पुणे,11 एप्रिल २०२३: पुण्यातील केईएम हॉस्पिटल येथे जागतिक पार्किन्सन्स दिनानिमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. केईएम हॉस्पिटल पुणे,बी.के.पारेख पार्किन्सन डिसीज अँड मूव्हमेंट डिसऑर्डर सोसायटी (बीकेपी-पीडीएमडीएस) आणि दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल सह संयुक्तपणे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी मुंबई सपोर्ट ग्रुपमधील कार्यक्रम व्यवस्थापिका कविता निंबाळकर,केईएम हॉस्पिटलच्या न्यूरोसायन्सेस विभागातील समन्वयक व न्यूरोसायकॉलॉजिस्ट जेनिन गार्डा, केईएम व डीएमएच सपोर्ट ग्रुपच्या फिजिओथेरपिस्ट व समन्वयक डॉ.निकिता छाजेड, केईएम सपोर्ट ग्रुपमधील सहाय्यक फिजिओथेरपिस्ट आणि समन्वयक डॉ श्रद्धा कानडे,डीएमएच सपोर्ट ग्रुपच्या सहाय्यक फिजिओथेरपिस्ट आणि समन्वयक डॉ मयुरी इंगळे, वॉलेंटिअर संपदा पाध्ये आणि बीकेपी-पीडीएमडीएसच्या वरिष्ठ मानसोपचारतज्ञ नेहा राणे आदी मान्यवर उपस्थित होते. तसेच रुग्ण, डॉक्टर व देखभाल करणाऱ्या व्यक्ती देखील उपस्थित होत्या. परसन्स विथ पार्किन्सन्स गॉट द टॅलेंट – सेलेब्रेटिंग कलर्स ऑफ इंडिया ही यंदाच्या वर्षीची संकल्पना आहे.
कार्यक्रमात विविध राज्यांतील उत्सवांवर प्रकाश टाकणारे नृत्य-गायन सादरीकरण आणि पार्किन्सन्स ग्रस्त व्यक्ती आणि त्यांची देखभाल करणाऱ्या व्यक्तींच्या कला आणि हस्तकलेचे प्रदर्शन सादर करण्यात आले होते . यामध्ये वारली पेंटिंग, फ्लोरल एम्ब्रॉयडरी यांचा समावेश होता. याप्रसंगी रूग्णांनी सपोर्ट ग्रुपबरोबर जोडले गेल्यानंतरचा अनुभव व त्यातून झालेला जीवनातील बदलाबाबत आपले मनोगत व्यक्त केले.यावेळी देखभाल करणाऱ्या व्यक्ती, डॉक्टर आणि फिजिओथेरपिस्ट यांनी मार्गदर्शन करून पार्किन्सन्स आजाराविषयी जागरुकता वाढविण्यात मदत केली.
पार्किन्सन डिसीज सपोर्ट ग्रुप प्रोग्राम हा बीकेपी-पीडीएमडीएसच्या माध्यमातून भारतातील अनेक केंद्रांद्वारे विनामूल्य चालविला जातो. हा बहुआयामी स्वरूपातील कार्यक्रम असून यामध्येे प्रामुख्याने ऑक्युपेशनल व स्पीच थेरपी, शारीरिक व्यायाम (फ़िजिओथेरपी), लाफ्टर थेरपी, डान्स आणि म्युझिक,मूव्हमेंट थेरपी याबरोबरच योग्य पोषक आहार, योग-प्राणायाम, जेष्ठ नागरिकांमध्ये सामान्यपणे आढळणार्या इतर मेंदूविषयक आजारांवरील डॉक्टरांची व्याख्याने आणि जागरूकता सत्रांद्वारे योग्य ते मार्गदर्शन करण्यात येते. हे उपक्रम बीकेपी – पीडीएमडीएसच्या प्रशिक्षित व्यक्तींद्वारे विनामूल्य आयोजित केले जातात.
पार्किन्सन डिसीज सपोर्ट ग्रुप सत्रे दर आठवड्यातील बुधवारी केईएम हॉस्पिटल येथे आणि शनिवारी दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल येथे आयोजित केली जाता
त.


