Saturday, October 31, 2026
Google search engine
HomeUncategorizedकोपा मॉलमध्ये १ नोव्हेंबर रोजी आकांक्षा त्रिपाठी यांच्यासोबत ‘भजन जॅमिंग’चे आयोजन

कोपा मॉलमध्ये १ नोव्हेंबर रोजी आकांक्षा त्रिपाठी यांच्यासोबत ‘भजन जॅमिंग’चे आयोजन

 

पुणे, ३१ ऑक्टोबर २०२६: कोरेगाव पार्क येथील कोपा मॉलमध्ये रविवार, १ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ७ वाजता गायिका आकांक्षा त्रिपाठी यांच्यासोबत ‘द सिनर्जी: भजन जॅमिंग’ या विशेष संगीत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे.

या कार्यक्रमात भजनांचे थेट सादरीकरण, तालबद्ध संगीताची साथ आणि सामूहिक भजनगायन यांचा सुंदर संगम अनुभवायला मिळणार आहे. यामध्ये उपस्थितांनाही भजनांच्या गायनात सहभागी होता येईल. भक्तिसंगीताला समकालीन स्वरूप देणाऱ्या या संध्याकाळी प्रेक्षकांचा सहभाग आणि एकत्रितपणे संगीतनिर्मितीचा आनंद यावर विशेष भर असेल.

हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतात प्रशिक्षित असलेल्या आकांक्षा त्रिपाठी या गायिका, संगीतकार आणि गीतकार आहेत. त्यांच्या संगीताचा आवाका बॉलीवूड, इंडिपेंडंट पॉप, लोकसंगीत आणि भक्तिसंगीत अशा विविध शैलींमध्ये पसरलेला आहे. त्यांच्या संगीतविषयक उपक्रमांमध्ये ‘भजन थेरपी’सारख्या संवादात्मक संगीत प्रकारांचाही समावेश आहे. या माध्यमातून भक्तिगीतांना सामूहिक सहभागाचा अनुभव दिला जातो.

कार्यक्रमाचा तपशील

कार्यक्रम: द सिनर्जी: आकांक्षा त्रिपाठी यांच्यासोबत भजन जॅमिंग

तारीख: रविवार, १ नोव्हेंबर २०२६

वेळ: सायंकाळी ७ वाजल्यापासून

स्थळ: कोपा मॉल, कोरेगाव पार्क, पुणे

प्रवेश: तिकिटांची सुरुवात ₹३९९ पासून

कोपा विषयी

कोरेगाव पार्कच्या मध्यवर्ती ठिकाणी वसलेले कोपा हे शहरातील आलिशान जीवनशैलीचे एक प्रमुख केंद्र आहे. अत्याधुनिक आणि आकर्षक वातावरणात खास रिटेल अनुभवांची अनोखी मेजवानी येथे उपलब्ध आहे. प्रीमियम शॉपिंगपासून ते दर्जेदार खाद्यपदार्थ आणि उत्कृष्ट डाइनिंग अनुभवांपर्यंत, विविध आवडी आणि गरजा लक्षात घेऊन निवडक पर्यायांची विस्तृत श्रेणी कोपा येथे सादर केली जाते. कोपा हा लेक शोर इंडिया समूहाचा ए

क भाग आहे.

 

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments