेता येण्याची सुविधा आणि XLR/RCA कनेक्टिव्हिटीसह DJ-केंद्रित वैशिष्ट्यांनी युक्त हे नवे स्पीकर्स छोट्या खासगी कार्यक्रमांपासून ते मोठ्या मैदानी कार्यक्रमांपर्यंत कुठेही सर्वोत्तम पार्टीचा अनुभव देण्यासाठी डिझाइन करण्यात आले आहेत.

 

1. अल्ट टॉवर 5

सोनीचा नवा अल्ट टॉवर 5 हा सुटसुटीत आणि सहज वाहून नेता येणाऱ्या डिझाइनमध्ये 300W दमदार साउंड आउटपुट देण्यासाठी डिझाइन करण्यात आला असून त्यामुळे पार्टीसाठी तो उत्तम पर्याय ठरतो. या स्पीकरमध्ये अल्ट डक्ट तंत्रज्ञानासह नव्याने विकसित केलेला 230mm वूफर, दोन ट्वीटर आणि अल्ट पॉवर साऊंड मोड देण्यात आला असून, यामुळे खोल बास आणि उच्च साउंड प्रेशरसह घरातील तसेच बाहेरील वापरासाठी गुंगवून टाकणारा ध्वनी अनुभव मिळतो.

 

निर्दिष्ट परिस्थितीत 20 तासांपर्यंतची बॅटरी लाइफ, IPX4 वॉटर रेझिस्टन्स, चार हँडल्स तसेच उभ्या आणि आडव्या अशा दोन्ही प्रकारे ठेवण्याची सुविधा यामुळे अल्ट टॉवर 5 पार्टी जिथे असेल तिथे सहज नेता येतो. वैशिष्ट्यपूर्ण ULT बटण आणि व्हॉल्यूम नॉबसह वैशिष्ट्यपूर्ण सिल्हूट, तसेच बीट, वेव्ह आणि मिलो या सुधारित लाइटिंग मोड्स आणि आधीच्या मॉडेलपेक्षा सातपट अधिक 56 LEDs असलेली आकर्षक नवी लाइटिंग प्रणाली यामुळे त्याचे स्वरूप अधिक उठावदार झाले आहे. विकसित साउंड फील्ड ऑप्टिमायझेशन तंत्रज्ञान आजूबाजूच्या वातावरणानुसार, मग ते घरातील वातावरण असो किंवा भिंतीलगतची जागा असो, साउंड आउटपुट आपोआप समायोजित करते.

 

यामध्ये Bluetooth 5.3, USB-C, USB-A, RCA, XLR In/Out आणि मायक्रोफोन इनपुटसह विविध कनेक्टिव्हिटी पर्याय आहेत. याशिवाय स्वतंत्र DJ इनपुट, कराओके वैशिष्ट्ये, पार्टी चेन बाय ऑरा कास्ट आणि स्टिरिओ पेअर क्षमता यामुळे आपल्या गरजेनुसार पार्टी सेटअप तयार करणे सोपे होते. नवीन लो-लेटन्सी DSP तंत्रज्ञानामुळे वायरलेस कनेक्शनचा अनुभव आणखी सुधारतो, तर लाइटिंग आणि साउंडचे सिंक्रोनायझेशन म्हणजेच प्रकाश आणि ध्वनी संयोजन मिश्रण वातावरण अधिक उत्साही बनवते. 358 × 534 × 280mm आकारमान आणि 12.7 किलो वजन असलेला अल्ट टॉवर 5 सहजपणे हलवता येणे, अष्टपैलुत्व आणि दमदार बास यांचा संगम असलेला नवा आकर्षक पार्टी स्पीकर आहे.

 

2. अल्ट टॉवर 7

अल्ट टॉवर 7 हा ULT मालिकेतील पार्टी स्पीकर्समध्ये नव्याने समाविष्ट झालेले महत्वपूर्ण मॉडेल असून, कोणतीही जागा खोल बास आणि 420W दमदार ध्वनीने भरून टाकण्यासाठी त्याची रचना करण्यात आली आहे. मोठ्या व्यासाच्या 280mm नवीन चक्रीय युनिट वूफरसह मागील बाजूस ट्वीटर, ULT डक्ट तंत्रज्ञान आणि समोर-मागील बाजूस 2 मिडरेंज/4 ट्वीटर अॅरे यांचा यात समावेश आहे. अल्ट टॉवर 7 नवीन LIVE Sound आणि 10-बँड EQ सोबत ULT1/ULT2/LIVE FLAT मोड्सच्या साहाय्याने 360-डिग्री पार्टी साउंड देतो. त्यामुळे जबरदस्त बास आणि साउंड प्रेशरसह स्टेजवरील ऊर्जेचा अनुभव खोलीच्या प्रत्येक कोपऱ्यापर्यंत पोहोचतो.

 

याचे विकसित साउंड फील्ड ऑप्टिमायझेशन तंत्रज्ञान आजूबाजूच्या वातावरणानुसार, मग ते घरातील वातावरण असो किंवा भिंतीलगतची जागा असो, साउंड आउटपुट आपोआप समायोजित करते. या टॉवरच्या मजबूत आणि पोर्टेबल डिझाइनमध्ये टिकाऊ IPX4-रेटेड (उभ्या स्थितीतील) बांधणी, चार हँडल्स, सहज वाहतुकीसाठी अपग्रेड केलेली मागील चाके आणि 72 LEDs असलेली आकर्षक नवी लाइटिंग प्रणाली आहे. आधीच्या मॉडेलपेक्षा हे नऊपट अधिक आहे. समोरच्या वैशिष्ट्यपूर्ण ULT बटणासह एकसंध सिल्हूट त्याला वेगळे रूप देते. DJ आणि पार्टीचे आयोजक या दोघांना लक्षात घेऊन तयार करण्यात आलेल्या या स्पीकरमध्ये XLR/RCA DJ इनपुट, PC आणि स्मार्टफोनसाठी USB-C कनेक्टिव्हिटी, वायर्ड मल्टी-स्पीकर चेनिंग, नवीन लो-लेटन्सी DSP, मायक्रोफोन व्हॉल्यूम आणि इको कंट्रोलसह कराओके सुविधा आणि 30 तासांपर्यंतची बॅटरी लाइफ देण्यात आली आहे. अल्ट टॉवर 7 सोबत सोनी घरात, बाहेर किंवा प्रवासात कुठेही अस्सल पार्टी साउंडचा अनुभव घेऊन येत आहे.

 

3. अल्ट टॉवर मॅक्स

अल्ट टॉवर मॅक्स हे ULT मालिकेचे नवे महत्वपूर्ण मॉडेल असून, एकाच स्पीकरमधून 2150W पॉवर आउटपुट, अंगावर रोमांच उभा करणारा बास आणि जबरदस्त साउंड प्रेशर देण्यासाठी त्याची निर्मिती करण्यात आली आहे. यामुळे घरच्या घरीच एखाद्या एरिनामधील वातावरणाचा अनुभव मिळतो. यामध्ये दोन पुढील बाजूस आणि एक मागील बाजूस असे तीन मोठ्या व्यासाचे 280mm नवीन चक्रीय युनिट वूफर्स अल्ट डक्ट तंत्रज्ञानासह कार्य करतात. याशिवाय 2 मिडरेंज आणि 4 ट्वीटर (पुढील आणि मागील बाजूस) तसेच 10-बँड EQ देण्यात आला आहे. त्यायोगे खऱ्या अर्थाने 360-डिग्री पार्टी साउंड अनुभवता येतो. ULT1/ULT2/LIVE FLAT मोड्स आणि विकसित साउंड फील्ड ऑप्टिमायझेशन प्रणाली आजूबाजूच्या आवाजाच्या परिस्थितीनुसार तसेच जवळच्या भिंतींच्या स्थितीनुसार आपला प्रतिसाद बदलते. त्यामुळे खोलीत कुठेही उभे असले तरी प्रत्येक व्यक्तीला बासचा अनुभव घेता येतो.

 

डीजे आणि मोठ्या प्रमाणावर आयोजित होणाऱ्या कार्यक्रमांच्या आयोजकांसाठी डिझाइन करण्यात आलेल्या या स्पीकरमध्ये XLR/RCA DJ इनपुट, PC आणि स्मार्टफोनसाठी USB-C कनेक्टिव्हिटी, वायर्ड मल्टी-स्पीकर आणि स्टिरिओ पेअरिंग, नवीन लो-लेटन्सी DSP आणि मागील पॅनेल किंवा अॅपद्वारे मायक्रोफोन व्हॉल्यूम आणि इको कंट्रोलसह संपूर्ण कराओके सुविधा देण्यात आली आहे. या स्पीकरच्या मजबूत आणि अष्टपैलू डिझाइनमध्ये स्प्लॅश-रेझिस्टंट टॉप पॅनेल, चार हँडल्स, बाजूची चाके आणि उभ्या तसेच आडव्या दोन्ही प्रकारे ठेवण्याची सुविधा आहे. हे सर्व 100 LEDs असलेल्या आकर्षक नव्या लाइटिंग डिझाइनमध्ये सादर करण्यात आले आहे. त्याच्या आधीच्या TOWER 10 मॉडेलमधील 34 LEDs (24 टॉप, 10 बॉटम)च्या तुलनेत ही मोठी झेप आहे. अल्ट टॉवर मॅक्स सोबत सोनीने एकाच स्पीकरमधून मिळू शकणाऱ्या पार्टीच्या सर्वोच्च अनुभवाची नवी व्याख्या केली आहे.

 

लाँच ऑफर

अल्ट टॉवर मॅक्स सोबत 19,990 रु. किमतीचा ड्युअल वायरलेस MIC मिळणार असून त्यासोबत 15,000 रु. पर्यंतचा कॅशबॅकही मिळेल. अल्ट टॉवर 7 वर 4,999 रु. कॅशबॅक आणि अल्ट टॉवर 5 वर 3,000 रु. कॅशबॅकचा लाभ घेता येईल.

 

किंमत आणि उपलब्धता:

अल्ट टॉवर 5 आणि अल्ट टॉवर 7 हे 8 ऑक्टोबरपासून उपलब्ध होतील, तर अल्ट टॉवर मॅक्स 15 नोव्हेंबरपासून सोनी सेंटर आणि सोनी एक्स्क्लुझिव स्टोअर्सचा समावेश असलेल्या सोनीच्या रिटेल स्टोअर्समध्ये तसेच अॅमेझॉन वर उपलब्ध होईल.

मॉडेल

किंमत (रु. मध्ये)

सर्वोत्तम विक्री किंमत

उपलब्धता

अल्ट टॉवर 5

44,490

34,990

8 ऑक्टोबर’26

अल्ट टॉवर 7

64,990

49,990

8 ऑक्टोबर’26

अल्ट टॉवर मॅक्स

1,74,990

1,39,9

90

15 नोव्हेंबर’26

 

 

 

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments