Monday, October 12, 2026
Google search engine
HomeUncategorizedसमाजकल्याण विभागाच्या स्थापना दिनानिमित्ताने गुरुवारी व्यसनमुक्ती रॅलीचे आयोजन*

समाजकल्याण विभागाच्या स्थापना दिनानिमित्ताने गुरुवारी व्यसनमुक्ती रॅलीचे आयोजन*

 

 

 

पुणे, दि.१२: समाज कल्याण विभागाच्या स्थापना दिनानिमित्ताने समाज कल्याण विभाग व नशाबंदी मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने ‘आम्ही चालतो व्यसनमुक्तीसाठी’ रॅलीचे १५ ऑक्टोबर रोजी सकाळी ९.३० वाजता आयोजन करण्यात आले आहे.

 

या रॅलीची महात्मा फुले वाडा गंज पेठ येथून सुरुवात होणार असून सावित्रीबाई फुले स्मारक -विठोबा भावे प्राथमिक शाळा- टिंबर मार्केट- सोनवणे हॉस्पिटल सिग्नल- रमेश बागवे यांच्या घराजवळील प्रवेशद्वार व पुन्हा फायर ब्रिगेड आणि रॅलीची सांगता महात्मा फुले वाडा येथे होणार आहे.

 

या रॅलीमध्ये विद्यार्थी, सामाजिक संस्था व नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन सहाय्यक आयुक्त विशाल लोंढे यांनी केले आहे.

 

०००

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments