विशेषतः GX-SLF ग्रेडमध्ये उपलब्ध असलेल्या या नवीन ब्रँडमुळे व्यावसायिक मोबिलिटी ग्राहकांना मिळणार वेगळी ओळख.
बेंगळुरू, ६नोव्हेंबर २०२६: टोयोटा किर्लोस्कर मोटर (TKM) ने आज फ्लीट आणि व्यावसायिक मोबिलिटी ग्राहकांसाठी विशेष स्वरूपातील ‘इनोव्हा क्रिस्टा लिमो’ एडिशन सादर करण्याची घोषणा केली. विशेषतः जीएक्स-एसएलएफ ग्रेडमध्ये उपलब्ध असलेल्या या लिमिटेड एडिशनच्या माध्यमातून टोयोटाच्या व्यावसायिक मोबिलिटी ग्राहकांना एक वेगळी आणि वैशिष्ट्यपूर्ण ओळख मिळणार आहे. त्याचबरोबर वाहनाची विश्वासार्हता, आरामदायी प्रवास, सुरक्षितता, आलिशान अनुभव आणि दमदार कामगिरी ही इनोव्हाची वैशिष्ट्येही कायम राहणार आहेत.
दोन दशकांहून अधिक काळापासून इनोव्हाने भारतातील सर्वाधिक पसंतीच्या आणि विश्वासार्ह एमपीव्हींपैकी एक म्हणून आपली मजबूत ओळख निर्माण केली आहे. कुटुंबांसह व्यावसायिक ग्राहकांच्या विविध मोबिलिटी गरजा पूर्ण करण्यात या वाहनाने महत्त्वाची भूमिका बजावली आहे. ‘इनोव्हा क्रिस्टा लिमो’च्या सादरीकरणातून फ्लीट आणि व्यावसायिक मोबिलिटी क्षेत्रातील ग्राहकांशी असलेले आपले नाते अधिक दृढ करण्याचा आणि त्यांना एक स्वतंत्र ओळख देण्याचा टोयोटाचा उद्देश आहे. यासोबतच इनोव्हा ब्रँडचा समृद्ध वारसा आणि विश्वासार्हतेची परंपरा पुढे नेण्यावरही कंपनीचा भर आहे.
नवीन ब्रँडिंगविषयी बोलताना टोयोटा किर्लोस्कर मोटरचे सेल्स, सर्व्हिस आणि यूज्ड कार बिझनेसचे कार्यकारी उपाध्यक्ष श्री. सबरी मनोहर म्हणाले, “दोन दशकांहून अधिक काळापासून इनोव्हाने विश्वासार्हता, आरामदायी प्रवास आणि मालकी हक्काचा उत्तम अनुभव यांची सातत्याने खात्री देत ग्राहकांचा विश्वास संपादन केला आहे. त्यामुळेच अनेक पिढ्यांपासून हे वाहन ग्राहकांच्या पसंतीचे मोबिलिटी माध्यम बनले आहे. व्यावसायिक मोबिलिटी ग्राहकांचाही या प्रवासात महत्त्वाचा सहभाग राहिला आहे. ‘इनोव्हा क्रिस्टा लिमो’च्या माध्यमातून आम्ही या समृद्ध वारशाला एक वेगळी ओळख देत पुढे नेत आहोत. त्याचबरोबर टोयोटा ब्रँडकडून ग्राहकांना अपेक्षित असलेली गुणवत्ता आणि विश्वासार्ह कामगिरी देण्याची आमची बांधिलकी कायम राहील.”
इनोव्हा क्रिस्टा लिमो एडिशन
टोयोटाच्या विश्वासार्ह २.४ लिटर डिझेल इंजिनसह सुसज्ज असलेली इनोव्हा क्रिस्टा लिमो GX-SLF ग्रेडमध्ये उपलब्ध आहे. विश्वासार्ह कामगिरी, प्रवाशांसाठी प्रशस्त आणि आरामदायी जागा तसेच टोयोटाचा विश्वासार्ह मालकी हक्काचा अनुभव यांचा उत्तम मिलाफ या वाहनात पाहायला मिळतो. विशेषतः व्यावसायिक मोबिलिटी ग्राहकांच्या गरजा लक्षात घेऊन हे एडिशन तयार करण्यात आले आहे. आरामदायी कॅप्टन सीट्स आणि उत्कृष्ट राइड क्वालिटी यांसारख्या वैशिष्ट्यांमुळे व्यावसायिक वापरासाठी हे वाहन एक उत्तम पर्याय ठरते.
इनोव्हा क्रिस्टा : भक्कम वारशाची परंपरा
GX, GX+, VX आणि ZX अशा चार ग्रेडमध्ये उपलब्ध असलेली इनोव्हा क्रिस्टा एमपीव्ही सेगमेंटमधील ग्राहकांची पसंती कायम राखत आहे. विश्वासार्ह कामगिरी, प्रवाशांसाठी आरामदायी सुविधा आणि सुरक्षितता यांचा उत्तम समतोल या वाहनात आहे. टोयोटाच्या विश्वासार्ह २.४ लिटर डिझेल इंजिन आणि मॅन्युअल ट्रान्समिशनसह येणारी ही गाडी दमदार लो-एंड परफॉर्मन्स, सहज आणि सुरळीत ड्रायव्हिंगचा अनुभव तसेच लांबच्या प्रवासात उत्तम आराम देते. यासोबतच हे वाहन प्रति लिटर १५ किमीपर्यंतचे प्रमाणित इंधन मायलेज देते.
विविध प्रकारच्या मोबिलिटी गरजा लक्षात घेऊन डिझाइन करण्यात आलेल्या इनोव्हा क्रिस्टामध्ये प्रशस्त आणि आरामदायी केबिन, लवचिक सीटिंग पर्याय, वाहनाच्या सर्व रांगांमध्ये प्रभावी एअर कंडिशनिंग तसेच पुरेसा हेडरूम आणि लेगरूम उपलब्ध आहे. स्मार्टफोन कनेक्टिव्हिटीसह टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम आणि स्टीअरिंग-माउंटेड कंट्रोल्स यांसारख्या सुविधांमुळे वाहनाच्या व्यावहारिक आणि प्रीमियम इंटिरिअरमध्ये अधिक भर पडते.
सुरक्षिततेच्या दृष्टीने इनोव्हा क्रिस्टामध्ये सात एअरबॅग्ज, अँटी-लॉक ब्रेकिंग सिस्टम (ABS), व्हेईकल स्टॅबिलिटी कंट्रोल, हिल स्टार्ट असिस्ट कंट्रोल, इलेक्ट्रॉनिक ब्रेक फोर्स डिस्ट्रिब्युशन (EBD) आणि ब्रेक असिस्ट यांसारखी प्रगत सुरक्षा वैशिष्ट्ये देण्यात आली आहेत. त्यामुळे कौटुंबिक तसेच व्यावसायिक प्रवासासाठी अधिक सुरक्षिततेची आणि मानसिक समाधानाची खात्री मिळते.
उत्कृष्ट मालकी हक्काचा अनुभव
टोयोटाच्या व्यापक ग्राहकसेवांचा लाभ इनोव्हा क्रिस्टाच्या ग्राहकांनाही मिळतो. यामध्ये सात वर्षांपर्यंतच्या लवचिक फायनान्स योजना, कमी ईएमआयचे पर्याय आणि टोयोटा स्मार्ट फायनान्सचा समावेश आहे. याशिवाय एक्स्प्रेस मेंटेनन्स सर्व्हिस आणि २४x७ रोडसाइड असिस्टन्स यांसारख्या सुविधाही उपलब्ध आहेत.
या वाहनासोबत तीन वर्षे किंवा १,००,००० किलोमीटरची स्टँडर्ड वॉरंटी देण्यात येते. ग्राहकांना ही वॉरंटी पाच वर्षे किंवा २,२०,००० किलोमीटरपर्यंत वाढवण्याचाही पर्याय उपलब्ध आहे. या सर्व सुविधांमुळे ग्राहकांना वाहनाच्या संपूर्ण मालकी हक्काच्या कालावधीत अधिक विश्वासार्ह आणि समाधानकारक अनुभव मिळतो.
ग्रेड
एक्स-शोरूम कीमत
GX फ्लीट 7S
₹ 19,95,000
GX फ्लीट 8S
₹ 19,99,000
TKM का अवलोकन
इक्विटी पार्टिसिपेशन
टोयोटा मोटर कॉर्पोरेशन (जापान): 89%, विक्रमगीत इन्वेस्टमेंट्स एंड होल्डिंग्स प्राइवेट लिमिटेड (भारत): 11%
कर्मचारी संख्या
6,846
भूमि क्षेत्रफल
लगभग 432 एकड़ (लगभग 1.75 मिलियन वर्ग मीटर m²)
बिल्डिंग क्षेत्रफल
74,000 m2
कुल इंस्टॉल्ड प्रो
डक्शन कैपेसिटी
3,31,200 यूनिट


