Wednesday, November 18, 2026
Google search engine
HomeUncategorizedचार हजार दिव्यांच्या प्रकाशाने उजळला चतु:शृंगी देवी मंदिर परिसर राष्ट्रीय कला...

चार हजार दिव्यांच्या प्रकाशाने उजळला चतु:शृंगी देवी मंदिर परिसर राष्ट्रीय कला अकादमी आणि श्री चतु:शृंगी देवी देवस्थानच्या संयुक्त विद्यमाने भव्य दीपोत्सवाचे आयोजन

 

 

पुणे : दीपावली पाडव्याच्या मंगलमय पर्वानिमित्त श्री चतु:शृंगी देवी मंदिर परिसरात चार हजार दिव्यांची रोषणाई करण्यात आली. हजारो पणत्यांच्या प्रकाशाने मंदिर परिसर उजळून निघाला. राष्ट्रीय कला अकादमी (न्यास), पुणे आणि श्री चतु:शृंगी देवी देवस्थान यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य दीपोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते.

 

यावेळी अतुल सोनवणे, रोमा लांडे, मंदार रांजेकर, अमर लांडे, श्री लकडी पूल विठ्ठल मंदिर ट्रस्टचे दीपक थोरात, अखिल मंडई मंडळाचे विश्वास भोर, श्री चतु:शृंगी देवी देवस्थानचे अध्यक्ष दिलीप अनगळ, नंदकुमार अनगळ आणि राष्ट्रीय कला अकादमीचे सर्व कार्यकर्ते उपस्थित होते.

 

यावेळी मंदिर परिसरात राष्ट्रीय कला अकादमीच्या रंगावली कलाकारांच्या वतीने विविध आकर्षक आणि रंगीबेरंगी रांगोळ्या साकारण्यात आल्या होत्या. मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ भव्य पणतीची रांगोळी काढण्यात आली होती. या रांगोळीभोवती दिवे प्रज्वलित करण्यात आले होते. रंगीबेरंगी रांगोळ्या आणि हजारो दिव्यांच्या प्रकाशाने मंदिर परिसर उजळून निघाला होता.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments