तळेगाव दाभाडे, : पुणे
औषधांचा सुरक्षित आणि योग्य वापर, रुग्णसेवेतील फार्मासिस्टचेयोगदान तसेच प्रतिजैविक प्रतिकारशक्तीच्या (Antimicrobial Resistance – AMR) वाढत्या समस्येबाबत समाजात जनजागृतीकरण्यासाठी फार्मसी कौन्सिल ऑफ इंडिया नवी दिल्ली आणि इंद्रायणीविद्यामंदिर संस्था यांच्या सहकार्याने जागतिक फार्मासिस्ट दिन आणिराष्ट्रीय फार्मसी सप्ताह २०२६ साजरा करण्यात येत आहे. या उपक्रमांतर्गतपश्चिम महाराष्ट्र व मुंबई विभागाचा राज्यस्तरीय कार्यक्रम बुधवार, दि. ४नोव्हेंबर रोजी तळेगाव दाभाडे येथील इंद्रायणी विद्यामंदिर संस्थेच्या कृष्णरावभेगडे इन्स्टिट्यूट ऑफ फार्मास्युटिकल एज्युकेशन अँड रिसर्च येथे आयोजितकरण्यात येणार आहे. फार्मसी कौन्सिल ऑफ इंडियाचे अध्यक्ष डॉ. मोंटुकुमार पटेल प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत अशी माहितीइंद्रायणी विद्या मंदिर संस्थेचे अध्यक्ष मा. श्री. रामदास काकडे यांनी दिली
इंद्रायणी विद्यामंदिर संस्था १९६५ सालापासून कार्यरत असलेली पुणेजिल्ह्यातील अग्रगण्य शैक्षणिक संस्था म्हणून ओळखली जाते. संस्थेचेविद्यार्थी शैक्षणिक, क्रीडा, प्रशासकीय आदी विविध क्षेत्रात प्राविण्य मिळवतअसतानाच, सामाजिक संवेदनशीलतेची बीजे पेरण्याचे काम संस्थावेळोवेळी करत आलेली आहे. फार्मसी सप्ताह हा त्याच दृष्टीने महत्त्वाचाटप्पा मानला जात आहे.
कार्यक्रमाच्या प्रारंभी प्रतिजैविक प्रतिकारशक्ती विरोधात जनजागृतीकरण्यासाठी विद्यार्थ्यांची रॅली काढण्यात येणार आहे. या रॅलीला फार्मसीकौन्सिल ऑफ इंडियाचे अध्यक्ष डॉ. मोंटुकुमार पटेल, संस्थेचे अध्यक्ष श्री. रामदास काकडे, कार्यवाह श्री. चंद्रकांत शेटे व खजिनदार सौ निरुपाकानिटकर यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून प्रारंभ करण्यात येईल. प्रतिजैविकांचा अनावश्यक वापर, डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषधे घेणेआणि आणि अपूर्ण औषधोपचार यामुळे निर्माण होणाऱ्या गंभीरआरोग्यविषयक समस्यांबाबत नागरिकांना जागरूक करणे हा या रॅलीचाउद्देश आहे.
फार्मसी विद्यार्थ्यांच्या वैज्ञानिक दृष्टिकोनाला आणि सामाजिकबांधिलकीला प्रोत्साहन देण्यासाठी राज्यस्तरीय स्पर्धांचे आयोजन करण्यातआले आहे. यामध्ये सायटून (Sci-Toon), पोस्टर सादरीकरण, प्रश्नमंजुषा, माहितीपत्रक, पथनाट्य आणि रील मेकिंग या सहा स्पर्धांचा समावेश आहे. प्रत्येक स्पर्धेतील प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांकाच्या विजेत्यांनागौरविण्यात येणार आहे. या स्पर्धांमधून औषधांचा योग्य वापर, प्रतिजैविकप्रतिकारशक्ती, रुग्ण समुपदेशन आणि सार्वजनिक आरोग्य या विषयांवरविद्यार्थ्यांना आपले विचार सर्जनशील पद्धतीने मांडण्याची संधी मिळणारआहे
या कार्यक्रमातील विशेष आकर्षण म्हणजे प्रतिजैविक प्रतिकारशक्तीया विषयावर आयोजित करण्यात आलेला तज्ज्ञ परिसंवाद. यामध्ये ससूनरुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. एकनाथ पवार, अन्न व औषध प्रशासनाचे पुणेविभागाचे सहआयुक्त श्री. गिरीश हुकारे, के. एम. कुंदनानी कॉलेज ऑफफार्मसी, मुंबईच्या प्राचार्या प्रा. मंजिरी घरत, PCI सदस्य डॉ. संजयतोष्णीवाल, ऑर्गोनिक्स बायोकेम प्रा. लि.चे संचालक डॉ. सुहित गिल्डा, डॉ. बी. एस. कुचेकर आणि डॉ. सथियानारायणन सहभागी होणार आहेत.
फार्मसी कौन्सिल ऑफ इंडियाचे अध्यक्ष डॉ. मोंटुकुमार पटेल प्रमुखपाहुणे म्हणून उपस्थित राहणार इंद्रायणी विद्यामंदिर संस्थेचे अध्यक्ष श्री. रामदास काकडे यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रम संपन्न होणार आहे. तसेचPCI सदस्य डॉ. श्रीकांत जोशी, श्री. जगन्नाथ शिंदे, डॉ. संजय तोष्णीवाल, श्री. प्रकाश वंजारी आणि डॉ. शिवानंद पाटील यांची प्रमुख उपस्थितीराहणार आहे. या राज्यस्तरीय कार्यक्रमाचे निमंत्रक फार्मसी कौन्सिल ऑफइंडिया सदस्य श्री. विजय पाटील असून, नॅशनल फार्मसी वेलफेअरअसोसिएशन इंडियाचे अध्यक्ष डॉ. सचिन कोतवाल यांच्या मार्गदर्शनाखालीआयोजन करण्यात येत आहे. कार्यक्रमाचे राज्य समन्वयक प्रा प्रविण जावळेडॉ. विक्रम शिंदे आणि प्राचार्य डॉ. संजय आरोटे हे आहेत. इंद्रायणीविद्यामंदिर संस्थेचे आणि कृष्णराव भेगडे इन्स्टिट्यूट ऑफ फार्मास्युटिकलएज्युकेशन अँड रिसर्च यांच्या सहकार्याने हा उपक्रम पार पडणार आहे अशीमाहिती इंद्रायणी विद्या मंदिर संस्थेचे अध्यक्ष मा. श्री. रामदास काकडे यांनीदिली.
पश्चिम महाराष्ट्र आणि मुंबई विभागातील डी. फार्म., बी. फार्म., एम. फार्म. आणि फार्म. डी. अभ्यासक्रमांच्या विद्यार्थ्यांसह प्राध्यापक, संशोधक, फार्मासिस्ट आणि औषधनिर्माण क्षेत्रातील २००० अधिक मान्यवर उपस्तितराहणार आहेत.
औषधांचा योग्य वापर, प्रतिजैविक प्रतिकारशक्तीविरोधातीलजनजागृती आणि सक्षम फार्मासिस्टच्या माध्यमातून निरोगी समाजाचीनिर्मिती, हा या राज्यस्तरीय उपक्रमाचा मु
ख्य उद्देश आहे.


