पुणे, दि. २ (जिमाका, वृत्तसेवा) : राज्यातील क्रीडा विकासाला चालना देण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या ‘मिशन लक्ष्यवेध’ योजनेंतर्गत पुणे विभागीय क्रीडा निपुणता केंद्रातील कुस्ती (मुले) या खेळासाठी निवड चाचणी बुधवार, ४ नोव्हेंबर २०२६ रोजी सकाळी ९ वाजता शिवछत्रपती क्रीडा संकुल, म्हाळुंगे-बालेवाडी येथे आयोजित करण्यात आली आहे.
राष्ट्रीय स्पर्धेत सहभाग घेतलेले किंवा राज्यस्तरीय स्पर्धेत प्राविण्य मिळविलेले २५ वर्षांखालील खेळाडू या चाचणीसाठी पात्र असतील. इच्छुक खेळाडूंनी जन्मदाखला, शाळा सोडल्याचा दाखला, अधिवास प्रमाणपत्र, आधारकार्ड, मागील दोन वर्षांतील क्रीडा कामगिरीचे प्रमाणपत्र आणि शाळा/महाविद्यालयाचे बोनाफाईड प्रमाणपत्र सोबत आणावे. निवास व भोजन व्यवस्था खेळाडूंनी स्वतः करावयाची आहे.
अधिक माहितीसाठी श्री. उदय शेळके (८६०५८२१७८५) किंवा श्री. आकाश सलगर (९२८४८०६००३) यांच्याशी संपर्क साधावा. या निवड चाचणीचा जास्तीत जास्त खेळाडूंनी लाभ घ्यावा, असे आवाहन क्रीडा व युवक सेवा पुणे विभागाचे उपसंचालक युवराज नाईक यांनी केले आहे.
00000


