Thursday, August 20, 2026
Google search engine
HomeUncategorizedसॅमसंग १७ एप्रिल रोजी भारतात एआय टेलिव्हिजन्‍सची नवीन श्रेणी लाँच करणार

सॅमसंग १७ एप्रिल रोजी भारतात एआय टेलिव्हिजन्‍सची नवीन श्रेणी लाँच करणार

गुरूग्राम, भारत – एप्रिल ८, २०२४: सॅमसंग हा भारतातील सर्वात मोठा ग्राहक इलेक्‍ट्रॉनिक्‍स ब्रँड १७ एप्रिल २०२४ रोजी आर्टिफिशियल इंटेलिजन्‍स-पॉवर्ड टेलिव्हिजन्‍सची नवीन श्रेणी लाँच करण्‍यास सज्‍ज आहे.

 

एआय टेलिव्हिजन्‍सचे आगामी लाँच या वर्षाच्‍या सुरूवातीला सॅमसंगच्‍या मोठ्या एआय-संबंधित घोषणांच्‍या आधारावर आहे. सॅमसंगने जानेवारीमध्‍ये गॅलॅक्‍सी एस२४ सिरीजसह त्‍यांच्‍या स्‍मार्टफोन्‍ससाठी गॅलॅक्‍सी एआय आणि या आठवड्याच्‍या सुरूवातीला त्‍यांच्‍या होम अप्‍लायन्‍सेससाठी बीस्‍पोक एआय लाँच केले.

 

यंदा सॅमसंगची निओ क्‍यूएलईडी ८के सिरीज, निओ क्‍यूएलईडी ४के सिरी आणि ओएलईडी सिरीजमध्‍ये एआयची शक्‍ती असणार आहे.

 

सॅमसंगला भारतातील एआय टीव्‍हींची नवीन श्रेणी खरेदी करण्‍यामध्‍ये इच्‍छुक असलेल्‍या ग्राहकांकडून ऑर्डर्स देखील मिळत आहेत. ग्राहक Samsung.com आणि सॅमसंग शॉप अॅपवर ५००० रूपये पेमेंट करत सॅमसंगचे नवीन एआय टेलिव्हिजन्‍स प्री-ऑर्डर करू शकतात. सॅमसंगच्‍या नवीन एआय-पॉवर्ड टेलिव्हिजन्‍स प्री-ऑर्डर करणारे ग्राहक त्‍यांच्‍या खरेदीवर स्‍पेशल ऑफर्स अगोदर मिळण्‍यास पात्र ठरतील.

 

निओ क्‍यूएलईडी ८के सिरीज (७५ इंच व त्‍यापेक्षा अधिक आकाराचे) प्री-ऑर्डर करणारे ग्राहक त्‍यांच्‍या खरेदीवर १५००० रूपयांच्‍या फायद्यांचा आनंद घेऊ शकतात, तर निओ क्‍यूएलईडी ४के व ओएलईडी सिरीज प्री-ऑर्डर करणाऱ्या ग्राहकांना त्‍यांच्‍या खरेदीवर १०,००० रूपयांचे फायदे मिळतील.

 

सॅमसंगचा नवीन निओ क्‍यूएलईडी ८के टीव्‍ही प्रीमिअम व्‍युइंग अुनभव, वैयक्तिकृत अनुभव, ऊर्जा बचत व नाविन्‍यपूर्ण वैशिष्‍ट्यांसह सर्वोत्तम ऑडिओ व शक्तिशाली ऑडिओ वैशिष्‍ट्ये

देतो.

 

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments