Thursday, October 15, 2026
Google search engine
HomeUncategorizedपाल्मोनास लिंक्डइनच्या पुण्यासाठी २०२६ टॉप स्टार्टअप्स लिस्टमध्ये अव्वलस्थानी

पाल्मोनास लिंक्डइनच्या पुण्यासाठी २०२६ टॉप स्टार्टअप्स लिस्टमध्ये अव्वलस्थानी

 

 

पुणे, १४ ऑक्टोबर २०२६: लिंक्डइन या जगातील सर्वात मोठ्या प्रोफेशनल नेटवर्कने आज आपली २०२६ टॉप स्टार्टअप्स पुणे लिस्ट जाहीर केली. ही उदयोन्मुख कंपन्यांची वार्षिक रँकिंग आहे, जिथे करिअरला मोठी गती मिळू शकते. रोजगार वाढ, सहभाग, नोकरीतील रस आणि अव्वल टॅलेंटचे आकर्षण या चार स्तंभांवरील लिंक्डइनच्या विशेष डेटावर आधारित ही लिस्ट विविध उद्योगांमध्ये वेगाने पुढे जाणाऱ्या कंपन्यांच्या आणि शहरातील प्रोफेशनल्ससाठी उपलब्ध असलेल्या संधींना सादर करते.

 

या वर्षी, ज्वेलरी ब्रँड पाल्मोनास (#१) ने पुण्यासाठी लिंक्डइनच्या टॉप स्टार्टअप्स लिस्टमध्ये अव्वल स्थान पटकावले आहे, तर क्विक-कॉमर्स कंपनी झेप्टो (#२) आणि इलेक्ट्रिक मोबिलिटी ब्रँड ईमोटोरॅड (#३) अनुक्रमे दुसऱ्या व तिसऱ्या क्रमांकावर आहेत. टॉप १० लिस्टमध्ये रोबोटिक्स, शाश्वत ऊर्जा आणि व्यावसायिक सेवा क्षेत्रातील स्टार्टअप्सचाही समावेश आहे, ज्यामधून पुण्यातील स्टार्टअप परिसंस्थेला आकार देणाऱ्या नाविन्यपूर्णतेची व्याप्ती अधोरेखित होते.

 

पुण्यातील टॉप स्टार्टअप्समध्ये ग्राहक ब्रँड्स, रोबोटिक्स आणि शाश्वत सोल्युशन्स यांचा समावेश

 

अनबॉक्स रोबोटिक्स (#६) आणि पेपरमिंट रोबोटिक्स (#७) यांनी सलग दुसऱ्या वर्षी लिस्टमध्ये स्थान मिळवल्यामुळे पुणे अभियांत्रिकी आणि ऑटोमेशनमधील आपल्या सामर्थ्याला अधिक दृढ करत आहे. बायोफ्युएलसर्कल (#८) आणि ब्लू एनर्जी मोटर्स (#९) शाश्वत ऊर्जा आणि स्वच्छ मोबिलिटी सोल्युशन्सवरील वाढत्या लक्षाचे प्रतिनिधित्व करतात. लिस्ट पूर्ण करताना फॅसिलिटी मॅनेजमेंट सोल्युशन्स देणारी इन्स्पॅको (#१०), तसेच शिक्षणावर लक्ष केंद्रित करणारे व्यवसाय हाऊस ऑफ एडटेक (#४) आणि अरेट्टो (#५) यांचा समावेश आहे, ज्यामधून पुण्यातील उदयोन्मुख स्टार्टअप्समध्ये प्रतिनिधित्व करणाऱ्या विविध क्षेत्रांची व्याप्ती निदर्शनास येते.

 

प्रोफेशनल नेटवर्क्स आवडीचे रूपांतर संधीमध्ये करण्यास मदत करू शकतात

 

भारतातील स्टार्टअप परिसंस्थेमध्ये रोजगाराच्या नवीन संधी निर्माण होत असताना प्रोफेशनल्स या संधींचा कसा शोध घेतात आणि हाताळतात यातही बदल होत आहे, ज्यामध्ये विश्वासू नेटवर्क्स महत्त्वाची भूमिका बजावत आहेत. लिंक्डइनच्या अलिकडील आकडेवारीनुसार, १०-४९ कर्मचारी असलेल्या कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या प्रोफेशनल्सपैकी ९४ टक्‍के प्रोफेशनल्स म्हणतात की, त्यांचे प्रोफेशनल नेटवर्क त्यांच्या करिअरला दिशा देण्यास मदत करण्यात महत्त्वाचे ठरते. दरम्यान, ३५ टक्‍के प्रोफेशनल्सनी सांगितले की, कनेक्शनने त्यांच्या करिअरला मदत केली आहे, तर २९ टक्‍के प्रोफेशनल्सना त्यांच्या नेटवर्कच्या माध्यमातून नोकरी किंवा नवीन संधीबद्दल माहिती मिळाली आहे.

 

या वर्षीच्या लिस्टबाबत मत व्यक्त करत लिंक्डइन करिअर एक्सपर्ट आणि लिंक्डइन इंडिया न्यूजच्या सिनियर मॅनेजिंग एडिटर निरजिता बॅनर्जी म्हणाल्या, “पुण्याची स्टार्टअप यशोगाथा आता केवळ अभियांत्रिकी सामर्थ्यापुरती मर्यादित राहिलेली नाही. ग्राहक ब्रँड्स आणि शाश्वततेवर भर देणाऱ्या व्यवसायांचा उदय संधींच्या अधिक वैविध्यपूर्ण परिसंस्थेकडे निर्देश करतो. प्रोफेशनल्ससाठी हे व्यवसाय कोणत्या समस्यांवर सोल्युशन्स शोधत आहेत आणि त्यांना कोणत्या कौशल्यांची आवश्यकता आहे हे समजून घेणे, ते कुठे प्रभावी योगदान देऊ शकतात हे ओळखण्यास मदत करू शकते. प्रोफेशनल नेटवर्क्स जोडणे तितकेच मोलाचे आहे, जे कंपन्या आणि उद्योगांच्या विकास करण्याच्या पद्धतींबद्दल माहिती देते आणि प्रोफेशनल्सना शिकण्याच्या व विकास करण्याच्या संधी शोधण्यात मदत करते.”

 

“पुण्यातील लिंक्डइनच्या २०२६ टॉप स्टार्टअप्स लिस्टमध्ये स्थान मिळणे हा ईमोटोरॅड उभारणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी अभिमानाचा क्षण आहे. आमच्या संस्कृतीचा भर कर्मचाऱ्यांना संस्थापकांप्रमाणे विचार करण्याची मोकळीक देण्यावर आहे. आम्ही व्यवसाय वाढवत असताना त्यांनी त्यांच्या संकल्पनांची जबाबदारी घ्यावी आणि त्यांचे रूपांतर प्रत्यक्ष प्रकल्पांमध्ये करावे अशी आमची इच्छा आहे,” असे ईमोटोरॅडचे सह-संस्थापक आणि सीईओ कुणाल गुप्ता म्हणाले.

 

पुण्यातील २०२६ लिंक्डइन टॉप स्टार्टअप्सची संपूर्ण लिस्ट पुढीलप्रमाणे आहे:

 

पाल्मोनास

झेप्टो

ईमोटोरॅड

हाऊस ऑफ एडटेक

अरेट्टो

अनबॉक्स रोबोटिक्स

पेपरमिंट रोबोटिक्स

बायोफ्युएलसर्कल

ब्लू एनर्जी मोटर्स

इन्स्पॅको

 

लिंक्डइन टॉप स्टार्टअपमध्ये रोजगार मिळवण्याबाबत निरजिता बॅनर्जी यांच्या काही महत्त्वाच्या टिप्स पुढीलप्रमाणे आहेत:

 

● केवळ रोजगारांच्या जाहिरातींऐवजी कंपनीच्या वाढीच्या गतीकडे लक्ष द्या: आपली उत्पादने विस्तारणाऱ्या, नवीन बाजारपेठांमध्ये प्रवेश करणाऱ्या किंवा ग्राहकांच्या वाढत्या गरजांवर सोल्युशन्स शोधणाऱ्या कंपन्यांना फॉलो करा. हे संकेत तुम्हाला संभाव्य संधी आधीच ओळखण्यास मदत करू शकतात.

 

● अर्ज करण्यापूर्वी व्यवसाय समजून घ्या: कंपनी काय काम करते, कोणासाठी सेवा पुरवते आणि कोणत्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न करत आहे याबद्दल संशोधन करा. यामुळे एखादी संधी तुमच्या आवडीनिवडी आणि कौशल्यांशी सुसंगत आहे की नाही हे तपासण्यास मदत होते.

 

● गरज पडण्यापूर्वी संबंध प्रस्थापित करा: तुम्हाला स्वारस्य असलेल्या कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांशी कनेक्ट व्हा, त्यांच्या कामामध्ये विचारपूर्वक सहभाग नोंदवा आणि अभ्यासपूर्ण प्रश्न विचारा. हे संवाद तुम्हाला कंपनी समजून घेण्यास आणि इतर वेळी नजरेतून सुटू शकणाऱ्या संधी शोधण्यास मदत करू शकतात.

 

● तुम्ही कसा प्रभाव पाडू शकता ते दाखवा: केवळ पदव्या किंवा पात्रतेची यादी मांडण्यापलीकडे विचार करा. तुमची कौशल्ये कंपनीच्या उद्दिष्टांमध्ये कसे योगदान देऊ शकतात हे दाखवण्यासाठी संबंधित प्रकल्प, अनुभव आणि समस्यांवरील सोल्युशन्सची उदाहरणे द्या.

 

● जिज्ञासू आणि परिस्थितीशी जुळवून घेणारे राहा: स्टार्टअप्स वेगाने विकसित होऊ शकतात. शिकण्याची तयारी, पुढाकार घेण्याची वृत्ती आणि अनिश्चिततेमध्ये मार्ग काढण्याची क्षमता, टीम्स आणि व्यवसायाच्या गरजा बदलत असताना तुम्हाला इतरांपेक्षा वेगळे ठरण्यास मदत करू शकते.

 

तुम्ही पुण्यासाठी लिंक्डइन इंडिया २०२६ टॉप स्टार्टअप्स लिस्ट येथे पाहू

शकता.

 

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments