क्रिएटिव्ह फाउंडेशन आणि कै. विश्वनाथ भेलके प्रतिष्ठान आयोजित कोथरूड नवरात्र महोत्सवाचा समारोप बाळकृष्ण नेहरकर प्रस्तुत होम मिनिस्टर कार्यक्रमाने झाला. यावेळी क्रिएटिव्ह फाउंडेशन चचे अध्यक्ष अध्यक्ष संदीप खर्डेकर यांनी स्त्री शक्ती चा गौरवपूर्ण उल्लेख करताना सांगितले की ” महिलाच आपले सण साजरे करताना परंपरा आणि संस्कृती जपतात व पुढील पिढीवर योग्य संस्कार देखील करतात.त्यांचे आयुष्य खडतर असते व कुटुंबातील प्रत्येकाचे मन राखण्यात त्या आयुष्य वेचतात.म्हणून त्यांच्या आयुष्यात करमणुकीचे, विरंगुळ्याचे चार क्षण देण्याचा प्रयत्न क्रिएटिव्ह फाउंडेशन आणि कै. विश्वनाथ भेलके प्रतिष्ठान च्या वतीने केले जाते असे ही ते म्हणाले.
या वेळी क्रिएटिव्ह फाउंडेशनच्या विश्वस्त नगरसेविका मंजुश्री खर्डेकर, विश्वस्त प्रतीक खर्डेकर,कै. विश्वनाथ भेलके प्रतिष्ठान चे अध्यक्ष विशाल भेलके, प्रमुख विश्वस्त उमेश भेलके, उत्सव प्रमुख सौ. श्वेताली भेलके, सौ. कल्याणी खर्डेकर, सौ. अक्षदा भेलके,शंभूराजे भेलके उपस्थित होते.
बालजत्रा,लावणी, महाराष्ट्राची लोकधारा, दांडिया अश्या विविध कार्यक्रमांनी रंगलेल्या महोत्सवाचा शेवट होम मिनिस्टर ने झाले.उत्तरोत्तर रंगत गेलेल्या ह्या स्पर्धेत महिलांनी विविध खेळात आपले कौशल्य व एकाग्रता पणाला लावली.
सौ.अनघा जगताप ह्यांनी सर्व खेळात प्रवीण्य मिळवत फ्रिज व पैठणी जिंकली व त्या होममिनिस्टर च्या विजेत्या ठरल्या.
सुप्रसिद्ध निवेदक व अभिनेता बाळकृष्ण नेहरकर यांनी खुसखुशीत शैलीत
प्रस्तुत केलेल्या होम मिनिस्टर – खेळ रंगला वहिनींचा या कार्यक्रमातील अन्य विजेत्या ठरल्या
टीव्ही सह द्वितीय क्रमांक पटकावणाऱ्या अनिता ओवांडकर,
कपाट जिंकत तृतीय स्थानी प्रियांका शिंदे
गॅस शेगडी जिंकणाऱ्या अर्चना मुनी आणि पाचव्या स्थानावर टेबल फॅन जिंकला दीपाली जोशी यांनी.सर्व विजेत्यांना नगरसेविका मंजुश्री खर्डेकर, उत्सव प्रमुख श्वेताली भेलके, कल्याणी खर्डेकर व अक्षदा भेलके यांच्या हस्ते पारितोषिके देण्यात आली.
यावेळी भाजपा सरचिटणीस दीपक पोटे,नगरसेविका रुपालीताई पवार,संतोष लांडे, सचिन मोकाटे, एड. प्राची बगाटे, गोविंद थरकुडे, वैभव जमदाडे, समीर ताडे, विठ्ठल मानकर, पूनम चव्हाण, पूनम कारखानीस, मालन सरवदे, कविता सदाशिवे, रोशन चव्हाण यासह इतर अनेक मान्यवर उपस्थित होते.
कोथरूड च्या डी.पी रस्त्यावर बधाई स्वीट्स चौकात रंगलेल्या ह्या महोत्सवास परिसरातील नागरिकांनी भरभरून प्रतिसाद दिला. वाहतूक कोंडी होणार नाही आणि नागरिकांना स्पीकर च्या आवाजाचा त्रास होणार नाही याची विशेष काळजी घेतल्याचे विशाल भेलके व उमेश भेलके यांनी सांगितले.


