Saturday, October 17, 2026
Google search engine
HomeUncategorizedसिंबायोसिस ओपन एज्युकेशन सोसायटीमध्ये सरस्वती पूजनाचा सोहळा उत्साहात संपन्न*

सिंबायोसिस ओपन एज्युकेशन सोसायटीमध्ये सरस्वती पूजनाचा सोहळा उत्साहात संपन्न*

 

 

पुणे: सिंबायोसिस ओपन एज्युकेशन सोसायटी, पुणे येथे शनिवारी सरस्वती पूजन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. ज्ञान, विद्या, बुद्धी आणि संस्कार यांचे प्रतीक असलेल्या देवी सरस्वतीचे पूजन करून या वेळी आदरभाव व्यक्त करण्यात आला.

 

 

याप्रसंगी, सिंबायोसिस चे संस्थापक व अध्यक्ष डॉ. शां. ब. मुजुमदार आणि सिंबायोसिस स्किल्स अँड प्रोफेशनल युनिव्हर्सिटी, पुणे तसेच सिंबायोसिस युनिव्हर्सिटी ऑफ अप्लाइड सायन्स, इंदोरच्या कुलपती डॉ. स्वाती मुजुमदार यांच्या हस्ते सरस्वतीमातेचे पूजन करण्यात आले.

 

देवी सरस्वतीचे मंगलमय रूप, महाकालीचा रुद्रावतार, पश्चिम बंगालमधील पारंपरिक धुनुची नृत्य आणि महिषासुरमर्दिनी स्तोत्राच्या सादरीकरणातून भक्ती, संस्कृती आणि कलेचा सुरेल संगम अनुभवायला मिळाला. या सोहळ्यात विद्यार्थ्यांनी नृत्य आणि संगीताच्या माध्यमातून नवदुर्गांचा जागर केला. विविधरंगी वेशभूषा आणि प्रभावी कलाविष्कारांनी उपस्थितांची मने जिंकली.

 

यावेळी सौ. संजीवनी मुजुमदार, संचालिका, डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्यूझीयम व मेमोरिअल; डॉ. विद्या येरवडेकर, कुलपती, सिंबायोसिस इंटरनॅशनल युनिव्हर्सिटी; डॉ. राजीव येरवडेकर, प्रोव्होस्ट, वैद्यकीय व आरोग्य विज्ञानशाखा, सिंबायोसिस इंटरनॅशनल युनिव्हर्सिटी; एअर मार्शल भूषण गोखले (निवृत्त), माजी उपवायुसेनाप्रमुख; एअर कमोडोर प्रमोद पुराणिक (निवृत्त), उपाध्यक्ष, भारत फोर्ज; श्री. अनंत रंजन, वरिष्ठ व्यवस्थापन व्यावसायिक; मेजर सोनाली कदम (निवृत्त), संचालक, एससीडीएल; आशिष लिमगिरे, कुलसचिव, सिंबायोसिस ओपन एज्युकेशन सोसायटी आणि शरद पुलाटे, कुलसचिव, एससीडीएल व इतर मान्यवर उपस्थित होते.

 

डॉ. स्वाती मुजुमदार म्हणाल्या, “नवरात्रोत्सवानिमित्त दरवर्षीप्रमाणे यंदाही सिंबायोसिस ओपन एज्युकेशन सोसायटीमध्ये नवदुर्गांच्या जागराचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या नृत्य आणि संगीताविष्कारातून भक्ती, संस्कृती आणि विद्येचा सुरेल संगम अनुभवायला मिळाला.”

————————————

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments