Thursday, October 15, 2026
Google search engine
HomeUncategorizedविमान प्रवास मणक्याच्या आरोग्यासाठी ठरू शकतो त्रासदायक: तज्ज्ञांचा इशारा*

विमान प्रवास मणक्याच्या आरोग्यासाठी ठरू शकतो त्रासदायक: तज्ज्ञांचा इशारा*

 

*काम करणाऱ्या लोकांमध्ये मणक्याशी संबंधित समस्यांमध्ये ५० टक्क्यांनी वाढ झाली आहे.दर महिन्याला २५ ते ५५ वयोगटातील १० कामकाजी व्यक्तींपैकी ५ जण कंबरदुखी, मान आणि खांदे आखडणे, हात किंवा पायांपर्यंत पसरणाऱ्या वेदना, हात-पायांना मुंग्या येणे किंवा बधिरपणा जाणवणे अशा तक्रारी घेऊन येतात*

 

प्रवासादरम्यान बराच वेळ एकाच जागी बसणे, चुकीच्या पद्धतीने बसणे आणि हालचाल न करणे यामुळे पाठदुखी आणि शरीर आखडण्याचा त्रास होऊ शकतो. मणक्याचे आरोग्य चांगले ठेवण्यासाठी काही सोप्या गोष्टींची काळजी घेण्याचा तज्ज्ञांचा सल्ला.

 

पुणे: महाराष्ट्रातील अनेक लोकांचा दैनंदिन प्रवासाचा वेळ वाढत आहे.अनेक जण रोज कामासाठी लांबचा प्रवास करतात, कारने अनेक तास प्रवास करतात किंवा वारंवार विमानाने प्रवास करतात. अशा वेळी बराच वेळ एकाच जागी बसणे आणि चुकीच्या पद्धतीने बसणे याचा मणक्याच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो, असा इशारा तज्ज्ञांनी दिला आहे. पुण्यासह इतर शहरांमध्ये रोज कामासाठी प्रवास करणे, लांबचा रस्ते प्रवास आणि कार्यालयात अनेक तास बसून काम करणे यामुळे पाठदुखी, शरीर आखडणे आणि अस्वस्थता जाणवू शकते. विशेषतः प्रवासादरम्यान मध्येच थांबून हालचाल करण्यासाठी पुरेसा वेळ न घेतल्यास हा त्रास वाढू शकतो.

 

पुण्यातील आयटी क्षेत्रात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर २०२६ मध्ये करण्यात आलेल्या एका अभ्यासात असे आढळले की, ५४.२ टक्के कर्मचाऱ्यांना सध्या स्नायू आणि हाडांशी संबंधित वेदनांचा त्रास होता. यामध्ये कंबरदुखीची तक्रार सर्वाधिक आढळली.अशा तक्रारी असलेल्या कर्मचाऱ्यांपैकी ६८.२ टक्के जणांना कंबरेच्या खालच्या भागात दुखत होते.तसेच, दररोज १२ ते १४ तास काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांमध्ये हा त्रास सर्वाधिक होता. या गटातील ६३.३ टक्के कर्मचाऱ्यांना स्नायू आणि हाडांशी संबंधित वेदना होत असल्याचे अभ्यासात दिसून आले.

 

आज अनेकांना कामानिमित्त प्रवास करावा लागतो. काही जण स्वतः कार चालवतात, तर काहींना कामासाठी दुसऱ्या शहरात जावे लागते किंवा लांब पल्ल्याचा विमान प्रवास करावा लागतो. मात्र, प्रवासात बराच वेळ बसून राहिल्यामुळे मणक्याच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो, हे समजून घेणे महत्त्वाचे आहे.

 

*पुण्यातील अपोलो स्पेक्ट्रा रूग्णालयातील स्पाईन सर्जन डॉ. शार्दुल सोमण म्हणाले की,* “प्रवासादरम्यान अनेक तास एकाच जागी बसून राहिल्यामुळे मणक्यावर सतत ताण येतो. बसण्याची पद्धत चुकीची असल्यास हा ताण आणखी वाढतो.अनेक तास एकाच स्थितीत बसल्यामुळे पाठीचे स्नायू आखडतात आणि आधीपासून असलेली पाठदुखी वाढू शकते. अनेकदा लोक वेळेत आपल्या ठिकाणी पोहोचण्याच्या घाईत असतात.त्यामुळे त्यांना जाणवणाऱ्या वेदना किंवा अस्वस्थतेकडे ते दुर्लक्ष करतात.मात्र, मणक्याचे आरोग्य चांगले ठेवण्यासाठी प्रवासादरम्यान वेळोवेळी हालचाल करणे गरजेचे आहे.लांब पल्ल्याच्या विमान प्रवासातही अनेक तास एकाच जागी बसावे लागते. बराच वेळ पुढे झुकून बसणे, पाठ वाकवून बसणे किंवा योग्य आधाराशिवाय मोबाईल आणि लॅपटॉप वापरणे यामुळे मान आणि कंबरेच्या खालच्या भागावर जास्त ताण येऊ शकतो.काम करणाऱ्या लोकांमध्ये मानदुखी, कंबरदुखी, मान आणि पाठीचे स्नायू आखडणे, स्नायूंवर ताण येणे, मणक्यातील डिस्क फुगणे, डिस्कमधील पाण्याचे प्रमाण कमी होणे, डिस्कची लवकर झीज होणे आणि डिस्कचा काही भाग बाहेर येणे अशा समस्या सामान्यपणे दिसून येतात.”

 

*डॉ. शार्दूल पुढे म्हणाले,* “काम करणाऱ्या लोकांमध्ये मणक्याशी संबंधित समस्यांमध्ये ५० टक्क्यांनी वाढ झाली आहे.दर महिन्याला २५ ते ५५ वयोगटातील १० कामकाजी व्यक्तींपैकी ५ जण कंबरदुखी, मान आणि खांदे आखडणे, हात किंवा पायांपर्यंत पसरणाऱ्या वेदना, हात-पायांना मुंग्या येणे किंवा बधिरपणा जाणवणे अशा तक्रारी घेऊन येतात.काही लोकांना वाकताना किंवा सहज हालचाल करतानाही त्रास होतो.अशा रुग्णांना पुढील तपासणी करण्याचा सल्ला दिला जातो.’’

 

कारने प्रवास करणाऱ्यांनी बसण्याची सीट अशा प्रकारे ठेवावी की पाठीला योग्य आधार मिळेल. शरीर ताणून किंवा अस्वस्थ स्थितीत बसून वाहन चालवणे टाळावे.लांबचा प्रवास करताना ठरावीक वेळाने वाहन थांबवावे, बाहेर पडावे आणि काही मिनिटे चालावे.विमान प्रवासादरम्यानही शक्य असेल तेव्हा बसण्याची स्थिती बदलावी, पायांची हालचाल करावी आणि शक्य असल्यास थोडे चालावे.या सोप्या उपायांमुळे शरीर आखडणे आणि अस्वस्थता कमी होण्यास मदत होऊ शकते.

 

दररोज बराच वेळ प्रवास करणाऱ्या लोकांनी वेदना सुरू होण्याची वाट न पाहता नियमित हालचाली करण्याची सवय लावावी, असा तज्ज्ञांचा सल्ला आहे. सोपे स्ट्रेचिंग व्यायाम करणे, कामाच्या ठिकाणी पोहोचल्यानंतर थोडे चालणे, बसताना पाठ सरळ आणि आरामदायक स्थितीत ठेवणे तसेच चुकीच्या पद्धतीने बसून बराच वेळ मोबाईल वापरणे टाळणे यामुळे मणक्यावर येणारा अनावश्यक ताण कमी होऊ शकतो. तसेच, वारंवार होणाऱ्या किंवा सतत जाणवणाऱ्या पाठदुखीकडे दुर्लक्ष करू नये. विश्रांती घेतल्यानंतरही वेदना कमी होत नसतील, वेदना वाढत असतील, पायांपर्यंत पसरत असतील किंवा त्यासोबत बधिरपणा अथवा अशक्तपणा जाणवत असेल, तर डॉक्टरांचा सल्ला घेऊन वैद्यकीय तपासणी करून घेणे आवश्यक आहे.”

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments