Thursday, August 20, 2026
Google search engine
HomeUncategorizedएस समर गेम्स २०२४ स्पर्धेत बॅडमिंटनमध्ये २८० खेळाडू सहभागी

एस समर गेम्स २०२४ स्पर्धेत बॅडमिंटनमध्ये २८० खेळाडू सहभागी

पुणे, १० एप्रिल २०२४: ईगल आय सोल्युशन्स आणि टू एल्व्हस क्राफ्टेड सोल्युशन्स यांच्या वतीने आयोजित एस समर गेम्स स्पर्धेत बॅडमिंटन क्रिडाप्रकारात २८० खेळाडूंनी आपला सहभाग नोंदवला आहे. हि स्पर्धा मुंढवा येथील चंचला कोद्रे स्पोर्टस कॉम्प्लेक्स या ठिकाणी रंगणार आहे.

 

ईगल आय सोल्युशन्सचे मिहिर रातंजनकर आणि टू एल्व्हस क्राफ्टेड सोल्युशन्सचे माधुरी लोणारी व श्रीश दाते यांनी सांगितले की,बॅडमिंटनमध्ये एकूण २८० खेळाडूंनी आपला सहभाग नोंदवला आहे. हि स्पर्धा ११ ते १३ एप्रिल २०२४ या कालावधीत रंगणार आहे. बॅडमिंटन स्पर्धा ११, १३, १५, १७, १९ वर्षाखालील मुले व मुली, पुरुष व महिला गट आणि मिश्र दुहेरी या गटात पार पडणार आहे.

 

यामध्ये मुलांच्या गटात पार्थ जातेगांवकर, अमेय शिंगवी, हिमांश हरगुणानी, सिबतैराझा सोमजी, वरद लांडगे, नील शोरेन, ग्रंथ वाळेचा, कृष्णनील गोरे, मीर शहझार अली, विराज सराफ, तर मुलींच्या गटात हर्षिता पाटील, पायल पाटील, शाणवी सिनगारे,कियारा साखरे, समन्वया धनंजय, सायुरी ठोकळ, परिधी बुधावार हे मानांकित खेळाडू झुंजणार आहेत. या आगळ्या वेगळ्या क्रिडा महोत्सवात बॉक्स क्रिकेट, फुटसाल, बॅडमिंटन, टेबल टेनिस, टेनिस, स्क्वॉश आणि पेडल टेनिस या सात क्रिडा प्रकारांचा समावेश असून विजेतेपदासाठी जिल्ह्यातील सर्व भागांतील अव्वल खेळाडू आपले कौशल्य पणाला लावणार आहे. बॉक्स क्रिकेट, फुटसाल, टेबल टेनिस, टेनिस, स्क्वॉश आणि पेडल टेनिस या स्पर्धा १३ व १४ एप्रिल २०२४ रोजी रंगणार आहे.

 

 

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments