Saturday, November 7, 2026
Google search engine
HomeUncategorizedराइज अँड फॉल’ या एमएक्स ओरिजिनलच्या दुसऱ्या सीझनची मानाची ट्रॉफी पटकावत शहजाद...

राइज अँड फॉल’ या एमएक्स ओरिजिनलच्या दुसऱ्या सीझनची मानाची ट्रॉफी पटकावत शहजाद पूनावाला ठरला विजेता

 

 

 

~ बनिजय एशियाची निर्मिती असलेल्या ‘राइज अँड फॉल’ या एमएक्स ओरिजिनलच्या दुसऱ्या सीझनच्या ग्रँड फिनालेमध्ये अनेक सेलिब्रिटींची उपस्थिती, नेत्रदीपक सादरीकरणे आणि शेवटच्या क्षणी मिळालेल्या अनपेक्षित वळणानंतर अंतिम विजेत्याची घोषणा ~

 

मुंबई, 07 नोव्हेंबर 2026 : अनपेक्षित मैत्री, कट्टर स्पर्धा, विजयाचे आनंदाचे क्षण आणि मोठे धक्के अशा अनेक घटनांमुळे टॉवरमधील वातावरण सतत नाट्यमय राहिले. बदलती समीकरणे, कठीण निर्णय आणि एकामागोमाग एक आव्हाने असलेल्या या प्रवासानंतर ‘राइज अँड फॉल’या एमएक्स ओरिजिनलच्या दुसऱ्या सीझनचा विजेता म्हणून शहजाद पूनावाला याच्या नावाची घोषणा करण्यात आली. त्याने मानाच्या ट्रॉफीसह ₹35 लाखांचे रोख पारितोषिक पटकावले. वीरेंद्र सेहवागने सूत्रसंचालन केलेल्या या रिॲलिटी शोमध्ये 15 सेलिब्रिटी स्पर्धक सहभागी झाले होते. डावपेच, प्रतिकूल परिस्थितीत टिकून राहण्याची क्षमता आणि स्पर्धेत आपले स्थान कायम राखण्यासाठी त्यांच्यात चुरस पाहायला मिळाली. एकामागोमाग एक अनपेक्षित वळणे येत राहिल्यामुळे प्रेक्षकांची उत्सुकता शेवटपर्यंत टिकून राहिली. प्रत्येक चढ-उतारात स्पर्धकांनी आपले स्थान टिकवण्यासाठी, सत्ता मिळवण्यासाठी आणि अंतिम फेरीपर्यंत पोहोचण्यासाठी संघर्ष केला. अखेर शानदार ग्रँड फिनालेमध्ये या सीझनच्या विजेत्याचा गौरव करण्यात आला.

 

टॉवरमध्ये स्पर्धकांचे नशीब एका रात्रीत बदलू शकत होते. त्यामुळे कोणालाही आपले स्थान सुरक्षित असल्याचे मानून चालण्यासारखी परिस्थिती नव्हती. सर्व सुविधा असलेले पेंटहाऊस आणि कठीण परिस्थिती असलेले बेसमेंट यांच्यातील फरकावर या खेळाची रचना आधारित होती. ‘रूलर्स’ आपली सत्ता आणि स्थान टिकवण्यासाठी प्रयत्न करत होते, तर ‘वर्कर्स’ वरच्या स्तरावर पोहोचण्याच्या संधीच्या प्रतीक्षेत होते. खेळातील समीकरणे सतत बदलत असताना स्पर्धकांचे वैयक्तिक संबंध आणि त्यांचे डावपेच अनेकदा एकमेकांच्या आड आले. त्यामुळे अनपेक्षित युती, तीव्र वाद आणि कठीण निर्णय पाहायला मिळाले. दोन वेळा झालेल्या ‘तख्तापलट’मुळे टॉवरमधील सत्तासमीकरणे पूर्णपणे बदलली. खेळाचे पारडे फिरले आणि ‘वर्कर्स’नासुद्धा सर्वोच्च स्थानावर पोहोचण्याची संधी मिळाली. प्रत्येक निर्णयामुळे खेळाची दिशा बदलू शकत असल्याने विजेतेपदाची स्पर्धा अंतिम टप्प्यात पोहोचेपर्यंत स्पर्धक आणि प्रेक्षक दोघांचीही उत्सुकता कायम राहिली.

 

अंतिम सहा स्पर्धकांच्या दमदार सादरीकरणांनी ग्रँड फिनालेची सुरुवात झाली. त्यानंतर, स्पर्धेतून बाहेर पडलेल्या स्पर्धकांच्या पुनर्भेटीमुळे जुन्या आठवणींना उजाळा मिळाला. मात्र, या आठवणींमध्ये रमण्यासाठी फारसा वेळ मिळाला नाही. ‘फॉर्च्युन फ्लोअर पिरॅमिड’ या आव्हानात निहारिका तिवारीला स्पर्धेतून बाहेर पडावे लागले आणि विजेतेपदाच्या शर्यतीत केवळ पाच स्पर्धक उरले. हर्ष गुजरालने आपल्या खास विनोदी शैलीने कार्यक्रमाची रंगत वाढवली, तर अंतिम फेरीतील स्पर्धकांच्या कुटुंबियांच्या विशेष उपस्थितीमुळे कार्यक्रमाला भावनिक किनार लाभली. या ग्रँड फिनालेमध्ये प्रेक्षकांसाठी अनेक खास क्षण होते. त्यानंतर करण पटेल आणि स्वरा भास्करसाठी टॉवरमधील दिवे लाल झाले आणि त्यांना स्पर्धेतून बाहेर पडावे लागले. त्यामुळे प्रियांका चहर चौधरी, गौतम गुलाटी आणि शहजाद पूनावाला या तिघांमध्ये अंतिम लढत रंगली. विजेतेपदाचा निर्णय जवळ आला असे वाटत असतानाच खेळाला आणखी एक अनपेक्षित वळण मिळाले. विजेत्याची निवड मतदानाद्वारे करण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र, अंतिम तीन स्पर्धकांमध्ये मतांवरून कोंडी निर्माण झाल्याने उर्वरित स्पर्धकांनी मतदान करून अंतिम निकाल निश्चित केला. गौतम गुलाटी दुसरा उपविजेता, तर प्रियांका चहर चौधरी पहिली उपविजेती ठरली. शहजाद पूनावाला याने अंतिम ‘रुलर’चा मान मिळवत ‘राइझ अँड फॉल’ या एमएक्स ओरिजिनलच्या दुसऱ्या सीझनचे विजेतेपद पटकावले.

 

विजयानंतर आपल्या भावना व्यक्त करताना शहजाद पूनावाला म्हणाला, “‘राइझ अँड फॉल’च्या दुसऱ्या सीझनचे विजेतेपद पटकावल्याचा आनंद शब्दांत व्यक्त करणे कठीण आहे. हा प्रवास अजिबात सोपा नव्हता. टॉवरमधील सर्वोच्च स्थानापासून बेसमेंटमधील अनिश्चिततेपर्यंत अनेक चढ-उतारांचा सामना करावा लागला. परिस्थिती माझ्या बाजूने नसतानाही मला सतत बदलत्या परिस्थितीशी जुळवून घ्यावे लागले आणि अडचणींवर मात करत पुढे जावे लागले. काही क्षणी स्वतःच्या क्षमतेबद्दल शंका वाटली, पण मनातून मला नेहमीच विश्वास होता की मी हे यश मिळवू शकतो. आज हातात ट्रॉफी घेऊन उभा असताना माझा तो विश्वास प्रत्यक्षात उतरला आहे. जिद्द आणि प्रतिकूल परिस्थितीतही खंबीरपणे उभे राहण्याची क्षमता असेल, तर काय साध्य करता येते, याचे हे विजेतेपद म्हणजे उत्तम उदाहरण आहे.”

 

तो पुढे म्हणाला, “या संपूर्ण प्रवासात मी घेतलेल्या प्रत्येक निर्णयाचा आणि यशापयशाच्या प्रसंगांतही स्वतःच्या स्वभावाशी प्रामाणिक राहिल्याचा मला अभिमान आहे. या प्रवासात जुळलेली नाती, एकत्र अनुभवलेले हास्याचे क्षण आणि स्पर्धेतील चुरस या सगळ्यांच्या आठवणी या शोपुरत्या मर्यादित राहणार नाहीत. मी आता ट्रॉफी, अविस्मरणीय आठवणी आणि या स्पर्धेत आपले सर्वस्व पणाला लावल्याचे समाधान घेऊन घरी परतत आहे. हा शो इतक्या उत्तम प्रकारे साकारल्याबद्दल आणि मला या व्यासपीठावर संधी दिल्याबद्दल मी शोच्या निर्मात्यांचे, प्राइम व्हिडीओच्या एमएक्स प्लेअरचे आणि बनिजय एशियाचे आभार मानू इच्छितो. हा क्षण माझ्यासाठी कायम अविस्मरणीय राहील.”

 

या सीझनच्या यशाबद्दल बोलताना प्राइम व्हिडीओ इंडियाचे एव्हीओडी कंटेन्ट विभागाचे संचालक आणि प्रमुख अमोघ दुसाद म्हणाले, “‘राइझ अँड फॉल’ या एमएक्स ओरिजिनलच्या दुसऱ्या सीझनला प्रेक्षकांचा मिळालेला प्रचंड प्रतिसादातून या अनोख्या रिॲलिटी शोवरील त्यांचे प्रेम पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे. इतर रिॲलिटी शोमध्ये स्पर्धकांच्या व्यक्तिमत्त्वांमधील संघर्ष पाहायला मिळतो. मात्र, हा शो केवळ तेवढ्यापुरता मर्यादित नाही. यामध्ये खेळ, डावपेच आणि विचारपूर्वक घेतलेल्या निर्णयांना विशेष महत्त्व आहे. त्यामुळे प्रेक्षकांची उत्सुकता सतत टिकून राहते. वेगवेगळ्या स्वभावाचे स्पर्धक, त्यांच्यातील चुरशीची स्पर्धा आणि अनपेक्षित वळणे यांच्या दमदार संगमामुळे या सीझनमधील चुरस यापूर्वी कधीही नव्हती इतकी वाढली. अंतिम ‘रूलर’चे विजेतेपद पटकावल्याबद्दल शहजाद पूनावालाचे अभिनंदन! हे यश म्हणजे बनिजय एशियासोबतच्या आमच्या दीर्घकालीन आणि अत्यंत फलदायी भागीदारीचे प्रतीक आहे. हा शो साकारण्यासाठी त्यांची साथ लाभल्याबद्दल आम्ही त्यांचे आभारी आहोत. या भागीदारीतून ‘राइझ अँड फॉल’चा आणखी एक यशस्वी सीझन प्राइम व्हिडीओवर प्रेक्षकांसमोर आणता आल्याचा आम्हाला आनंद आहे.”

 

बनिजय एशिया आणि एंडेमोल शाइन इंडियाचे संस्थापक आणि समूह मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक धर म्हणाले, “‘राइझ अँड फॉल’च्या दुसऱ्या सीझनचा ग्रँड फिनाले हा बनिजय एशियामधील आम्हा सर्वांसाठी कृतज्ञता व्यक्त करण्याचा क्षण आहे. या शोला चाहत्यांकडून मिळालेले प्रेम पाहून खूप आनंद झाला. वेगवेगळ्या पार्श्वभूमीचे स्पर्धक एकत्र आणण्याची संधी आम्हाला मिळाली. त्यांचे भिन्न स्वभाव, डावपेच आणि सहजप्रवृत्ती यांमुळे प्रत्येक भागानंतर प्रेक्षकांमध्ये या शोची चर्चा होत राहिली. दररोज हा शो पाहून त्याला आपलेसे करणाऱ्या प्रेक्षकांचे मी आभार मानतो. तसेच, या संपूर्ण प्रवासात मनापासून साथ देणाऱ्या प्राइम व्हिडीओच्या एमएक्स प्लेअरच्या टीमचेही आभार मानतो. देशातील अनेक लोकप्रिय रिॲलिटी शोच्या निर्मितीमागे बनिजय एशियाचा सहभाग राहिला आहे. सध्या पूर्वलिखित कथानक नसलेल्या अशा कार्यक्रमांना मिळणारा वाढता प्रतिसाद उत्साहवर्धक आहे. यापुढेही प्रेक्षकांमध्ये चर्चा घडवून आणणारे असेच मनोरंजक शो सादर करण्यास आम्ही उत्सुक आहोत.”

 

बनिजय इंडियाच्या नेतृत्वाखालील अनुभवी आणि प्रतिभावान क्रिएटिव्ह टीमने ‘राइझ अँड फॉल’ या एमएक्स ओरिजिनलच्या दुसऱ्या सीझनची निर्मिती केली आहे. या शोसाठी डीबीएस सिग्नेचर सहप्रायोजक, लक्स नायट्रो विशेष पार्टनर, मॉलकॉम सेफ्टी पार्टनर, मॅकडॉवेल्स सोडा बेव्हरेज पार्टनर, विजय सेल्स अप्लायन्स पार्टनर, एन्व्ही फ्रेग्रन्स पार्टनर, रॉफ टाइल फिक्सिंग एक्स्पर्ट, उबर राइड पार्टनर, ॲक्नेस्टार स्किनकेअर पार्टनर आणि पँटालून्स सहयोगी प्रायोजक म्हणून सहभागी झाले आहेत. वीरेंद्र सेहवागने सूत्रसंचालन केलेला ‘राइझ अँड फॉल’चा दुसरा सीझन केवळ प्राइम व्हिडीओवर मोफत पाहता येतो. या शोचा ग्रँड फिनाले आणि सर्व भाग प्राइम व्हिडीओवर तसेच अँड्रॉइडवरील एमएक्स प्लेअर ॲप, मोबाइल डिव्हाइस, कनेक्टेड टीव्ही, ॲमेझॉन शॉपिंग ॲप आणि फायर टीव्हीवर उपलब्ध असलेल्या प्राइम व्हिडीओच्या एमएक्स प्लेअरच्या माध्यमातून पाहता येतील.

 

 

 

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments