Sunday, November 15, 2026
Google search engine
HomeUncategorizedथर्ड आय टी-20 खुल्या क्रिकेट अजिंक्यपद स्पर्धेत १६ संघ सहभागी ...

थर्ड आय टी-20 खुल्या क्रिकेट अजिंक्यपद स्पर्धेत १६ संघ सहभागी स्पर्धेस आज(१६ नोव्हेंबर)पासून सुरुवात 

 

 

पुणे, १५ नोव्हेंबर २०२६: थर्ड आय स्पोर्टस अँड इव्हेंटस एलएलपी यांच्या वतीने आयोजित थर्ड आय टी-20 खुल्या क्रिकेट अजिंक्यपद स्पर्धेत १६ संघांनी आपला सहभाग नोंदवला आहे. ही स्पर्धा कटारिया हायस्कुल येथील मैदानावर १६ नोव्हेंबर २०२६ पासून सुरू होणार आहे.

 

स्पर्धेविषयी अधिक माहिती देताना स्पर्धा संचालक व थर्ड आय स्पोर्टस अँड इव्हेंटस एलएलपीचे संस्थापक अध्यक्ष अभिषेक अग्रवाल यांनी सांगितले की, स्पर्धेत गेम चेंजर्स, नॉक ९९, थर्ड आय स्पोर्ट्स फाउंडेशन, एमईएस क्रिकेट क्लब , स्केल अप क्रिकेट अकादमी, पीवायसी हिंदू जिमखाना, वायएमसीए, डेक्कन जिमखाना, ग्लोरी स्पोर्ट्स, पूना क्लब, गॅलक्सी ड्रीमर्स, व्ही एज, क्रिकटेक, मेरी क्रिकेट क्लब(नाशिक), एसजी क्लब, प्लॅटिनम क्रिकेट अकादमी हे १६ संघ झुंजनार आहेत.

 

तसेच, ही स्पर्धा साखळी व बाद पद्धतीने खेळविण्यात येणार आहे. स्पर्धेचे सामने २० षटकांचे होणार आहे. स्पर्धेतील विजेत्या, उपविजेत्या संघाला करंडक, पदक अशी पारितोषिके देण्यात येणार आहेत. याशिवाय सर्वोत्कृष्ट फलंदाज, सर्वोत्कृष्ट गोलंदाज, मालिकावीर, सामनावीर यांना आकर्षक अशी पारितोषिके देण्यात येणार असल्याची माहिती अभिषेक अग्रवाल यांनी दि

ली.

 

 

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments