शॉपर्स स्टॉप दिवाळीचा उत्साह साजरा करत असताना अभिनेत्री सई मांजरेकर शोस्टॉपर बनल्या
पुणे, : शॉपर्स स्टॉप या भारतामधील फॅशन, ब्युटी आणि गिफ्टिंग क्षेत्रातील आघाडीच्या प्रीमियम ब्रँडने पुण्यातील पॅव्हेलियन मॉल येथे एका विशेष फॅशन शोकेसचे आयोजन करून दिवाळीचा उत्सवी आनंद अधिक उत्साहित केला. दिवाळीचे औचित्य साधून सादर करण्यात आलेल्या या खास फेस्टिव्ह फॅशन कलेक्शनमध्ये आधुनिक शैली आणि पारंपरिकतेचा अप्रतिम संगम पाहायला मिळाला, जो दिवाळीतील विविध सण-प्रसंगांना अधिक खास बनवतो.
दिवाळीच्या विविध रंगछटांवरून प्रेरित होऊन या कलेक्शनमध्ये चार वेगवेगळ्या फॅशन थीम्स सादर करण्यात आल्या होत्या, ज्या सणासुदीच्या वेगवेगळ्या क्षणांचे प्रतिनिधित्व करतात. दिवाळी होमकमिंगने कॅज्युअल वेस्टर्न वेअरसह या शोची सुरुवात केली, ज्यामधून उत्सवासाठी घरी परततानाचा आनंद आणि उत्साह दिसून आला. दिवाळी गेम नाइट लूकने पार्टीवेअर आणि आधुनिक वेस्टर्न स्टाइल्स रॅम्पवर आणत मित्र आणि कुटुंबीयांसोबत साजऱ्या केल्या जाणाऱ्या उत्सवी संध्याकाळांमधील मज्जा व ग्लॅमरचे दर्शन घडवले. फॅमिली गेट-टुगेदर लूकने फ्युजन आणि इंडो-वेस्टर्न पोशाखांची ओळख करून दिली, ज्यामध्ये आधुनिक डिझाइन्सचा सणांच्या परंपरेशी सुंदर मेळ साधण्यात आला होता. तर फेस्टिव्ह सेलिब्रेशन एडिटने भव्य सणासुदीच्या क्षणांसाठी परिपूर्ण असलेल्या पारंपरिक भारतीय एथनिक वेअरचे चिरंतन सौंदर्य दर्शवले. एकत्रित, घरी परतण्याच्या साधेपणापासून कौटुंबिक स्नेहमेळावे आणि भव्य उत्सवांपर्यंत दिवाळीच्या सर्व छटा या विविध लूक्समधून प्रभावीपणे मांडण्यात आल्या.
हे कलेक्शन विचारपूर्वक निवडलेल्या उत्पादनांच्या माध्यमातून प्रीमियम अनुभवावर भर देण्याच्या शॉपर्स स्टॉपच्या दृष्टिकोनला सादर करते, जे ग्राहकांना खरेदीचा अधिक उत्साहवर्धक अनुभव देण्यासाठी फॅशन, ब्युटी आणि लाइफस्टाइल या सर्व श्रेणींना एकत्र आणते. आधुनिक वेस्टर्न वेअर आणि भारतीय एथनिक पोशाखांपासून अॅक्सेसरीज, प्रीमियम वॉचेस्, हँडबॅग्ज, परफ्युम्स आणि ब्युटी प्रॉडक्ट्सपर्यंत ग्राहकांना त्यांचा उत्सवाचा वॉर्डरोब सजवण्यासाठी आणि परिपूर्ण फेस्टिव्ह लूक मिळवण्यासाठी अनेक पर्याय बाजारपेठेत उपलब्ध आहेत.
शॉपर्स स्टॉपचे कस्टमर केअर असोसिएट आणि सीएमओ श्री. जितेन महेंद्र म्हणाले, “दिवाळी म्हणजे आनंदोत्सव, आपुलकी आणि नवी सुरुवात, तसेच या भावना व्यक्त करण्याचा सर्वात अर्थपूर्ण मार्ग म्हणजे भेटवस्तू देणे. ‘गिफ्ट्स ऑफ लव्ह’च्या माध्यमातून आम्हाला प्रत्येक उत्सवासाठी फेस्टिव्ह स्टाइल्ससोबत फॅशन, ब्युटी, परफ्युम्स, वॉचेस् आणि लाइफस्टाइल उत्पादने एकाच छताखाली एकत्र आणायची होती. आमच्या या खास कलेक्शनमुळे ग्राहकांना कुटुंब आणि मित्रांसाठी विचारपूर्वक भेटवस्तू शोधणे अधिक सोपे जाते. पुण्यात सई मांजरेकर यांच्या हस्ते या कलेक्शनचे अनावरण करण्यात आले, ज्यासह या उत्सवाचा उत्साह आणखी वाढला. दिवाळीची खरेदी अधिक दर्जेदार, वैयक्तिक आणि संस्मरणीय बनवणे हाच शॉपर्स स्टॉपचा नेहमी प्रयत्न असतो.”
हे फेस्टिव्ह कलेक्शन सर्व शॉपर्स स्टॉप स्टोअर्समध्ये आणि ऑनलाइन उपलब्ध आहे. ग्राहक ५०० हून अधिक प्रीमियम ब्रँड्समधील पोशाख, सौंदर्य प्रसाधने, परफ्युम्स, वॉचेस्, हँडबॅग्ज, सनग्लासेस, फूटवेअर आणि अॅक्सेसरीजच्या खास कलेक्शनमधून आपला सणासुदीचा परिपूर्ण लूक साकारू शकतात.
पर्सनल शॉपर सेवा, एक्सक्लुझिव्ह फर्स्ट सिटीझन क्लबचे विशेषाधिकार आणि आघाडीच्या प्रीमियम ब्रँड्सच्या पोर्टफोलिओसह शॉपर्स स्टॉप फॅशन, ब्युटी आणि लाइफस्टाइलचा परिपूर्ण खरेदी अनुभव सातत्याने ग्राहकांसाठी उपलब्ध करून देत आहे.


