Thursday, October 22, 2026
Google search engine
HomeUncategorizedभारत विकास परिषदेतर्फे दिव्यांगांना कृत्रिम पायाचे मोफत वाटप*

भारत विकास परिषदेतर्फे दिव्यांगांना कृत्रिम पायाचे मोफत वाटप*

 

 

पुणे, दि. २२ – भारत विकास परिषदेच्या पुण्यातील दिव्यांग पुनर्वसन केंद्रामध्ये आज ७५ गरजू दिव्यांगांना कृत्रिम अत्याधुनिक पाय मोफत बसविण्यात आले. सुमारे ५० ते ७५ हजार रुपयांची किंमत असलेले पाय सिरम इन्स्टिट्यू्च्या विलू पुनावाला फौंडेशन यांच्या आर्थिक सहयोगातून आणि आर ए सस्टेनेबल एनर्जी सोल्यूशन यांच्या सहाय्याने या दिव्यांगांना मोफत बसवण्यात आले. आज झालेल्या या कार्यक्रमात काही दिव्यांगांनी विविध हालचाली करून प्रात्यक्षिके देखील करून दाखवली. कृत्रिम पाय बसवल्यावर दिव्यांगांनी जिना चढणे, मांडी घालून बसणे, उकिडवे बसणे, वीरासनात बसणे, धावणे वगैरे कृती करून दाखवल्या. पुनावाला ग्रुपतर्फे शेखर ढवळीकर, सुंदे कविटकर उपस्थित होते. भारत विकास परिषदेच्या ट्रस्टचे अध्यक्ष दत्ता चितळे, केंद्रप्रमुख विनय खटावकर, ट्रस्टी राजशेखर अभ्यंकर आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. गीता कुलकर्णी यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. परिषदेच्या या केंद्रातर्फे येत्या २३ ऑक्टोबर रोजी आळंदी, २९ ऑक्टोबर रोजी यवतमाळ आणि नोव्हेंबरमध्ये खामगाव येथे मोफत शिबिरे होणार आहेत, अशी माहिती यावेळी विनय खटावकर यांनी दिली.

—-

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments