Friday, October 30, 2026
Google search engine
HomeUncategorizedराष्ट्रीय स्तरावर यश संपादन करणाऱ्या बालवैज्ञानिक कु. गीता धनवडे हिचा सर्वसाधारण सभेत...

राष्ट्रीय स्तरावर यश संपादन करणाऱ्या बालवैज्ञानिक कु. गीता धनवडे हिचा सर्वसाधारण सभेत सत्कार 

 

 

 

 

पिंपरी-चिंचवड : नवी दिल्ली येथे आयोजित ‘इन्स्पायर मानक’च्या १२ व्या राष्ट्रीय विज्ञान प्रदर्शनात उल्लेखनीय यश संपादन करत देशातील सर्वोत्कृष्ट सात बालवैज्ञानिकांमध्ये स्थान मिळविणाऱ्या पिंपरी-चिंचवड शहरातील कु. गीता गणपत धनवडे हिचा पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत उपमहापौर शर्मिला बाबर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

 

 

 

माधव सदाशिव गोळवलकर गुरुजी माध्यमिक विद्यालयाची विद्यार्थिनी असलेल्या गीताने १२ ते १४ ऑक्टोबरदरम्यान नवी दिल्ली येथे झालेल्या राष्ट्रीय विज्ञान प्रदर्शनात आपल्या प्रकल्पाच्या माध्यमातून उल्लेखनीय कामगिरी केली. तिची देशातील सर्वोत्कृष्ट सात बालवैज्ञानिकांमध्ये निवड झाली असून, जर्मनी येथे जाण्याची सुवर्णसंधी तिला प्राप्त झाली आहे.

 

 

 

यावेळी उमहापौर शर्मिला बाबर, स्थायी समिती सभापती अभिषेक बारणे, सत्तारूढ पक्षनेते प्रशांत शितोळे, विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर, शिवसेना गटनेते विश्वजीत बारणे, महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त डॉ. कुलदीप जंगम, तसेच अन्य पदाधिकारी, नगरसदस्य व अधिकारी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जनसंपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक यांनी केले.

 

 

 

गीताच्या या उल्लेखनीय यशामुळे पिंपरी-चिंचवड शहराच्या नावलौकिकात भर पडली आहे. तिच्या वैज्ञानिक दृष्टिकोनाचे आणि मेहनतीचे कौतुक करत उपमहापौर शर्मिला बाबर यांनी तिचे अभिनंदन केले आणि पुढील शैक्षणिक वाटचालीस शु

भेच्छा दिल्या.

 

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments