‘#१ मिलियन लाइव्ह्ज’ या आपल्या उपक्रमातून मॅनकाइंड फार्माने स्तन आरोग्याची काळजी, लवकरात लवकर निदान आणि योग्य उपचारांचे महत्त्व अधोरेखित केले
पुणे, २३ ऑक्टोबर, २०२६: मॅनकाइंड फार्माने स्तन कर्करोग जागरूकता महिन्याचे औचित्य साधत, आपल्या ‘पिंक ऑक्टोबर’ मोहिमेच्या माध्यमातून स्तन कर्करोगाविषयी जागरूकता, लवकरात लवकर निदान आणि वेळेवर उपचारांच्या महत्त्वावर प्रकाश टाकला आहे. हा उपक्रम कंपनीच्या ‘#१ मिलियन लाइव्ह्ज’ या प्रवासाचाच एक भाग आहे, ज्याचा उद्देश कर्करोगाविषयीची जागरूकता अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवणे आणि नागरिकांना त्यांच्या आरोग्यासाठी सक्रिय पावले उचलण्यास प्रोत्साहित करणे हा आहे.
स्तनांच्या बाबतीत काहीही असामान्य जाणवत असल्यास लवकरात लवकर वैद्यकीय सल्ला घेण्यास महिलांना प्रोत्साहित करण्यासाठी आणि या आजाराविषयीची त्यांची समज वाढवण्यासाठी जागरूकता अत्यंत महत्त्वाची ठरते. स्तनात गाठ येणे किंवा त्वचा जाड होणे, स्तनाचा आकार किंवा स्वरूपात बदल होणे, त्वचेवर बदल दिसणे, स्तनाग्रांमध्ये बदल होणे किंवा त्यातून असामान्य स्त्राव येणे, ही स्तनाच्या कर्करोगाची आजाराची संभाव्य लक्षणे असू शकतात. हे बदल म्हणजे कर्करोगच आहे असे नाही, तरीही त्यांची डॉक्टरांकडून वैद्यकीय तपासणी करून घेणे गरजेचे आहे. व्यक्तीचे वय आणि आजाराचा धोका लक्षात घेऊन केलेल्या क्लिनिकल तपासण्या आणि मॅमोग्राफीमुळे हा आजार सुरुवातीच्या टप्प्यात ओळखण्यास मोठी मदत होते.
मॅनकाइंड फार्माचे सीनियर प्रेसिडेंट अतिश मजुमदार यांनी सांगितले, “कर्करोगाविषयीची जागरूकता केवळ आरोग्य केंद्रांपुरती मर्यादित न राहता, ती लोकांच्या जीवनशैलीचा आणि आरोग्याकडे पाहण्याच्या दृष्टिकोनाचा एक अविभाज्य भाग बनली पाहिजे. आमच्या ‘#१ मिलियन लाइव्ह्ज’ उपक्रमाद्वारे, विश्वसनीय आरोग्य माहिती अधिक लोकांपर्यंत सहज पोहोचवणे आणि त्यांना आरोग्याविषयी सक्रिय निर्णय घेण्यास प्रोत्साहित करणे हे आमचे ध्येय आहे. ‘पिंक ऑक्टोबर’ ही मोहीम स्तन आरोग्याची जागरूकता, लवकरात लवकर निदान आणि वेळेवर वैद्यकीय सल्ल्याला प्राधान्य देऊन आमच्या या वचनबद्धतेला अधिक बळकट करते. आमचा असा ठाम विश्वास आहे की, जागरूकता वाढवण्याच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे नागरिक आणि त्यांचे कुटुंबीय आपल्या आरोग्याविषयी योग्य व माहितीपूर्ण निर्णय घेण्यास सक्षम होतील.”
कर्करोगाचे लवकर निदान झाल्यामुळे डॉक्टरांना उपचारांची योग्य दिशा ठरवण्यास मोठी मदत होते. डायग्नोस्टिक मूल्यमापन आणि ट्युमर प्रोफाइलिंग यांसारख्या अत्याधुनिक चाचण्यांमुळे स्तन कर्करोगाचे नेमके स्वरूप व वैशिष्ट्ये समजून घेता येतात, ज्यामुळे उपचारांचे पुढील निर्णय घेणे सोपे होते. जेथे गरज असेल तेथे ‘एचईआर२’ चाचणी केल्याने ट्युमरची अचूक स्थिती समजते. परिणामी, रुग्णावर करावयाच्या योग्य टार्गेटेड थेरपी आणि उपचारांबाबत योग्य निर्णय घेता येतात.
डॉ. अमन चौधरी, सल्लागार वैद्यकीय कर्करोगतज्ज्ञ, भारती हॉस्पिटल, पुणे यांनी सांगितले, “स्तनांमधील असामान्य बदल ओळखणे आणि कोणताही विलंब न करता वैद्यकीय सल्ला घेणे ही वेळीच निदानाच्या दिशेने टाकलेली अत्यंत महत्त्वाची पावले आहेत. तपासणीचे निकष हे व्यक्तीचे वय आणि त्यामधील आजाराचा वैयक्तिक धोका यांसारख्या घटकांवर अवलंबून असतात, म्हणूनच पात्र आरोग्य तज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक ठरते. स्तन कर्करोगाचे निदान झालेल्या रुग्णांमध्ये डायग्नोस्टिक मूल्यमापन आणि बायोमार्कर चाचण्या—ज्यामध्ये आवश्यकतेनुसार ‘एचईआर२’ चाचणीचा समावेश होतो—उपचारांचे निर्णय घेण्यास मदत करतात. वाढीव जागरूकतेमुळे नागरिकांना वेळेवर तपासणी करण्याची प्रेरणा मिळू शकते आणि रुग्णांना योग्य उपचार मिळण्यास मदत होते.”
जून २०२६ मध्ये सुरू झालेल्या मॅनकाइंड फार्माच्या ‘#१ मिलियन लाइव्ह्ज’ उपक्रमांतर्गत आतापर्यंत ५०० हून अधिक आरोग्य कर्मचाऱ्यांना प्रशिक्षित करण्यात आले आहे, तर जुलै महिन्यात २८५ डॉक्टरांनी १ दशलक्ष कुटुंबांचे संरक्षण करण्यात मदत करण्याची प्रतिज्ञा घेतली आहे. ‘पिंक ऑक्टोबर’च्या माध्यमातून कंपनी प्रिव्हेंटिव्ह ऑन्कोलॉजीवर आपला भर अधिक दृढ करत असून, आजाराचे लवकर निदान आणि वेळेवर काळजी घेण्याबाबत अधिक जागरूकतेला सातत्याने प्रोत्साहन देत आहे.


