Wednesday, October 28, 2026
Google search engine
HomeUncategorizedगश्मीर महाजनी, उमेश परिचारक यांना यंदाचा सृजन युवा कलाकार व युवा उद्योजक...

गश्मीर महाजनी, उमेश परिचारक यांना यंदाचा सृजन युवा कलाकार व युवा उद्योजक पुरस्कार*

 

याज्ञवल्क्य उद्योजक विकास अभियान (युवा) वर्धापन दिन सोहळा ; सिटी कार्पोरेशन लि.चे अनिरुद्ध देशपांडे यांची उपस्थिती

 

पुणे : शुक्ल यजुर्वेदीय माध्यंदिन महाराष्ट्रीय ब्राह्मण मध्यवर्ती मंडळाचा उपक्रम असलेल्या याज्ञवल्क्य उद्योजक विकास अभियान (युवा) च्या १९ व्या वर्धापनदिनानिमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. सोहळ्यांतर्गत वितरित होणारे सृजन आर्ट गॅलरी पुरस्कृत सृजन युवा कलाकार पुरस्कार व स्व. चंद्रकांत जोशी स्मृतिप्रित्यर्थ युवा उद्योजक पुरस्कार अनुक्रमे लोकप्रिय अभिनेता गश्मीर महाजनी आणि युटोपियन शुगर्स लि.चे संचालक उमेश परिचारक यांना प्रदान करण्यात येणार आहे, अशी माहिती संस्थेचे कार्याध्यक्ष विश्राम कुलकर्णी यांनी पत्रकार परिषदेत दिली.

 

पत्रकार परिषदेला संस्थेचे कार्याध्यक्ष अध्यक्ष विश्राम कुलकर्णी, कार्यवाह श्रीकांत जोशी, डॉ. चैतन्य सराफ, विवेक मेढेकर, अजय कुलकर्णी, प्रतिभा संगमनेरकर, अपूर्वा देवगावकर, मंजुषा वैद्य, हर्षल लेले, उपेंद्र केळकर, श्रीकांत जोशी, सचिन पंडित आदी उपस्थित होते.

 

टिळक स्मारक मंदिर येथे शनिवार, दिनांक ३१ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ५ वाजता हा सोहळा आयोजित करण्यात आला आहे. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून सिटी कापोर्रेशन लि.चे अनिरुद्ध देशपांडे तसेच राज्यसभेच्या खासदार व संस्थेच्या युवा महिला अध्यक्ष डॉ. मेधा कुलकर्णी या उपस्थित राहणार आहेत. सन्मानचिन्ह, मानपत्र असे पुरस्काराचे स्वरुप आहे. यापूर्वी सृजन युवा कलाकार पुरस्कार स्वप्नील जोशी, मनोज जोशी, बेला शेंडे, संदीप खरे, संकर्षण क-हाडे, मुक्ता बर्वे, प्रसाद ओक आदींना देण्यात आला आहे.

 

पुरस्कार वितरण सोहळा, वर्धापन दिन कार्यक्रमासह ब्राह्मण उद्योजकांचे एकत्रीकरण हा देखील कार्यक्रमाचा उद्देश आहे. पुरस्कार वितरण सोहळ्यासोबतच दोन्ही पुरस्कारार्थींच्या यशस्वी प्रवासाबद्दलची प्रकट मुलाखत ऐकण्याची संधी देखील उपस्थितांना मिळणार आहे. सोहळ्याचे आयोजन संस्थेच्या युवा कार्यकारिणीने केले आहे.

 

कार्यक्रम सर्वांसाठी विनामूल्य खुला असून पुणेकरांनी मोठया संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन देखील करण्यात आले आहे. शुक्ल यजुर्वेदीय माध्यंदिन महाराष्ट्रीय ब्राह्मण मध्यवर्ती मंडळ ही संस्था १९४० साली स्थापन करण्यात आली. युवा हा उपक्रम २००४ साली स्व. चंद्रकांत जोशी यांच्या नेतृत्वाखाली पंढरपूर येथील अधिवेशनात सुरु करण्यात आला होता.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments